गुरुवार, 11 जुलाई 2019

लोकसंख्येचा विस्फोट: गंभीर चिंतेची बाब (जागतिक लोकसंख्या दिवस विशेष- ११ जुलै २०१९) Population Explosion: A Matter of Serious Concern (World Population Day Special - 11 July 2019)


आज आपण दूषित वातावरणात जगायला लाचार आहोत. दररोज मानवाच्या गरजा वाढतच चालल्या आहेत. लोकसंख्या वाढत आहे पण त्या मानाने आपल्याकडे संसाधने व सुविधा खूप कमी आहेत. लोकसंख्येचा दूष्परीणामाच्या रूपाने सगळीकडे प्रदूषण, अन्न-धान्यात भेसळ, वाढते गंभीर आजार, ग्लोबल वार्मीग, अशुद्ध हवा-पाणी, महागाई, कमी होत चालली शेत जमीन, संपत चालली वनसंपदा, जंगले, वन्य प्राणी व मानवात वाढते संघर्ष, नैसर्गीक संसाधनांचा अती वापर, संपत चालली नैसर्गीक संसाधने ईंधन, वाढते कांक्रीटचे जंगल, बेकारी, उपासमार, जीवन जगण्याचा संघर्ष व इतर समस्यांचे कारण फक्त एक आहे ते म्हणजे वाढती लोकसंख्या. वाढत्या लोकसंख्येचा भल्या मोठ्या गरजांना पुर्ण करण्याचा नादात गुणवत्तेसोबत समझोता करावा लागतो.

आज साधारणपणे सर्वच देश वाढत्या लाकसंख्येचा समस्येने ग्रस्त आहेत. पण आपल्या देशात ही समस्या गंभीर स्थितीत आहे कारण जगाच्या 17.74 टक्के लोकसंख्या आपल्याकडे फक्त 2.4 जागेचा क्षेत्रफळात वास्तव्य करीत आहे व पुढील पाच वर्षानंतर जगाचा लोकसंख्येत प्रथम क्रमांकावर भारत देश असणार. एवढ्या मोठ्या लोकसंख्येची गरज कशी पुर्ण होणार? जेव्हा गरजांना सहज पुर्ण करने शक्य होत नाही तेव्हा त्या गरजा नवीन समस्यांना निर्माण करतात.

ग्लोबल हंगर इंडेक्स 2018 प्रमाणे भूक आणी कुपोषणाच्या बाबतीत भारत देश 119 देशाच्या सूचीतून 103 क्रमांकावर आला आहे म्हणजे चिन, बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका देशापेक्षाही जास्त वाईट परीश्थितीत आपले देश आढळून येतोय आणी ही खूपच गंभीर बाब आहे. वर्ष 2000 मधे देशात 18.2 टक्के भाग हा कुपोषित होता आणी आता 2018 मधे देशाचा लोकसंख्येतील 14.8 टक्के वर्ग कुपोषणाचा समस्येत अळखलाय. आईएमएफच्या रिपोर्ट प्रमाणे देशात प्रती व्यक्ती आय दर च्या 200 देशात भारत देश 126व्या क्रमांकावर आला आहे. देशात श्रीमंत व गरीब यातील अंतर खूप वाढत चालले आहे. ब्रिटनच्या चैरिटी ऑक्सफॅम इंटरनेशनलच्या रिपोर्ट प्रमाणे आर्थिक असमतेत कमी करण्याचा क्रमवारीत 157 देशाच्या सूची मधे भारताला 147 वा नंबर दिला आहे.

देशाच्या कित्येक भागात दरिद्रीची परीस्थिती खूप नाजूक आहे. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यत लोकांना भुकेने जीव गमवावा लागतोय. लहान मुलांना पौष्टिक अन्न मिळत नाही. आपल्या समाजात कित्येक बेवारस मुले, भिकारी कचऱ्याचा ढिगाऱ्यातून खराब अन्न खातांनी आढळतात. बेकारीच्या समस्ये मुळे आत्महत्या व गुन्हेगारीत खूप वाढ होत आहे. गलीच्छ वस्त्या, अशिक्षा, गरीबी, आर्थिक असमता, अशा गंभीर समस्या लोकसंख्या वाढी मुळे उद्भवतात.

जगात वाढत्या लोकसंख्ये विषयी काही आश्चर्यकारक आकडेवारी

  1. आज जागतिक लोकसंख्या दिवसा पर्यंतची एकूण लोकसंख्या 7,716,791,619 इतकी झाली आहे. यात आशिया खंडाची लोकसंख्या 4,584,807,072 ऐवढी असून अफ्रिका खंडाची 1,320,038,716 लोकसंख्या आहे.
  2. आपल्या पृथ्वीवर दर 0.38 सेकंदाला एक, दर मिनिटाला साधारणपणे 155 लोकांची लोकसंख्येत वाढ होते व एका दिवसाला 2.25 लाख लोकसंख्या वाढते.
  3. मागील 12 वर्षात 1 अब्जाहून जास्त मुलांचा जन्म झाला. ह्या वर्षी 2019 ला आजपर्यंत 4.25 कोटी ऐवढी लोकसंख्या वाढली आहे.
  4. जगात लोकसंख्या वर्ष 1804 मधे 1 अब्ज होती नंतर 1930 मधे 2 अब्ज, 1960 मधे 3 अब्ज, 1974 मधे 4 अब्ज, 1987 ला 5 अब्ज, 1999 मधे 6 अब्ज, 2011 मधे 7 अब्ज, 2023 मधे 8 अब्ज, 2037 ला 9 अब्ज, 2055 पर्यंत जगात 10 अब्ज इतकी लोकसंख्या होईल.
  5. मागील 40 वर्ष अर्थात 1959-1999 मधे लोकसंख्या दुप्पट झाली म्हणजे 3 अब्जाहून 6 अब्जावर गेली.
  6. साधारणपणे दरवर्षी 1.10 टक्के प्रमाणे लोकसंख्येत वाढ होते. (1.07 टक्के दर वाढ 2019 ला, दर वाढ 1.09 टक्के 2018 ला ह्या वर्षी, 1.12 टक्के 2017ला, 1.14 टक्के 2016 मधे होती) साधारणपणे दर वर्षी 8 कोटी 30 लाख पेक्षा जास्त लोकसंख्या वाढते.
  7. जगातील लोकसंख्येचा एक तृतियांश भाग हा आशिया खंडातील आहे. गरीबी, उपासमार व आजाराने मृत्युमुखी पडणाऱ्याची संख्या जास्त असली तरीही लोकसंख्या खूपच वाढत आहे.
  8. जगात सर्वात मोठी लोकसंख्या ही 31.5 टक्के ख्रिश्चन समुदायाची आहे व दुसऱ्या क्रमांकावर 23.2 टक्के मुस्लीम समाज येतो. हिंदू समुदाय 15 टक्के आहे व 7 टक्के आकडेवारी ही बुद्धीस्ट समाजाची आहे.

भारत देशात वाढत्या लोकसंख्ये विषयी काही आश्चर्यकारक आकडेवारीः-

  1. एका मिनिटाला आपल्या देशात साधारणपणे 28 लोकांची लोकसंख्या वाढते व एक दिवसाला 40,320 लोकसंख्या आणि महिन्याला साधारणपणे 1,209,600 इतकी लोकसंख्या वाढते.
  2. लोकसंख्येचा बाबतीत भारत देश चीन नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2025 पासून भारत देश लोकसंख्येचा बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर असणार कारण आपल्या देशात लोकसंख्या दर वाढ 1.02 टक्के आहे जेव्हाकी चीनचा दर वाढ 0.43 टक्के इतका आहे.
  3. जगातील 17.74 टक्के लोकसंख्या ही एकट्या भारत देशातील आहे जेव्हा की भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळातील फक्त 2.42 टक्के आहे. ही खूपच गंभीर बाब आहे.
  4. आज भारत देशाची लोकसंख्या 1,369,100,571 इतकी आहे. जगातील मोठ्या लोकसंख्येसाठी प्रसिद्ध शहरातून मुंबई हे एक शहर आहे इथल्या 1 वर्ग किलोमीटर मधे 32,400 लोकं राहतात याला लोकसंख्या डेंसिटी ही म्हणतात. जेव्हाकी देशात ही 460 लोकसंख्या/प्रती वर्ग किलोमीटर डेंसिटी आहे आणी ही प्रती वर्ग किलोमीटर डेंसिटीची आकडेवारी वेळे प्रमाणे वाढतच जाणार. चीन देशाची लोकसंख्या डेंसिटी 151 आहे.
  5. देशात 34 टक्केवारी ही शहरी लोकसंख्येची आहे आणी वर्ष 2050 पर्यंत 50 टक्के लोकसंख्या ही शहरी भागातील असणार सोबत लोकसंख्या डेंसिटी 558/प्रती वर्ग किलोमीटर होणार.
  6. युथ इन इंडिया, 2017 च्या रिपोर्ट प्रमाणे 1971 ते 2011 वर्षा मधे युवांची वाढ 16.8 कोटीहून वाढून 42.2 कोटी झाली आहे. म्हणजेच पुर्ण लोकसंख्येची 34.8 टक्केवारी युवांची. 2030 पर्यंत ही वाढ 32.6 टक्के होणार अर्थातच चीनच्या युवांची 22.31 टक्के पेक्षा 10 टक्क्यांनी जास्त होईल.

वाढती लोकसंख्या एक अशी अडचण आहे जी शेकडो अन्य अडचणीचे मुळ आहे. मानवाच्या आकडेवारीच्या मानाने संसाधने कमी आहेत. भविष्यात पृथ्वीवर मानवाचे जीवन कठीन होणार कारण अन्न-धान्य, शुद्ध जल शुद्ध वायु, नैसर्गीक संसाधने संपल्यावर मानव जगू शकणारं नाही. लोकसंख्येचा भस्मासूराला जर आटोक्यात आणलं तरच पृथ्वीवरील जीवन सुंदर होईल आणी पृथ्वीवर मानवाचे अस्तित्व टिकेल.

डाॅ. प्रितम भि. गेडाम 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Do Leave Your Comments