मानव आर्थीक व्यवहार करतांना कोणत्याही वस्तुचा मोबदल्यात किमत मोजत असतो. मानवाचा सर्वात अमूल्य त्याचा जीव आहे त्या जीवाकरीता मानवाला प्राणवायू, जल, शुद्ध वातावरण सर्वे जिवनाश्यक गोष्टि निसर्गाद्वारेच मिळते तेव्हा मानवाला पर्यावरणाचा किती मोबदला द्यायला हवा? म्हणजे ज्या गरजेच्या वस्तु मानवाला सहज व मोफत मिळतात त्यावस्तुंचे महत्व लोकांना कळतच नाही. मानव ऐवढा लोभी कसा असू शकतो म्हणजे ज्या पर्यावरणाचा भरोस्यावर मानवाचे जिवन अवलंबून आहे त्याच पर्यावरणाला संपवायला निघाला. मानव जेवढी काळजी स्वतःची किंवा परीवाराची करतो तेवढीच काळजी पर्यावरणाची सुद्धा केली पाहीजे कारण पर्यावरण आहे म्हणूनच मानव सुखरूप आहे. आपल्या विचारा पेक्षाही जास्त वाईट स्थितीमधे आजचे पर्यावरण आहे. म्हणजे एक निर्व्यसनी व्यक्ति सुद्धा रोज प्रदूषणाद्वारे कित्येक तरी सीगरेटी ऐवढा धूर आपल्या श्वासात घेतो. प्रत्येक क्षणात, खाण्यापिण्यात सुद्धा भेसळ, केमीकलयुक्त, जिवघेणारे तत्व नकळत आपल्या शरीरात प्रवेश करतात. आजच्या आधुनिक युगात काही-काही लोकांची मानसीकता ऐवढी स्वार्थी झाली आहे की ते स्वताचा फायद्या साठी मानव जातीला पर्यावरणाला कितीही त्रास द्यायला मागेपुढे पाहत नाही. मानवाचे आयुष्य अर्थात सरासरी वय खूप खालावले आहे.
पर्यावरण अर्थात आपल्या अवती-भवती असलेला संपुर्ण प्रकारचा वातावरण आहे. हे पर्यावरण भौतिक आणि जैविक तत्वानी मिळून बनलेल आहे या भौतिक तत्वांमधे भौगोलीक स्थिती, माती, खनिजे, डोंगर, सुर्यप्रकाश, वायुमंडल गैस, पानी असे नैसर्गीक तत्वे येतात. प्रत्येक सजीव प्राणी आपल्या जीवनासाठी ह्या भौतिक पर्यावरणावरच अवलंबून असतो. जैविक तत्वामधे सर्व सजीव अर्थात झाडे, जनावरे, सुक्ष्म जीव व मानवजाती आहेत. मानव जातीचा विकासाकरीता नैसर्गीक संसाधन हे मुख्य स्त्रोत आहे म्हणून निसर्गाला जशाचा-तशे ठेवणे गरजेचे आहे जेणेकरून मानव जातीचा स्वस्थ विकासामधे पर्यावरणाचे समतोल पणा नेहमीच चांगल्या रीतीने चालत राहीले पाहीजे तेव्हाच मानवजात पृथ्वीवर आपले अस्तीत्व टिकवू शकेल. पण आजकालचा मानवनिर्मित संसाधन व मानवाची स्वार्थी प्रवृत्ती मुळे नैसर्गीक पर्यावरण खूप वाईट परीस्थीतीत आहे. 1992 पासून दरवर्षी 26 नोव्हेंबरला जगभर पर्यावरणाचा समतोल व लोकांमधे जागरुकता निमार्ण करण्याकरता सकारात्मक पाउल उचलण्याकरीता हा विशेष दिवस साजरा केला जातो
आपल्या देशाची लोकसंख्या जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे तर एवढ्या मोठ्या लोकसंख्येची गरज पुर्ण करण्याकरता फार प्रमाणात शुध्द पाणी, हवा, खाद्यांन व इतर सोयी सुविधाची आवश्यकता असते ही सगळी वस्तु पर्यावरण द्वारे मिळते. झाडांची कटाई खूप वाढली आहे, जंगल कमी होत आहेत, रानातील जनावरे मानव क्षेत्रात येत आहेत, शहरीकरण वाढल्याने शेत जमीन कमी होत आहे त्यांचे प्रभाव धान्य उत्पन्नावर होतो, सगळीकडे औद्योगीकरण व वाढत्या वाहनांमुळे वायु प्रदूषण वाढले आहे, पेट्रोल डिजल तेल ईधनांचा वापर खूप होतोय, मोठे मोठे हिम खंड वितळत चालले आहेत. सुनामी, ग्लोबल वार्मींगची समस्या दिवसें-दिवस वाढतच आहे, ओजोनची लेयरला सुद्धा धोखा वाढत आहे, शेतात रासायनिक खतांचा वापरामुळे त्याचा प्रभाव मानवी आरोग्यावर होतो, कंपन्या तून निघणारा विषारी वायु पाणी कचरा प्रदुषण वाढवतोय, हास्पीटल मधून निघणारा कचरा व इलेक्ट्रानीक कचरा खूप घातक असतो. वन कटाई, वायु प्रदूषण, जल प्रदूषण, मृदा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, ई-कचरा हे स्वस्थ पर्यावरणासाठी मुख्य समस्या आहेत. पर्यावरणाचा सरंक्षाणासाठी कार्य करणे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे या करीता शासनाद्वारे निती नियम तयार करण्यात आले आहेत. अंतराष्ट्रिय, राष्ट्रिय, राज्य, स्थानिक, एनजीओ व अनेक संगठना द्वारे पर्यावरणाचा सरंक्षणाकरीता कार्य केली जातात पण ती कमीच आहेत.
पर्यावरण वन आणी जलवायु परिवर्तन मंत्रालय- भारत सरकार द्वारे पर्यावरणाचा सरंक्षण व प्रदूषण नियंत्रणाकरीता अनेक कार्यक्रमे, नियोजन, ई-कचऱ्यात कमी आणणे, वस्तुचे रिसायकल नंतर पुन्हा वापर, पाण्याचा गुणवत्तेत सुधारणा, पर्यावरण अंकेक्षण, प्राकृतिक संसाधनाचे लेखांकन, जनआधारीत मानकांचा विकास संस्थागत आणी मानव संसाधन विकास व इतर विषयांवर भर दिले आहे. प्रदूषणाची रोकथाम आणी नियंत्रणाचा समस्येला आदेश व नियंत्रण विधीचा संयोजना सोबतच स्वैच्छिक नियम, राजकोषीय उपाय, जागृकतेचे प्रचार व इतर मार्ग द्वारे निपटवले जातात.
प्रदूषणाचा रोकथाम करीता व नियंत्रण संबंधीत मंत्रालयाचे कार्यक्रम
- पर्यावरणीय सान्ख्यिकी व मान चित्रण
- स्वच्छ प्रौद्योगीकीचा विकास आणी संवर्धन
- लघू उद्योगांमधे स्वच्छ प्रौद्योगीकीचा वापर
- कचऱ्याची मात्रा कमी व्हावी
- वाहन प्रदूषणात कमी आणण्याकरीता ऑटोमोटिव ईंधनाचा गुणवत्तेत सुधारण्याचा कार्यक्रम
- रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांचा प्रदूषणात नियंत्रणाचा लक्ष्य
- ध्वनी प्रदूषण
- पर्यावरणीय जीवपदिक आजार विज्ञानाचे अध्ययन
- मानकांचा विकास
- एको लेबलींग
देशात पर्यावरण सुधारणा व नियत्रणा
संबंधी काही कायदे
रीवर बोर्ड एक्ट 1956, पाणि (प्रदूषण निवारण आणि नियंत्रण) कायदा 1974, पाणि उपकर (प्रदूषण निवारण आणि नियंत्रण) कायदा 1977, पर्यावारण (संरक्षण) कायदा 1986, वायु प्रदूषण संबंधी कायदा, फैक्ट्रीज एक्ट 1948, इनफ्लेमेबल्स सबस्टा सेज एक्ट 1952, वायु (प्रदूषण निवारण आणि नियंत्रण) कायदा 1981, भूमि प्रदूषण संबंधी कायदा, इंडस्ट्रीज (डेवलपमेंट एंड रेगुलेशन) कायदा 1951, इनसेक्टीसाइड्स एक्ट 1968, अर्बन लैंड (सीलिंग एंड रेगुलेशन) एक्ट 1976, वन आणि वन्य जीव संबंधी कायदा, फोरेस्ट कंजरवेशन एक्ट 1960, वाईल्ड लाइफ प्रोटेक्शन एक्ट 1972, फाॅरेस्ट (कंजरवेशन) एक्ट 1980, वाइल्ड लाईफ (प्रोटेक्शन) एक्ट 1995, जैव-विविधता कायदा 2002.
पर्यावरणाचा सुरक्षेसाठी काही उपाय
- पर्यावरणाचे सरंक्षण प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे तर सगळ्यां नागरिकांनी पर्यावरणाचा रक्षणाची शपथ घेतली पाहीजे.
- पर्यावरणाचा संरक्षणा संबंधी कायदे आणखी कडक व त्यांचे काटेकोर पालन व्हायला हवे.
- कोणत्याही व्यक्तीला भेटवस्तुचा स्वरूपात त्या व्यक्तीचा आवडीची रोपे द्यायला हवे.
- कोणत्याही संसाधन वस्तु व पाण्याचा सांभाळून वापर करायला हवा.
- कागद, अन्न, विज व इतर व वस्तुचा जेवढे गरज असेल तेवढेच वापरायला हवे.
- शेतात विषारी रासायनिक खतांचा वापर शक्यतो टाळावा.
- स्वच्छतेवर विशेष भर द्यावा.
- ईलेक्ट्रानिक संसाधनांचा गरजेनुसार कमीतकमी वापर करावा.
- प्लॅस्टिक थैली बैंगचा वापर बंद करून कापडाची थैली वापरावी.
- पेट्रोल, डिजल, तेल, गैस ही प्राकृतिक संसाधने सिमीत प्रमाणात आहेत तर यांचा वापर कमी करावा.
- एकाचा कचरा दुसऱ्याकरीता कामाचा असू शकतो तेव्हा प्रत्येक काटावू वस्तू निरुपयोगी नसते. वस्तुंचा वापर झाल्यानंतर रिसायकल करून पुन्हा वापर करावे व कचऱ्याची निर्मीती कमी व्हावी.
- रेन हार्वेस्टिंग, सोलर उर्जा, नैसर्गिक उर्जेचा वापर करावा.
- खुल्या वातावरणात कचरा जाळू नये. नेहमी कचरा टाकण्यासाठी कचराकुंडीचा वापर करावा.
- जगात पुष्कळशा गोष्टिंना पर्याय आहेत पण आपल्याकडे लोकांमधे जागृकतेची फार कमतरता आहे. पर्यावरणाचा रक्षणाबद्ल जागृक होऊन दुसऱ्याना सुद्धा जागृक करायला हवे.
जगातील सगळेच देश
पर्यावरणाचा बदलत असलेल्या परीणामामुळे त्रस्त आहेत व ह्या कारणासाठी जवाबदारही
मानवच आहे. पर्यावरणासाठी असे
खूप काही काम आहेत जे मानव आपल्या स्तरावर करून या पृथ्वीचे रक्षण करू शकतो कारण
पर्यावरण वाचेल तरच मानवजाती
वाचेल.
डॉ. प्रितम भि.
गेडाम

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें
Do Leave Your Comments