गुरुवार, 26 नवंबर 2020

पृथ्वीवर पर्यावरणाचा नाश अर्थातच मानवाचा विनाश (जागतिक पर्यावरण संरक्षण दिवस विशेष - 26 नोव्हेंबर) Destruction of the environment on Earth means destruction of human life (World Environment Protection Day Special - 26 November)

 

            मानव आर्थीक व्यवहार करतांना कोणत्याही वस्तुचा मोबदल्यात किमत मोजत असतो. मानवाचा सर्वात अमूल्य त्याचा जीव आहे त्या जीवाकरीता मानवाला प्राणवायू, जल, शुद्ध वातावरण सर्वे जिवनाश्यक गोष्टि निसर्गाद्वारेच मिळते तेव्हा मानवाला पर्यावरणाचा किती मोबदला द्यायला हवा? म्हणजे ज्या गरजेच्या वस्तु मानवाला सहज व मोफत मिळतात त्यावस्तुंचे महत्व लोकांना कळतच नाही. मानव ऐवढा लोभी कसा असू शकतो म्हणजे ज्या पर्यावरणाचा भरोस्यावर मानवाचे जिवन अवलंबून आहे त्याच पर्यावरणाला संपवायला निघाला. मानव जेवढी काळजी स्वतःची किंवा परीवाराची करतो तेवढीच काळजी पर्यावरणाची सुद्धा केली पाहीजे कारण पर्यावरण आहे म्हणूनच मानव सुखरूप आहे. आपल्या विचारा पेक्षाही जास्त वाईट स्थितीमधे आजचे पर्यावरण आहे. म्हणजे एक निर्व्यसनी व्यक्ति सुद्धा रोज प्रदूषणाद्वारे कित्येक तरी सीगरेटी ऐवढा धूर आपल्या श्वासात घेतो. प्रत्येक क्षणात, खाण्यापिण्यात सुद्धा भेसळ, केमीकलयुक्त, जिवघेणारे तत्व नकळत आपल्या शरीरात प्रवेश करतात. आजच्या आधुनिक युगात काही-काही लोकांची मानसीकता ऐवढी स्वार्थी झाली आहे की ते स्वताचा फायद्या साठी मानव जातीला पर्यावरणाला कितीही त्रास द्यायला मागेपुढे पाहत नाही. मानवाचे आयुष्य अर्थात सरासरी वय खूप खालावले आहे. 


             पर्यावरण अर्थात आपल्या अवती-भवती असलेला संपुर्ण प्रकारचा वातावरण आहे. हे पर्यावरण भौतिक आणि जैविक तत्वानी मिळून बनलेल आहे या भौतिक तत्वांमधे भौगोलीक स्थिती, माती, खनिजे, डोंगर, सुर्यप्रकाश, वायुमंडल गैस, पानी असे नैसर्गीक तत्वे येतात. प्रत्येक सजीव प्राणी आपल्या जीवनासाठी ह्या भौतिक पर्यावरणावरच अवलंबून असतो. जैविक तत्वामधे सर्व सजीव अर्थात झाडे, जनावरे, सुक्ष्म जीव व मानवजाती आहेत. मानव जातीचा विकासाकरीता नैसर्गीक संसाधन हे मुख्य स्त्रोत आहे म्हणून निसर्गाला जशाचा-तशे ठेवणे गरजेचे आहे जेणेकरून मानव जातीचा स्वस्थ विकासामधे पर्यावरणाचे समतोल पणा नेहमीच चांगल्या रीतीने चालत राहीले पाहीजे तेव्हाच मानवजात पृथ्वीवर आपले अस्तीत्व टिकवू शकेल. पण आजकालचा मानवनिर्मित संसाधन व मानवाची स्वार्थी प्रवृत्ती मुळे नैसर्गीक पर्यावरण खूप वाईट परीस्थीतीत आहे. 1992 पासून दरवर्षी 26 नोव्हेंबरला जगभर पर्यावरणाचा समतोल व लोकांमधे जागरुकता निमार्ण करण्याकरता सकारात्मक पाउल उचलण्याकरीता हा विशेष दिवस साजरा केला जातो

      आपल्या देशाची लोकसंख्या जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे तर एवढ्या मोठ्या लोकसंख्येची गरज पुर्ण करण्याकरता फार प्रमाणात शुध्द पाणी, हवा, खाद्यांन व इतर सोयी सुविधाची आवश्यकता असते ही सगळी वस्तु पर्यावरण द्वारे मिळते. झाडांची कटाई खूप वाढली आहे, जंगल कमी होत आहेत, रानातील जनावरे मानव क्षेत्रात येत आहेत, शहरीकरण वाढल्याने शेत जमीन कमी होत आहे त्यांचे प्रभाव धान्य उत्पन्नावर होतो, सगळीकडे औद्योगीकरण व वाढत्या वाहनांमुळे वायु प्रदूषण वाढले आहे, पेट्रोल डिजल तेल ईधनांचा वापर खूप होतोय, मोठे मोठे हिम खंड वितळत चालले आहेत. सुनामी, ग्लोबल वार्मींगची समस्या दिवसें-दिवस वाढतच आहे, ओजोनची लेयरला सुद्धा धोखा वाढत आहे, शेतात रासायनिक खतांचा वापरामुळे त्याचा प्रभाव मानवी आरोग्यावर होतो, कंपन्या तून निघणारा विषारी वायु पाणी कचरा प्रदुषण वाढवतोय, हास्पीटल मधून निघणारा कचरा व इलेक्ट्रानीक कचरा खूप घातक असतो. वन कटाई, वायु प्रदूषण, जल प्रदूषण, मृदा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, ई-कचरा हे स्वस्थ पर्यावरणासाठी मुख्य समस्या आहेत. पर्यावरणाचा सरंक्षाणासाठी कार्य करणे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे या करीता शासनाद्वारे निती नियम तयार करण्यात आले आहेत. अंतराष्ट्रिय, राष्ट्रिय, राज्य, स्थानिक, एनजीओ व अनेक संगठना द्वारे पर्यावरणाचा सरंक्षणाकरीता कार्य केली जातात पण ती कमीच आहेत.

        पर्यावरण वन आणी जलवायु परिवर्तन मंत्रालय- भारत सरकार द्वारे पर्यावरणाचा सरंक्षण व प्रदूषण नियंत्रणाकरीता अनेक कार्यक्रमे, नियोजन, ई-कचऱ्यात कमी आणणे, वस्तुचे रिसायकल नंतर पुन्हा वापर, पाण्याचा गुणवत्तेत सुधारणा, पर्यावरण अंकेक्षण, प्राकृतिक संसाधनाचे लेखांकन, जनआधारीत मानकांचा विकास संस्थागत आणी मानव संसाधन विकास व इतर विषयांवर भर दिले आहे. प्रदूषणाची रोकथाम आणी नियंत्रणाचा समस्येला आदेश व नियंत्रण विधीचा संयोजना सोबतच स्वैच्छिक नियम, राजकोषीय उपाय, जागृकतेचे प्रचार व इतर मार्ग द्वारे निपटवले जातात.

प्रदूषणाचा रोकथाम करीता व नियंत्रण संबंधीत मंत्रालयाचे कार्यक्रम

  • पर्यावरणीय सान्ख्यिकी व मान चित्रण
  • स्वच्छ प्रौद्योगीकीचा विकास आणी संवर्धन
  • लघू उद्योगांमधे स्वच्छ प्रौद्योगीकीचा वापर
  • कचऱ्याची मात्रा कमी व्हावी
  • वाहन प्रदूषणात कमी आणण्याकरीता ऑटोमोटिव ईंधनाचा गुणवत्तेत सुधारण्याचा कार्यक्रम
  • रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांचा प्रदूषणात नियंत्रणाचा लक्ष्य
  • ध्वनी प्रदूषण
  • पर्यावरणीय जीवपदिक आजार विज्ञानाचे अध्ययन
  • मानकांचा विकास
  • एको लेबलींग

देशात पर्यावरण सुधारणा व नियत्रणा संबंधी काही कायदे

            रीवर बोर्ड एक्ट 1956, पाणि (प्रदूषण निवारण आणि नियंत्रण) कायदा 1974, पाणि उपकर (प्रदूषण निवारण आणि नियंत्रण) कायदा 1977, पर्यावारण (संरक्षण) कायदा 1986, वायु प्रदूषण संबंधी कायदा, फैक्ट्रीज एक्ट 1948, इनफ्लेमेबल्स सबस्टा सेज एक्ट 1952, वायु (प्रदूषण निवारण आणि नियंत्रण) कायदा 1981, भूमि प्रदूषण संबंधी कायदा, इंडस्ट्रीज (डेवलपमेंट एंड रेगुलेशन) कायदा 1951, इनसेक्टीसाइड्स एक्ट 1968, अर्बन लैंड (सीलिंग एंड रेगुलेशन) एक्ट 1976, वन आणि वन्य जीव संबंधी कायदा, फोरेस्ट कंजरवेशन एक्ट 1960, वाईल्ड लाइफ प्रोटेक्शन एक्ट 1972, फाॅरेस्ट (कंजरवेशन) एक्ट 1980, वाइल्ड लाईफ (प्रोटेक्शन) एक्ट 1995, जैव-विविधता कायदा 2002.

पर्यावरणाचा सुरक्षेसाठी काही उपाय

  • पर्यावरणाचे सरंक्षण प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे तर सगळ्यां नागरिकांनी पर्यावरणाचा रक्षणाची शपथ घेतली पाहीजे.
  • पर्यावरणाचा संरक्षणा संबंधी कायदे आणखी कडक व त्यांचे काटेकोर पालन व्हायला हवे.
  • कोणत्याही व्यक्तीला भेटवस्तुचा स्वरूपात त्या व्यक्तीचा आवडीची रोपे द्यायला हवे.
  • कोणत्याही संसाधन वस्तु व पाण्याचा सांभाळून वापर करायला हवा.
  • कागद, अन्न, विज व इतर व वस्तुचा जेवढे गरज असेल तेवढेच वापरायला हवे.
  • शेतात विषारी रासायनिक खतांचा वापर शक्यतो टाळावा.
  • स्वच्छतेवर विशेष भर द्यावा.
  • ईलेक्ट्रानिक संसाधनांचा गरजेनुसार कमीतकमी वापर करावा.
  • प्लॅस्टिक थैली बैंगचा वापर बंद करून कापडाची थैली वापरावी.
  • पेट्रोल, डिजल, तेल, गैस ही प्राकृतिक संसाधने सिमीत प्रमाणात आहेत तर यांचा वापर कमी करावा.
  • एकाचा कचरा दुसऱ्याकरीता कामाचा असू शकतो तेव्हा प्रत्येक काटावू वस्तू निरुपयोगी नसते. वस्तुंचा वापर झाल्यानंतर रिसायकल करून पुन्हा वापर करावे व कचऱ्याची निर्मीती कमी व्हावी.
  • रेन हार्वेस्टिंग, सोलर उर्जा, नैसर्गिक उर्जेचा वापर करावा.
  • खुल्या वातावरणात कचरा जाळू नये. नेहमी कचरा टाकण्यासाठी कचराकुंडीचा वापर करावा.
  • जगात पुष्कळशा गोष्टिंना पर्याय आहेत पण आपल्याकडे लोकांमधे जागृकतेची फार कमतरता आहे. पर्यावरणाचा रक्षणाबद्ल जागृक होऊन दुसऱ्याना सुद्धा जागृक करायला हवे.

         जगातील सगळेच देश पर्यावरणाचा बदलत असलेल्या परीणामामुळे त्रस्त आहेत व ह्या कारणासाठी जवाबदारही मानवच आहे. पर्यावरणासाठी असे खूप काही काम आहेत जे मानव आपल्या स्तरावर करून या पृथ्वीचे रक्षण करू शकतो कारण पर्यावरण वाचेल तरच मानवजाती वाचेल.                      

डॉ. प्रितम भि. गेडाम

 

मंगलवार, 17 नवंबर 2020

ग्रंथालयांचे महत्त्व फार वाढले परंतु त्यामानाने विकास नाही (राष्ट्रीय ग्रंथालय आठवडा विशेष १४-२० नोव्हेंबर २०२०) The importance of libraries has increased greatly but there is no development in line with it (National Library Week Special 14-20 November 2020)

 

शिक्षणाचा कोणत्याही युगात किंवा भविष्यात, ग्रंथालयाशिवाय शिक्षणाचे अस्तित्व अशक्य आहे कारण ग्रंथालय हे शिक्षणाचे मुख्य केंद्र आहे जेथे पूर्ण जगाचे ज्ञान आहे. पूर्वीपासूनच याचे महत्त्व सर्वोपरि ठरले आहे. देशाचे सुवर्ण भविष्य ग्रंथालयामध्ये तयार होत असते. सर्वात जास्त शैक्षणिक केंद्र असणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश भारत आहे. जर देशाची शिक्षण व्यवस्था बळकट करायची असेल तर प्रथम ग्रंथालय सक्षम करायला हवी. ग्रंथालय हे जीवनाचा एक आवश्यक भाग आहे आणि हा विद्वानांचा जीवनाचा तर अविभाज्य भाग आहे. अभ्यास, संशोधन, एखाद्या प्रश्नाचे निराकरण शोधण्यासाठी किंवा जगातील कोणत्याही विषयांवर नाविन्यपूर्ण ज्ञान मिळवण्यासाठी ग्रंथालये नेहमीच आपल्याबरोबर असतात. वाचकांच्या ज्ञानाची तृष्णा भागवण्याकरिता सज्ज असलेल्या ग्रंथालय माहिती विज्ञानाच्या क्षेत्रात नवे-नवे शोध लावले जात आहेत. आज ग्रंथालये संशोधन केंद्र म्हणून कार्यरत आहेत. पारंपारिक ग्रंथालयपासून आजच्या आभासी ग्रंथालयपर्यंत या क्षेत्राच्या प्रत्येक बाबींमध्ये बरेच प्रगतिशील बदल झाले आहेत.


क्षेत्रावार वेगवेगळी ग्रंथालय असतात. जसे :- राष्ट्रीय ग्रंथालय, सार्वजनिक ग्रंथालय, व्यावसायिक ग्रंथालय, शैक्षणिक ग्रंथालय, शासकीय ग्रंथालय याशिवाय विषय विभागानुसार विशेष ग्रंथालय आहेत जसे :- वैद्यकीय ग्रंथालय, रेल्वे ग्रंथालय, बँक ग्रंथालय, कारागृह ग्रंथालय, विभागीय ग्रंथालय,  संसद ग्रंथालय, विविध मंत्रालयांची ग्रंथालय, प्रांतीय ग्रंथालय, जिल्हा ग्रंथालय, कायदा ग्रंथालय, वृत्तपत्र ग्रंथालय, अंध वाचक विशेष ग्रंथालय, संगीत ग्रंथालय, बाल ग्रंथालय, सैन्य ग्रंथालय, मोबाइल (चालते-फिरते) ग्रंथालय, खाजगी ग्रंथालय वगैरे अशा प्रत्येक क्षेत्राचे आणि विभागाचे स्वतःचे ग्रंथालय असतात. जगातील कोणत्याही देशातील अत्यंत दुर्मिळ ग्रंथ, ताम्रपत्र लेखन, चित्रपट, मासिके, नकाशे, हस्तलिखित कागदपत्रे आणि ग्रंथ, ग्रामोफोन रेकॉर्ड, दृकश्राव्य रेकॉर्ड, ऐतिहासिक दस्तऐवज, जागतिक ख्यातनाम व्यक्तींचे संकलित दस्तऐवज जसे की विधिलिखित निर्णय, डायरी, पत्र, संभाषण रेकॉर्ड, मोहर आदेशपत्र आणि शेकडो वर्ष जुने असे अनेक अमूल्य साहित्य आपल्यासाठी इंटरनेटच्या एका क्लिकवर ग्रंथालयातून त्वरित उपलब्ध आहेत, या व्यतिरिक्त, ग्रंथालयात जगभरातील सर्व क्षेत्रांमध्ये विकसित केलेले साहित्य, कार्यक्रम, घटना, संशोधन, पेटंट्स आणि सध्याच्या क्रियाकलापांची संपूर्ण माहिती असते. वाचकांच्या गरजा भागविण्यासाठी नवीन संसाधने उपलब्ध करुन गुणवत्तापुर्ण ज्ञानाबरोबर वाचकांचा वेळही वाचविला जातो.

ग्रंथालय महत्वाचे आहे, मग विकास का नाही :- आज आपण आधुनिक युगात जगत आहोत, जगभरात ग्रंथालयांनी जलद प्रगती केली आहे. आपल्या देशातील आयआयटी, आयएएम, एम्स यासारख्या केंद्रिय संस्थानांची ग्रंथालये किंवा काही मोठ्या खासगी संस्थानांची ग्रंथालये विकसित दिसतात. पण जेव्हा आपण आजूबाजूच्या ग्रंथालये पाहतो तेव्हा असे दिसते की ग्रंथालयांचा विकास कुठे झाले आहे? देशातील हजारो लहान ते मोठी ग्रंथालये अविकसित दिसतात, जेव्हा की देशातील सर्वात मोठा वाचकवर्ग या ग्रंथालयांमधून आहे. या लायब्ररीत वाचकांसाठी अत्याधुनिक संसाधने पाहणे तर दूरच पण मूलभूत ग्रंथालयीन सेवा देखील उपलब्ध नाहीत. बर्‍याच लायब्ररीत साहित्याच्या नावावर काही मोजक्या वर्तमानपत्र येतात. शासनाने प्रत्येक क्षेत्र, विभाग, शाळा, महाविद्यालय, संस्था, समाज यांच्या विकासाकरीता ग्रंथालयाचे महत्त्व ओळखले आहे परंतु आम्ही अजूनही ग्रंथालयाच्या विकासामध्ये खूप मागास आहोत.

ग्रंथालयात तज्ञ कर्मचारीच नाही :- केवळ या क्षेत्रातील तज्ञ कर्मचारीच ग्रंथालयात वाचकांना अधिक चांगली सेवा देऊ शकतात. परंतु देशातील बर्‍याच राज्यांच्या शाळांमध्ये, विभागात अनेक वर्षांपासून ग्रंथालय कर्मचार्‍यांची भरतीच झालेली नाही. कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत परंतु त्यांचा ठिकाणी नवीन कर्मचारी येत नाहीत, अनेक ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा भरोश्यावर ग्रंथालय चालून राहिले आहेत. कुशल कामगार वर्ग, दर्ज़ेदार वाचन साहित्य, सुविधा, पुरेसा निधी यांची कमतरता आहे. स्थानिक प्रशासन (महानगरपालिका, नगरपालिका) यांच्या सार्वजनिक ग्रंथालयांची स्थिती अशीच आहे. वाचक मूलभूत सेवांपासून सुद्धा वंचित आहे. इतर विषय क्षेत्रातील ग्रंथालयांचीही स्थिती चिंताजनक आहे. अशा ग्रंथालयांमध्ये अद्ययावत संसाधने नसतातच आणि ग्रंथालय नियमांनुसार कामे सुद्धा होत नाहीत. एकीकडे आपण शिक्षणाला प्रोत्साहन देत आहोत आणि दुसरीकडे ग्रंथालयांच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे.

बरेच ग्रंथालये उध्वस्त होत आहेत :- देशातील हजारो ग्रंथालये त्यांच्या अस्तित्वाची शेवटची लढाई लढत आहेत म्हणजेच पुष्कळशा लायब्ररी पुरेशा निधीअभावी आणि चांगल्या व्यवस्थापनाच्या कमतरतेमुळे संपण्याच्या मार्गावर आहेत, तेथील मौल्यवान वाचन साहित्य नष्ट होत आहे, बर्‍याच लायब्ररीत वाचकांसाठी पुरेशी टेबल, खुर्च्या, पंखे, प्रकाश, पिण्याचे पाणी, शौचालये, तर कुठे वीज देखील नाही आणि ग्रंथालय इमारतींच्या खिडक्या, दारे, भिंती कमकुवत झाल्या आहेत. पावसाळ्यात आणखी वाईट परिस्थिती होते, ग्रंथालयाची इमारत जीर्ण अवस्थेत आहे. छोट्या खेड्यापासून मोठ्या शहरांपर्यंत सर्वत्र ही परिस्थिती दिसून येते. तरीही अशा परिस्थितीत वाचक मोठ्या संख्येने ग्रंथालये वापरत आहेत. उज्ज्वल भवितव्यासाठी अभ्यासाचे धोरण आणि स्पर्धा परीक्षांमुळे ग्रंथालयाकडे तरुणांचा कल वाढला आहे. ग्रंथालये वाचकांना शाळेपासून आयुष्याच्या शेवटपर्यंत साथ देतात आणि आज अशा अनेक ग्रंथालये स्वत:च्या शेवटच्या दिवसांवर पोहोचल्या आहेत.

प्रत्येक ग्रंथालयाचा विकास अत्याधुनिक व्हावा :- शिक्षणपद्धती सुधारीत करायची असल्यास ग्रंथालयांच्या विकासावर लक्ष केंद्रित करणे फार महत्वाचे आहे. केंद्र, राज्य, स्थानिक प्रशासनाने अर्थसंकल्पात शिक्षणाव्यतिरिक्त ग्रंथालयासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य प्रदान केले पाहीजे. देशातील सर्व प्रकारच्या लायब्ररीत दरवर्षी आवश्यकतेनुसार भरती केल्या पाहिजेत. ज्याप्रकारे शहरे आता महानगराचे रूप घेत आहेत, वाढत्या लोकसंख्येनुसार शहरे वाढत आहेत, गरज वाढत आहे त्यानुसार ग्रंथालयांची संख्या वाढत नाही आहे. ग्रंथालयात अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी दूरदूरून येतात, देशात ग्रंथालयांची कमतरता आहे म्हणूनच ग्रंथालयांचा विस्तार अत्यंत महत्वाचा आहे. आयआयटी आयआयएमच्या ग्रंथालयासारखे ग्रंथालय प्रत्येक शहरात असायला हवी.

       प्रत्येक जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्रंथालय असावे जेणेकरून त्या जिल्ह्यातील सर्व शहरे व खेड्यांची सर्व ग्रंथालये त्यास पूर्णपणे जोडली गेली असावी जेणेकरून गाव-खेड्यातील प्रत्येक वाचकाला  गावातच आंतरराष्ट्रीय ग्रंथालयीन सुविधा संसाधन सामायिकरण आणि इंटरनेट द्वारे भेटू शकतील सोबतच शहरातील प्रत्येक प्रभागात, प्रत्येक गावात ग्रंथालये स्थापन कराव्यात. मोबाइल (चालते-फिरते) ग्रंथालय वेगवान करावी लागेल, शालेय शिक्षणाच्या अगदी सुरुवातीपासूनच मुलांना लायब्ररीचे महत्त्व शिकवले पाहिजे. प्रत्येक विद्यापीठाच्या ग्रंथालयाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय बनवून, विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या प्रत्येक महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला ऑनलाइन जोडले गेले पाहिजे. प्रत्येक शाळा, महाविद्यालय किंवा इतर शैक्षणिक विभागाच्या लायब्ररीला ई-लायब्ररी तयार करायला हवी, जे त्यांचे साहित्य ऑनलाइन अपलोड करुन याला डिजिटल ग्रंथालयाचे स्वरूप देतील आणि आपल्या संस्थेचा ई-रिपॉझिटरी स्थापित करतील. आपल्या देशात, राज्यांचा शालेयस्तरीय ग्रंथालये आणि सार्वजनिक ग्रंथालयांची अवस्था फार गंभीर आहे. त्याला सुधारण्यासाठी राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक पातळीवर ग्रंथालय माहिती विज्ञान क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांच्या समिती स्थापन केल्या पाहिजेत. ही समिती सरकारकडे विविध स्तरांच्या ग्रंथालयांचे मूल्यांकन करून त्याच्या विकासात्मक बाबींवर सल्ले देतील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्रंथालय तयार करण्याच्या पद्धतीवर देखरेख ठेवेल.

डॉ. प्रितम भि. गेडाम

पुस्तकालयों का महत्व तो हर ओर बढ़ा हैं लेकिन विकास ज्यों का त्यों (राष्ट्रीय पुस्तकालय सप्ताह विशेष १४-२० नवंबर २०२०) The importance of libraries has increased everywhere, but development remains the same (National Library Week Special 14-20 November 2020)

 

शिक्षा के किसी भी युग या भविष्य में भी, पुस्तकालय के बिना शिक्षा का अस्तित्व असंभव है क्योंकि पुस्तकालय शिक्षा का मुख्य केंद्र है जहां दुनियाभर का ज्ञान निहित है। समय के साथ, इसका महत्व सर्वोपरि हो गया है। पुस्तकालयों में देश का सुनहरा भविष्य तैयार होता है। विश्व में तीसरे नंबर पर सबसे ज्यादा शिक्षासंस्थान वाला भारत देश है। अगर देश की शिक्षा प्रणाली को मजबूत करना है, तो पहले पुस्तकालयों को बेहतर बनाना होगा। पुस्तकालय जिंदगी का एक अनिवार्य हिस्सा है और यह विद्वानों के जीवन का एक अभिन्न अंग है। अध्ययन, अनुसंधान, किसी प्रश्न का हल ढूंढना, या विश्व के किसी भी प्रकार के विषयों पर नवनविन ज्ञान प्राप्ति के लिए पुस्तकालय हमेशा हमारे साथ होते है। पुस्तकालय सूचना विज्ञान क्षेत्र में नित नए आविष्कार हो रहे हैं जो पाठकों के ज्ञान की तृष्णा को शांत करने के लिए तत्पर है। आज, पुस्तकालय अनुसंधान केंद्र के रूप में कार्य कर रहे है। पारंपरिक पुस्तकालय से लेकर आज के वर्चुअल पुस्तकालय तक, इस क्षेत्र के हर पहलू में बहुत सारे प्रगतिशील बदलाव हुए हैं। 


क्षेत्र के अनुसार अलग-अलग पुस्तकालय होते हैं जैसेः- राष्ट्रीय पुस्तकालय, सार्वजनिक पुस्तकालय, व्यावसायिक पुस्तकालय, शैक्षिक पुस्तकालय, सरकारी पुस्तकालय इसके अलावा विषय विभाग के अनुसार विशेष पुस्तकालय हैं जैसे: चिकित्सा पुस्तकालय, रेलवे पुस्तकालय, बैंक पुस्तकालय, जेल पुस्तकालय, विभागीय पुस्तकालय, विभिन्न मंत्रालयों के पुस्तकालय, प्रांतीय पुस्तकालय, जिला पुस्तकालय, कानून पुस्तकालय, समाचारपत्र पुस्तकालय, अन्ध पाठक हेतु पुस्तकालय, संगीत पुस्तकालय, बाल पुस्तकालय, सेना पुस्तकालय एवं मोबाइल (सचल) पुस्तकालय आदि ऐसे प्रत्येक क्षेत्र और विभाग का अपना पुस्तकालय होता है। दुनिया में किसी भी देश के अत्यंत दुर्लभ ग्रंथों, ताम्रपत्र लेखन, फिल्मों, पत्रिकाओं, मानचित्र, हस्तलिखीत पत्रों व ग्रंथों, ग्रामोफोन अभिलेख, दृश्य-श्रव्य अभिलेख, ऐतिहासिक दस्तावेज, विश्व के मशहूर हस्तियों के दस्तावेज़ जैसे डायरी, पत्र, वार्तालाप रिकॉर्ड, मुहर आदेशपत्र, विधिलिखित निर्णय और सैकड़ों वर्ष पुराने ऐसे अनेक अमूल्य साहित्य भी पुस्तकालय से आपको इंटरनेट द्वारा एक क्लिक पर तुरंत उपलब्ध है, इसके साथ ही दुनियाभर मे सभी क्षेत्रों में विकसित साहित्य, घटीत घटनाओं, अनुसंधान, पेटेंट व वर्तमान गतिविधियों का पूरा लेखा-जोखा पुस्तकालय द्वारा उपलब्ध होता है। पाठकों की आवश्यकताओं को पूरा करने के लिए नए संसाधन उपलब्ध हो रहे हैं जो गुणवत्तापुर्ण ज्ञान के साथ ही पाठकों के समय की भी बचत करते हैं।

पुस्तकालय महत्वपूर्ण है तो विकास क्यों नहीं :- आज हम आधुनिक युग में जी रहे हैं, विश्वभर मे पुस्तकालयों ने तेजी से प्रगति की है हमारे देश के आयआयटी, आयआयएम, एम्स जैसे केंद्रिय संस्थानों के पुस्तकालय या कुछ बड़े निजी संस्थानों के पुस्तकालय विकसित नजर आते हैं। लेकिन जब हम अपने आसपास के पुस्तकालयों को देखते हैं, तो ऐसा लगता है कि पुस्तकालयों का विकास कहां है? देश के हजारों छोटे-बड़े पुस्तकालय अविकसित दिखते हैं, जबकि देश का सबसे बड़ा पाठक वर्ग इन पुस्तकालयों से है। इन पुस्तकालयों मे पाठकों के लिए अत्याधुनिक संसाधन देखना तो दूर आधारभूत पुस्तकालय सेवाएं भी उपलब्ध नहीं हैं। कई पुस्तकालयों में साहित्य के नाम पर कुछ अखबार ही दिखाई देते हैं। सरकार ने हर क्षेत्र, विभाग, स्कूल, कॉलेज, संस्थान, समाज के लिए पुस्तकालय के महत्व को माना है लेकिन पुस्तकालय के विकास में हम अब भी बहुत पिछड़े हैं।

पुस्तकालय में तज्ञ कर्मचारी ही नहीं :- पुस्तकालय में पाठकों को केवल इस क्षेत्र का विशेषज्ञ ही बेहतर सेवाएं प्रदान कर सकता है लेकिन देश के कई राज्यों के स्कूलों, विभागों में बरसो से पुस्तकालय कर्मचारियों की भर्ती ही नहीं हुई है। कर्मचारी सेवानिवृत्त होते रहते है लेकिन नए कर्मचारी नहीं आते, कई स्थानों पर चतुर्थ श्रेणी के कर्मचारियों भरोसे पुस्तकालय चल रहे हैं, कुशल कर्मचारी वर्ग, अच्छे पाठ्य साहित्य सामग्री, सुविधाओं, पर्याप्त निधी का अभाव है, स्थानीय प्रशासन (महानगर पालिका, नगरपालिका) के सार्वजनिक पुस्तकालय की स्थिति भी ऐसी ही है। पाठक बुनियादी सेवाओं से भी वंचित है। अन्य विषय क्षेत्रों के पुस्तकालयों की स्थिति भी चिंताजनक है। इस तरह के पुस्तकालयों में न ही अप-टू-डेट संसाधन हैं, और न ही पुस्तकालय नियम के हिसाब से काम किया जाता है। एक तरफ हम शिक्षा को बढ़ावा दे रहे हैं और दूसरी तरफ पुस्तकालयों के विकास की अनदेखी कर रहे हैं।

कई पुस्तकालय बन रहे खंडहर :- देश के हजारों पुस्तकालय अपने अस्तित्व की अंतिम लड़ाई लड़ रहे हैं अर्थात कई पुस्तकालय पर्याप्त निधी और बेहतर प्रबंधन की कमी के कारण खत्म होने के कगार पर हैं, वहा की बहुमूल्य पाठ्य साहित्य सामग्री खराब हो रही है, कई पुस्तकालयों में पाठकों के लिए पर्याप्त मेज, कुर्सियां, पंखे, रोशनी, पीने का पानी, शौचालय, बिजली भी नहीं है और पुस्तकालय भवन की खिड़कियां, दरवाजे, दीवारें कमजोर हो गई हैं। बारिश में छत से पानी टपकता है। पुस्तकालय भवन जर्जर हालत में है। यह स्थिति छोटे गाँवों से लेकर बड़े शहरों तक हर जगह नजर आती है फिर भी ऐसे हालात में भी पाठक बड़ी संख्या में पुस्तकालयों का उपयोग कर रहे हैं। उज्ज्वल भविष्य के लिए बेहतर पढ़ाई और प्रतियोगी परीक्षाओं के कारण पुस्तकालय के प्रति युवाओं का झुकाव बढ़ा है। पुस्तकालय, पाठकों को स्कूल से जीवन के अंत तक साथ देते है और आज ऐसे कई पुस्तकालय खुद ही अपने अंतिम दिनों में पहुंच गए हैं।

प्रत्येक पुस्तकालय का विकास अत्याधुनिक हो :- यदि शिक्षा प्रणाली को उन्नत करना है, तो पुस्तकालयों के विकास पर ध्यान देना बहुत महत्वपूर्ण है। केंद्रीय, राज्य, स्थानीय प्रशासन को शिक्षा के अलावा अपने बजट में पुस्तकालय के लिए बड़ी मात्रा में वित्तीय सहायता प्रदान करना चाहिए। देश के सभी प्रकार के पुस्तकालयों मे हर साल आवश्यकता अनुरूप कर्मचारी भर्ती होनी ही चाहिए। जिस प्रकार नगर अब एक महानगर का रूप ले रहे है, बढ़ती जनसंख्या के अनुसार, शहर बढ़ रहे हैं उस हिसाब से पुस्तकालयों की संख्या नहीं बढ़ रही है। पुस्तकालय में पढ़ने के लिए छात्र दूर-दूर से आते हैं, देश में पुस्तकालयों की कमी है इसलिए पुस्तकालयों का विस्तार किया जाना अत्यावश्यक है। आयआयटी आयआयएम के पुस्तकालय जैसे गुणवत्तापुर्ण पुस्तकालय हर शहर में होने चाहिए।

प्रत्येक जिले में एक अंतरराष्ट्रीय स्तर का पुस्तकालय होना चाहिए जिससे उस जिले के सभी कस्बों और गांवों के सभी पुस्तकालय इससे पूर्णतया जुड़े हों ताकि हर गांव के पाठकों को गांव में ही अंतरराष्ट्रीय पुस्तकालय की सुविधा संसाधन साझाकरण और इंटरनेट द्वारा मिल सकेगी और हर गाँव में, शहर के हर वार्ड में, पुस्तकालयों की स्थापना होनी चाहिए। मोबाइल पुस्तकालय को गति देनी होगी, बच्चों को स्कूली शिक्षा के शुरुआती दिनों से ही पुस्तकालय का महत्व सिखाया जाना चाहिए। प्रत्येक विश्वविद्यालय के पुस्तकालय को अंतरराष्ट्रीय मानक का पुस्तकालय बनाकर, विश्वविद्यालय अंतर्गत आने वाले प्रत्येक कॉलेज के पुस्तकालय से ऑनलाइन जोड़ा जाना चाहिए। प्रत्येक स्कूल और महाविद्यालय या अन्य शैक्षिक विभाग के पुस्तकालय को ई-पुस्तकालय बनाना होगा, जो अपने संस्थान के साहित्य को ऑनलाइन अपलोड कर इसे डिजिटल पुस्तकालय का स्वरूप दें और अपने संस्थान की ई-रिपॉजिटरी स्थापित करे। हमारे देश में राज्यों की स्कूलस्तरीय पुस्तकालयों और सार्वजनिक पुस्तकालयों की हालत गंभीर है इसे सुधारने के लिए राष्ट्रीय, राज्य और स्थानीय स्तर पर पुस्तकालय सूचना विज्ञान के क्षेत्र में अनुभवी विशेषज्ञों की समितियों का गठन किया जाना चाहिए । यह समिति विभिन्न स्तरों के पुस्तकालयों की मूल्यांकन कर सरकार को इसके विकासात्मक पहलुओं पर सुझाव देगी और अंतर्राष्ट्रीय स्तरीय पुस्तकालय के निर्माण के लिए कार्यपद्धति पर नजर रखेगी।

डॉ. प्रितम भि. गेडाम