आज पावसाळ्याचा दिवसात शेतकरी शेतात पेरणी करून पावसाच्या पाण्याची वाट पाहत आहे पण पावसाचा पत्ता नाही. पावसाळ्यात सुद्धा नदी, कालव्यात, धरणात पाणी नाही आहे. शहरात पाणी टंचाई चालू आहे आणी दुसरीकडे आसाम, बिहार राज्यांमधे भयंकर पूर आले आहे. उन्हाळ्यात देशाच्या काही भागाततर 50 सेल्सीयसपर्यंत पारा वाढला होता नैसर्गिक संकटे खूप वाढत चालली आहे. असे निसर्गाचे असमतोल पणा मानवाच्या लोभामुळे व प्राकृतिक संसाधनांचा अती वापरामुळे घडून आले आहे. कोणतीही वस्तु तेव्हाच पुर्णपणे विकसीत होऊ शकते जेव्हा ती आपल्या नैसर्गीक वातावरणात असेल. आज निसर्गातील मौल्यवान वनौषधी, वने, नैसर्गीक संसाधने, जिवजंतु, वन्य प्राणि, पक्षी, नदी, डोंगर, हे सुंदर वातावरण आपले अस्तित्व संपविण्याचा मार्गावर आहे आणि याला फक्त एकच गोष्ट जबाबदार आहे तीं म्हणजे मानवाची स्वार्थ प्रवृत्ति. आज प्रत्येक राष्ट्र स्वताला विकसीत करण्याकरता धावपळ करीत आहेत. कचरा, ई-कचरा, वाढती लोकसंख्या, शहरीकरण, प्रदूषणाचे मोठ्या प्रमाणावर उत्सर्जन, ई-संसाधनांचा जास्त वापर, बदलत चालली जीवनशैली, वाढते नवनवीन आजार, अशा कारणांने मानवाचे आयुष्य धोक्यात आले आहेत. ग्लोबल वार्मींग, तापमानात सतत बदल, दुष्काळ, पूर, डोंगरी भाग घसरणे, सुपीक मातिमधे कमतरता असे पुष्कळसे गंभीर कारण पर्यावरणातील असमतोल पणा दर्शवितात.
निसर्गाचा संगोपणात मानवाची जबाबदारी:-
- जर पृथ्वीवरील निसर्गाचा बिघाड थांबवून त्यात सुधारणा केली तरच मानवजाती, पशुपक्षी, जिवजंतुचे अस्तित्व टिकू शकणार आहे. त्या करीता मानवाची भूमिका मोलाची आहे. थोडीशी जागृकता व थोडीशी मदतीची गरज आहे.
- सर्वप्रथम वने समुद्ध व्हायला हवी म्हणजे वृक्षतोडी वर पुर्णपणे नियंत्रण करून वनीकरणावरच लक्ष्य केद्रिंत करणे म्हणजे झाडे लावा, झाडे जगवा, वने समृद्ध करा.
- वने समृद्ध होतील तरच वन्य प्राण्यांना पक्षांना वनौषधींना आसरा मिळेल. वनक्षे़त्रात मानवाचे हस्तक्षेप थांबले पाहिजे. मानव सामाजिक प्राणि आहे त्यांनी आपली मर्यादा व जबाबदारी ओळखावी.
- लाकडी वस्तु किंवा त्या द्वारे तयार होणाऱ्या वस्तुंचा वापर शक्यतो कमीच करावा कारण होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडी केली जाते.
- अन्न धान्य व पाण्याचा वापर सांभाळून करावा कारण आज ही लाखो लोकं तहानलेली आणी उपाशी राहत आहेत.
- पर्यावरणाचा व निसर्गाचा सांभाळ करणे. संसाधनांचा, विजेचा, ईधनांचा जपून वापर व्हायला हवे.
- कागदाचा वापर कमी करावा कारण की कागद निर्मीती मधे खूप मोठ्या प्रमाणावर झाडे कापली जातात.
- स्वच्छतेचा निर्धार करणे, आधुनिक जिवनशैलीमधे बदल घडविणे.
- शासनाने सौर उर्जेचा वापर, रेन वाॅटर हार्वेस्टिंग करीता काही सक्त नियम व जनजागृती करायला हवी जेणेकरून प्रत्येक सर्वसामान्य वर्गापर्यंत याचा वापर सोपी होईल.
- येण्या-जाण्या करीता शक्यतो सार्वजनिक वाहनांचा वापर करावा, सायकल वापरावी व एकाच ठिकाणी जायचे असल्यास खाजगी वाहन शेयरिंग करून चालवावे.
- युज एंड थ्रो अशा वस्तूंना नाही म्हणा, रिसायकल होणाऱ्या वस्तुंचा वापर करावा. कचऱ्यात कमी आणावी.
- कोणत्याही व्यक्तीला भेटवस्तुचा स्वरूपात त्या व्यक्तीचा आवडीची रोपे द्यायला हवे.
- शेतात विषारी रासायनिक खतांचा वापर शक्यतो टाळावा.
- स्वच्छतेवर विशेष भर द्यावा, प्लॅस्टिक बंदी वर सहकार्य करावे.
- खुल्या वातावरणात कचरा जाळू नये. नेहमी कचरा टाकण्यासाठी कचराकुंडीचा वापर करावा.
- निसर्गाचा रक्षणाबद्ल जागृत होऊन दुसऱ्याना सुद्धा जागृत करायला हवे.
- निसर्गाचे सरंक्षण प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे तर सगळ्यां नागरिकांनी निसर्गाचा रक्षणाची शपथ घेतली पाहीजे.
प्रत्येक घटक म्हणजे हवा, माती, डोंगर, वने, जंगली प्राणि, वनौषधी, जिवजंतु, हिमशिखर, वाळवंट, समुद्र, नदी, झाड, खनिज संसाधन हे सर्व प्रकृतीशी संबंधीत आहेत यांचा प्राकृतिक रूपाने सांभाळ करणे म्हणजेच निसर्गाचे रक्षण करणे होय. मानवाने स्वार्थी प्रवृत्ती सोडून नेहमी परोपकाराची भावना बाळगायला हवी, कारण हे निसर्ग, पर्यावरण आपले आहे आणी याला सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. समाजात कधी कुठेही वाईट बातमी आपल्याला माहिती पडली तर आपण काळजी करीत बसण्याऐवजी आपणच समाजाप्रती आपले कर्तव्य म्हणून जबाबदारी पार पाडावी म्हणजे कोणाला दोष देवून, स्वताचा मनाचे खच्चीकरण करून, मनस्ताप करून काहीही मिळत नाही तेव्हा स्वत वैयक्तीक स्तरांवर अवलंबणाचा निर्धार केल्यास खऱ्या अर्थाने हा जागतिक निसर्ग सरंक्षण दिवस साजरा करता येईल.
डाॅ. प्रितम भि. गेडाम

