मंगलवार, 31 मई 2022

तंबाकू सेवन : खर्चीली बीमारियाँ और असमय दर्दनाक मौत (विश्व तंबाकू निषेध दिवस विशेष – 31 मई 2022) Tobacco use: costly illnesses and premature, painful deaths (World No Tobacco Day Special – May 31, 2022)


जगत में सबसे बुद्धिमान प्राणी मनुष्य है और यही मनुष्य अनेक बार अपनी बुरी आदतों को क्षणिक सुख का नाम देकर खुद को ही बर्बाद करके समाज में समस्याओं को निर्माण करने में प्रतिभागी बनता है। जीवन में वैसे ही अशुद्धता और विकारों का जाल फैला हुआ है उसमें नशा तो जिंदगी को पूरी तरह नर्क बना देता है। सहजता से उपलब्ध होनेवाला जहर अर्थात नशा “तंबाकू” है, जो मनुष्य को धीरे-धीरे अपने चंगुल में फंसा कर दर्दनाक तरीके से खत्म करता है। आज हमारे समाज में तंबाकू का जहर इस तरह फैल चुका है कि छोटे-छोटे बच्चे भी इसके गिरफ्त में है।

डब्ल्यूएचओ अनुसार मुख्य तथ्य :- तंबाकू अपने आधे उपयोगकर्ताओं की जान ले लेता है। विश्व के 1.3 बिलियन तंबाकू उपयोगकर्ताओं में से 80% से अधिक निम्न और मध्यम आय वाले देशों में रहते हैं। तंबाकू से हर साल 8 मिलियन से ज्यादा लोगों की मौत होती है। उन मौतों में से 7 मिलियन के आसपास प्रत्यक्ष तंबाकू के उपयोग का परिणाम है, जबकि लगभग 1.2 मिलियन मौत धूम्रपान न करने वाले है जो धूम्रपान करने वालों के धुएँ (सेकंड हैंड) के संपर्क में आने का परिणाम हैं। सेकेंड हैंड स्मोक वह धुंआ है जो बंद जगहों को भरता है जब लोग सिगरेट, बीड़ी जैसे तंबाकू उत्पादों को जलाते हैं। सेकेंड हैंड तंबाकू के धुएं के संपर्क में आने का कोई सुरक्षित स्तर नहीं है, यह समय से पहले मौत के साथ ही गंभीर हृदय और श्वसन रोगों का कारण बनता है। लगभग आधे बच्चे नियमित रूप से सार्वजनिक स्थानों पर तंबाकू के धुएं से प्रदूषित हवा में सांस लेते हैं, और हर साल 65,000 बच्चे धुएं के कारण होने वाली बीमारियों से मर जाते हैं। शिशुओं में, अचानक शिशु मृत्यु सिंड्रोम के जोखिम को बढ़ाता है। गर्भवती महिलाओं में, यह गर्भावस्था की जटिलताओं और जन्म के समय कम वजन का कारण बनता है।

अमेरिकन लंग एसोसिएशन अनुसार :- 2021 में युवा ई-सिगरेट उपयोगकर्ताओं में, हाई स्कूल के छात्रों में फ्लेवर्ड ई-सिगरेट का उपयोग 85.8% और मिडिल स्कूल के छात्रों में 79.2% था। धूम्रपान करने वालों की मृत्यु औसतन धूम्रपान न करने वालों की तुलना में 10 साल पहले होती है। हर दिन, 18 वर्ष से कम उम्र के लगभग 2,000 बच्चे अपने जीवन की पहली सिगरेट पीते हैं और 18 वर्ष से कम उम्र के 300 से अधिक बच्चे दैनिक सिगरेट पीने वाले बन जाते हैं। धूम्रपान, यू.एस. में हर साल 480,000 से अधिक समय से पहले होने वाली मौतों के लिए जिम्मेदार है, जिसमें सेकेंड हैंड धुएं से होने वाली 41,000 से अधिक मौतें शामिल हैं। हेल्थकेयर खर्च और अन्य आर्थिक नुकसान सालाना 300 अरब डॉलर से अधिक है।

देश में विभिन्न प्रकार के तंबाकू उत्पाद बहुत कम कीमतों पर सहज उपलब्ध हैं। ग्लोबल एडल्ट टोबैको सर्वे इंडिया, 2016-17 के अनुसार, भारत में लगभग 267 मिलियन वयस्क (15 वर्ष और अधिक) सभी वयस्कों का 29% तंबाकू के उपयोगकर्ता हैं। भारत में तंबाकू के उपयोग का सबसे प्रचलित रूप धुआं रहित तंबाकू है और आमतौर पर इस्तेमाल किए जाने वाले उत्पाद खैनी, गुटखा, तंबाकू के साथ सुपारी और जर्दा हैं। इस्तेमाल किए जाने वाले तंबाकू के धूम्रपान के रूप हैं बीड़ी, सिगरेट और हुक्का। 30.2% वयस्क इनडोर कार्यस्थलों में सेकेंड हैंड धुएं के संपर्क में आते हैं, 7.4% रेस्तरां में, 13.3% सार्वजनिक परिवहन और 21% युवा (13-15 वर्ष की आयु) संलग्न सार्वजनिक स्थानों में सेकेंड हैंड धुएं के संपर्क में हैं और 11% घर पर सेकेंड हैंड धुएं के संपर्क में हैं। धूम्रपान और सेकेंड हैंड धुएं के संपर्क में आने से हर साल लगभग 1.2 मिलियन भारतीयों की मौत हो जाती है, जो कुल मौतों का 9.5% है। धुंआ रहित तंबाकू के वैश्विक बोझ का 70% हिस्सा भारत में है। धुंआ रहित तंबाकू के सेवन से हर साल 230,000 से अधिक भारतीयों की मौत होती है। भारत में लगभग 90% मुंह के कैंसर धूम्रपान रहित तंबाकू के सेवन के कारण होते हैं। भारत में 27% कैंसर तंबाकू के सेवन के कारण होते हैं। तंबाकू की समाज को भारी कीमत चुकानी पड़ती है।

जब भी कोई आपको तंबाकू जन्य उत्पाद या अन्य कोई नशीला जहर साझा या ऑफर करता है तो समझ जाए की दर्दनाक मौत आपसे शेयर की जा रही है, जिसका अंत अत्यंत दुखद होता है। जीवन अमूल्य है, दुनियाभर की दौलत लुटा कर भी हम एक पल की जिंदगी नहीं खरीद सकते, फिर क्यों हम खुद के ही जान के दुश्मन बने बैठे है। सुख हो तो नशा, दुःख हो तो नशा, नशा करने का बस बहाना चाहिए, अब तो कई लोगों के जीवन में नशा रोजमर्रा का हिस्सा बन गया है। हमारे जीवन में सबसे ज्यादा हमारा ख्याल रखने वाले हम खुद है, अगर हमें खुद की ही सुध नहीं है तो हम जैसा गैरजिम्मेदार अन्य कोई नहीं, क्योंकि हम खुद ही अपनी चिता सजाने की तैयारी कर रहे है। आपको जानकर आश्चर्य होगा कि तंबाकू उत्पाद से जीतनी आमदनी होती है, उससे कई गुना ज्यादा तंबाकू द्वारा होने वाले गंभीर बीमारियों के इलाज पर खर्च होता है।

जीवन की ओर देखने का नजरिया बदलें, नशे के जहर से अपनी और अपनों की जिंदगियां बर्बाद न करें। दृढ़ निश्चय, इच्छाशक्ति, सकारात्मक विचार, जिम्मेदारी का अहसास और खुशनुमा माहौल हमें नशे से मुक्ति दिलाने में मदद करता है। किसी भी तरह के नशे से मुक्ति पाने में सरकार, एनजीओ, व्यसनमुक्ती केंद्र और अन्य मदद समूह हमेशा सहयोगी के रूप में हमारे साथ है। अभी से तंबाकू मुक्ति का प्रण लें, तंबाकू छोड़ने के लिए सहयोग या परामर्श हेतु नेशनल टोबैको क्विट लाइन सर्विसेज - 1800 112 356 (टोल फ्री) इस नंबर पर संपर्क कर सकते है या फिर 011-22901701 पर एक मिस्ड कॉल देकर रजिस्टर करें जो एक मुफ्त सेवा है, इसके अलावा www.nhp.gov.in/quit-tobacco वेबसाइट पर जाकर लॉगिन कर रजिस्टर कर सकते है, जीवन का मोल समझें, हमेशा नशा मुक्त रहें, तनावमुक्त जिये। 

डॉ. प्रितम भि. गेडाम

तंबाखूचे व्यसन म्हणजे महागडे आजार आणि अकाली वेदनादायक मृत्यू (जागतिक तंबाखू विरोधी दिन विशेष – ३१ मे २०२२)

माणूस हा जगातील सर्वात बुद्धिमान प्राणी आहे पण हाच माणूस कधी कधी आपल्या वाईट सवयींना क्षणिक आनंदाचे नाव देऊन समाजात समस्या निर्माण करण्यात सहभागी होतो. जीवनात तसेच अशुद्धता व दुर्गुणांचे जाळे पसरलेले आहे आणि त्यात नशा जीवनाला पूर्णपणे नरक बनवते. नशा कोणताही असो, तो वाईटच असतो. सहज उपलब्ध होणारे विष अर्थातच नशा म्हणजे "तंबाखू", जे हळूहळू माणसाला आपल्या तावडीत अडकवून वेदनादायकपणे संपवते. आज तंबाखूचे विष आपल्या समाजात अशाप्रकारे पसरले आहे की लहान मुलेही त्याच्या विळख्यात आहेत.

 डब्ल्यूएचओ नुसार मुख्य तथ्ये: - तंबाखूमुळे त्याच्या निम्म्या वापरकर्त्यांचा मृत्यू होतो. जगातील १.३ अब्ज तंबाखू वापरकर्त्यांपैकी ८०% पेक्षा जास्त लोक कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये राहतात. तंबाखूमुळे दरवर्षी ८ दशलक्षाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. त्यापैकी सुमारे ७ दशलक्ष मृत्यू थेट तंबाखूच्या वापरामुळे होतात. तर अंदाजे १.२ दशलक्ष मृत्यू हे धूम्रपान न करणार्‍यांचे आहेत जे धूम्रपान करणाऱ्यांच्या (सेकंड हैंड) संपर्काचे परिणाम आहेत. लोक सिगारेट, बिडी यांसारखे तंबाखूजन्य पदार्थ जाळतात तेव्हा बंद जागा भरून निघणारा धूर म्हणजे सेकंडहँड स्मोक. दुसऱ्यांद्वारे केलेल्या धूम्रपानाचा धुराच्या संपर्कात येण्याची कोणतीही सुरक्षित पातळी नाही, यामुळे अकाली मृत्यू तसेच हृदय व श्वसनाचे गंभीर आजार होतात. जवळपास निम्मी मुले सार्वजनिक ठिकाणी तंबाखूच्या धुरामुळे प्रदूषित हवेत नियमितपणे श्वास घेतात आणि दरवर्षी ६५००० मुले धुरामुळे होणाऱ्या आजारांमुळे जीव गमावतात. लहान मुलांमध्ये, अचानक शिशु मृत्यू सिंड्रोमचा धोका वाढतो. गर्भवती महिलांमध्ये, यामुळे गर्भधारणात समस्या आणि जन्माच्या वेळी मुलांचे वजन कमी होते.

अमेरिकन लंग असोसिएशनच्या मते:- अमेरिकेत २०२१ मध्ये तरुण ई-सिगारेट वापरकर्त्यांमध्ये, हायस्कूल विद्यार्थ्यांमध्ये फ्लेवर्ड ई-सिगारेटचा वापर ८५.८% आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये ७९.२% होता. धूम्रपान न करणाऱ्यांपेक्षा धूम्रपान करणाऱ्यांचा मृत्यू सरासरी १० वर्षे आधी होतो. दररोज, १८ वर्षांखालील सुमारे २००० मुले त्यांच्या आयुष्यातील पहिली सिगारेट ओढतात आणि १८ वर्षाखालील ३०० पेक्षा जास्त मुले दररोज सिगारेट ओढणारे बनतात. धूम्रपान, हे यूएस मध्ये दरवर्षी ४८०००० पेक्षा जास्त अकाली मृत्यूसाठी जबाबदार आहे, ज्यात ४१००० पेक्षा जास्त मृत्यूंचा समावेश सेकंडहँड धुरामुळे मृत्यू होतो. तंबाखूमुळे आरोग्यसेवा खर्च आणि इतर आर्थिक नुकसान वार्षिक ३०० अब्ज डॉलर पेक्षा जास्त आहे.

देशात विविध प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ अत्यंत कमी किमतीत सहज उपलब्ध आहेत. ग्लोबल एडल्ट टोबॅको सर्व्हे इंडिया, २०१६-१७ नुसार, भारतातील सुमारे २६७ दशलक्ष प्रौढ (१५ वर्षे आणि त्यावरील) तंबाखूचे सेवन करणारे आहेत, जे सर्व प्रौढांपैकी २९% आहेत. भारतात तंबाखूच्या वापराचा सर्वात प्रचलित प्रकार म्हणजे धूररहित तंबाखू, खैनी, गुटखा, तंबाखूसह सुपारी आणि जर्दा ही सामान्यतः वापरली जाणारी उत्पादने आहेत. तंबाखूचे धूम्रपानाचे प्रकार म्हणजे बिडी, सिगारेट आणि हुक्का. ३०.२% प्रौढांना कामाच्या ठिकाणी, ७.४% रेस्टॉरंटमध्ये, १३.३% सार्वजनिक वाहतुकीवर आणि २१% तरुण (१३-१५ वर्षे) बंदिस्त सार्वजनिक ठिकाणी सेकंडहँड स्मोकच्या संपर्कात आहेत आणि घरी ११% सेकंडहँड स्मोकच्या संपर्कात आहेत. दरवर्षी सुमारे १.२ दशलक्ष भारतीय धूम्रपान आणि सेकंडहँड स्मोकच्या संपर्कामुळे मुर्त्यूमुखी पडतात, जे एकूण मृत्यूंपैकी ९.५% आहे. धूरविरहित तंबाखूच्या जागतिक ओझ्यापैकी ७०% भारताचा वाटा आहे. धूररहित तंबाखूच्या वापरामुळे दरवर्षी २३०००० हून अधिक भारतीयांचा मृत्यू होतो. भारतात सुमारे ९०% तोंडाचा कर्करोग धूरविरहित तंबाखूच्या वापरामुळे होतो. भारतातील २७% कर्करोग तंबाखूच्या सेवनामुळे होतात. समाजाला तंबाखूची मोठी किंमत मोजावी लागते.

जेव्हा कोणी तुम्हाला तंबाखूजन्य पदार्थ किंवा इतर कोणतेही मादक विष सामायिक करते किंवा ऑफर करते तेव्हा समजून घ्या की तुमच्यासोबत एक वेदनादायक मृत्यू सामायिक केली जात आहे, ज्याचा शेवट खूप दुःखद आहे. आयुष्य अनमोल आहे, जगभरातील संपत्ती घालवून सुद्धा आपण एक क्षणाचे आयुष्य विकत घेऊ शकत नाही, मग आपण नशेचा आहारी जावून आपल्याच जीवाचे शत्रू का होतोय. सुख असेल तर नशा, दु:ख असेल तर नशा, आता अनेकांच्या आयुष्यात नशा हा दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे, नशेसाठी फक्त निमित्त हवे असते. जीवनात आपली सर्वात जास्त काळजी घेणारे आपणच असतो. जर आपण स्वतःची काळजी घेतली नाही तर आपल्यासारखा बेजबाबदार दुसरा कोणी नाही कारण आपणच स्वतः आपली चिता सजवण्याच्या तयारीत असतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, तंबाखूजन्य पदार्थांपासून जेवढे उत्पन्न मिळते, त्यापेक्षा तंबाखूमुळे होणाऱ्या गंभीर आजारांचा उपचारावर अनेक पटींनी जास्त खर्च होतो.

जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला, नशेच्या विषाने आपले आणि आपल्या प्रियजनांचे आयुष्य वाया घालवू नका. जिद्द, इच्छाशक्ती, सकारात्मक विचार, जबाबदारीची जाणीव आणि आनंददायी वातावरण आपल्याला व्यसनापासून मुक्त होण्यास मदत करते. शासन, स्वयंसेवी संस्था, व्यसनमुक्ती केंद्रे आणि इतर मदत गट कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून मुक्ती मिळवण्यासाठी सदैव आपल्या सोबत आहेत. तंबाखू सोडण्याबाबत मदतीसाठी किंवा सल्ल्यासाठी, नॅशनल टोबॅको क्विट लाइन सर्व्हिसेस - १८०० ११२ ३५६ (टोल फ्री) किंवा ०११- २२९०१७०१ वर मिस्ड कॉल देऊन नोंदणी करा, ही शासनाची एक विनामूल्य सेवा आहे, तसेच www.nhp.gov.in/quit-tobacco वेबसाइटवर लॉग इन करून नोंदणी करू शकता. जीवनाचे मूल्य समजून घ्या, नेहमी व्यसनमुक्त रहा, तणावमुक्त जगा.

डॉ. प्रितम भि. गेडाम

मंगलवार, 17 मई 2022

हाइपरटेंशन कहीं जानलेवा न बन जाये (विश्व उच्च रक्तचाप दिवस विशेष - 17 मई 2022) Hypertension should not become fatal (World Hypertension Day Special - 17 May 2022)

 

हायपरटेंशन अर्थात उच्च रक्तचाप या हाई ब्लड प्रेशर वह स्थिती हैं जिसमें धमनियों में रक्त का दबाव बढ़ जाता है, दबाव की इस वृद्धि के कारण, रक्त की धमनियों में रक्त का प्रवाह बनाये रखने के लिये हृदय को सामान्य से अधिक काम करने की आवश्यकता पड़ती हैं। उच्च रक्तचाप मे ब्लड प्रेशर बहुत अधिक होता है। उच्च रक्तचाप यह गंभीर स्वास्थ्य जटिलताओं का कारण बन सकता है और हृदय रोग, स्ट्रोक और कभी-कभी मृत्यु के जोखिम को बढ़ा सकता है, यह साइलेंट किलर की तरह काम करता है। हर साल विश्व उच्च रक्तचाप दिवस 17 मई को दुनियाभर में जनजागृकता के लिए मनाया जाता है, इस वर्ष विश्व उच्च रक्तचाप दिवस 2022 की थीम “अपने रक्तचाप को सटीक रूप से मापें, इसे नियंत्रित करें, दीर्घायु जीवन जियें” यह है।

विश्व स्वास्थ्य संगठन अनुसार, उच्च रक्तचाप या हाई ब्लड प्रेशर एक गंभीर चिकित्सा स्थिति है जो हृदय, मस्तिष्क, गुर्दे और अन्य बीमारियों के जोखिम को बढ़ा देती है। अफ्रीकी क्षेत्र में उच्च रक्तचाप (27%) का उच्चतम प्रसार है जबकि अमेरिका में उच्च रक्तचाप (18%) का प्रसार सबसे कम है। दुनिया भर में 30-79 वर्ष की आयु के अनुमानित 1.28 अरब वयस्कों को उच्च रक्तचाप है, जिनमें से अधिकांश (दो-तिहाई) निम्न और मध्यम आय वाले देशों में रहते हैं। उच्च रक्तचाप से ग्रस्त अनुमानित 46% वयस्क स्थिति से अनजान है। उच्च रक्तचाप वाले आधे से भी कम वयस्कों (42%) का निदान और उपचार किया जाता है। उच्च रक्तचाप से ग्रस्त 5 में से लगभग 1 वयस्क (21%) में यह नियंत्रण में होता है। उच्च रक्तचाप दुनिया भर में अकाल मृत्यु का एक प्रमुख कारण है।

लैंसेट अध्ययन के अनुसार, 2016 में भारत में कुल मौतों में हृदय रोग और स्ट्रोक ने लगभग 28.1% का योगदान दिया। हाइपरटेंशन मौत और विकलांगता का चौथा सबसे बड़ा रिस्क फैक्टर भी है। भारत में लगभग 20 करोड़ वयस्कों में हाई ब्लड प्रेशर की समस्या है। भारत दुनिया में उच्च रक्तचाप के निदान की सबसे कम दरों में से एक है। देश में 60% से 70% के बीच पुरुष और महिलाएं अपनी वास्तविक स्थिति से अनजान हैं। भारत की स्थिति 200 देशों में उच्च रक्तचाप निदान की दर में महिलाओं के लिए 193 वें और पुरुषों के लिए 170 वें स्थान पर है। निदान की ऐसी निम्न स्थिति उच्च रक्तचाप की बीमारी को घातक स्तर पर पहुँचाती है, जिससे लोगों को दिल के दौरे और स्ट्रोक जैसी जानलेवा स्थितियों का शिकार होना पड़ता है। भारत में, उच्च रक्तचाप के साथ रहने वाले वयस्कों (30-79 वर्ष) का प्रतिशत 1990 में 25.52% से बढ़कर 2019 में पुरुषों में 30.59% और महिलाओं में 26.53% से 29.54% हो गया, जैसा कि द लैंसेट में प्रकाशित अंतर्राष्ट्रीय अध्ययन में कहा गया है।

भारत में उच्च रक्तचाप का समय पर पता लगाने और बेहतर उपचार से हृदय सम्बंधित रोगों का बोझ कम हो जाएगा। यह अनुमान लगाया गया है कि भारत में सिस्टोलिक रक्तचाप में 2 मिमी की व्यापक कमी, कोरोनरी धमनी की बीमारी के कारण 151,000 मौतों को रोकेगी और स्ट्रोक के कारण 153,000 मौतों को रोका जा सकेगा। उच्च रक्तचाप को कम करने से दिल का दौरा, स्ट्रोक और गुर्दे की क्षति के साथ-साथ अन्य स्वास्थ्य समस्याओं से बचाव होता है। इसके लिए कुछ महत्वपूर्ण बातों पर ध्यान देने की आवश्यकता है जैसे :- नमक का सेवन कम करना (प्रतिदिन 5 ग्राम से कम), अधिक फल और ताजी हरी, अंकुरित सब्जियां खाना, तला-भुना, पापड़, अचार, चाट-मसाला खाने पर लगाम लगाना। नियमित व्यायाम, टहलना, पैदल चलना, साइकिल चलाना, एरोबिक, तैराकी जैसे हल्के-फुल्के शारीरिक व्यायाम करना, वजन संतुलित रखना, सभी तरह के नशे से दूरी, पौष्टिक खाद्य लेना व संतृप्त वसा में उच्च खाद्य पदार्थों का सेवन सीमित करना, अब तो  आधुनिक जीवन शैली से दूरी बनाना भी बहुत जरूरी हो गया है। उच्च रक्तचाप की समस्या होने पर चिकित्सक से इलाज करना, चिकित्सक द्वारा बताये गए दिशानिर्देशों का कड़ाई से पालन करना, तनाव को कम करना, खुशनुमा माहौल बनाये  रखना, सकारात्मक सोच-विचार, खुद पर ग़ुस्सा हावी न होने देना, विचारशक्ति बढ़ाना, शारीरिक और मानसिक मजबूती के लिए योग करना। सबसे जरूरी है खान-पान पर उचित नियंत्रण रखना क्योंकि थोडेसे चटोरी जुबान के स्वाद के चक्कर में अपने पूरे शरीर को खराब कर तड़पा-तड़पा कर मारना और महंगी बीमारियों का शिकार होना कहां की समझदारी है, इस विषय पर गहनता से विचार करना बहुत जरुरी है।

आज भागमभाग के वातावरण में सभी लोग खुद को व्यस्थ बनाये हुए है, खाद्य मिलावट, प्रदुषण, शोर, असंस्कृत व्यवहार, प्रकृति का अतिदोहन, यांत्रिक संसाधनों का अत्यधिक उपभोग के कारण जीवन उलझनभरा हो गया है, ऐसे में अपने सेहत को संभालना बहुत जरुरी है। तनावमुक्त जीवन के द्वारा हम हाइपरटेंशन के साथ ही अनेक घातक बीमारियों से दूर रह सकते है। तनाव नियंत्रण में रखना, हमने अपने देश के नेताओं से सीखना चाहिए, नेताओं की कितनी भी उम्र हों, सत्तापक्ष या विपक्ष में हों, उनपर कितने भी गंभीर आरोप लगे हों या फिर किसी घोटाले में नाम आया हों, या किसी ने उनके लिए अपशब्द, कटुभाषा का प्रयोग किया हों, नेता हर परिस्थिति में सकारात्मक रहकर अपने धैर्य का परिचय देते हुए हमेशा आगे बढ़ते रहते है, नेता हर स्थिति में सक्षम बने रहते है, उम्मीद का दामन नहीं छोड़ते, सभी पार्टियों से संपर्क बनाये रखते है, कितनी भी व्यस्त दिनचर्या हो, वे हमेशा ऊर्जावान नजर आते है, वे सामान्य व्यक्ति की तरह छोटी-छोटी बात पर अपना आपा नहीं खोते है, ये जिंदादिली प्रत्येक मनुष्य ने सीखनी चाहिए। परोपकारी भावना और सद्गुणों को अपनाएं, समाधानी बनना सीखें, प्रकृति से जुड़े, खुश रहें, तनावमुक्त जीवन जियें। 

डॉ. प्रितम भि. गेडाम

 

उच्च रक्तदाब आहे जीवघेणा, वेळेत सावध व्हा... (जागतिक उच्च रक्तदाब दिन विशेष - १७ मे २०२२) High blood pressure is life-threatening, be careful in time! (World High Blood Pressure Day Special - 17 May 2022)

 

उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन किंवा हाय ब्लड प्रेशर ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये रक्तवाहिन्यांमधील रक्ताचा दाब वाढतो, या दबावाच्या वाढीमुळे, रक्तवाहिन्यांमधील रक्त प्रवाह राखण्यासाठी हृदयाला सामान्यपेक्षा जास्त काम करावे लागते. उच्च रक्तदाबामध्ये, हृदयावर रक्त पंप करण्याकरिता ताण वाढतो त्यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवतात आणि हृदयविकार, स्ट्रोक आणि काहीवेळा मृत्यूचा धोका सुद्धा वाढतो, उच्च रक्तदाब मूक मारेकरी म्हणून काम करीत असतो. जागतिक उच्च रक्तदाब दिन दरवर्षी 17 मे रोजी जगभरात जनजागृतीसाठी साजरा केला जातो. या वर्षी जागतिक उच्च रक्तदाब दिन 2022 ची थीम आहे "तुमचा रक्तदाब अचूकपणे मोजा, ​​नियंत्रित करा, दीर्घायुष्य जगा".

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती आहे ज्यामुळे हृदय, मेंदू, मूत्रपिंड आणि इतर रोगांचा धोका वाढतो. आफ्रिकन देशात उच्चरक्तदाबाचे प्रमाण सर्वाधिक आहे (27%), तर यूएसमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण सर्वात कमी आहे (18%). जगभरातील 30-79 वर्षे वयोगटातील अंदाजे 1.28 अब्ज प्रौढांना उच्च रक्तदाब आहे, त्यापैकी बहुसंख्य (दोन तृतीयांश) कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये राहतात. उच्च रक्तदाब असलेल्या अंदाजे 46% प्रौढांना या स्थितीबद्दल माहिती नसते. उच्च रक्तदाब असलेल्या निम्म्याहून कमी प्रौढांचे (42%) निदान आणि उपचार केले जातात. उच्च रक्तदाब असलेल्या 5 पैकी 1 प्रौढ व्यक्तीमध्ये (21%) हे नियंत्रणात असते. उच्च रक्तदाब हे जगभरातील अकाली मृत्यूचे प्रमुख कारण आहे.

लॅन्सेट अभ्यासानुसार 2016 मध्ये भारतातील एकूण मृत्यूंपैकी 28.1% मृत्यू हृदयरोग आणि स्ट्रोकचे होते. उच्च रक्तदाब हा मृत्यू आणि अपंगत्वाचा चौथा सर्वात मोठा धोक्याचा घटक आहे. भारतातील सुमारे 200 दशलक्ष प्रौढांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे. भारतात उच्च रक्तदाब निदानाचा दर जगातील सर्वात कमी दरांपैकी एक आहे. देशातील 60% ते 70% पुरुष आणि स्त्रिया त्यांच्या वास्तविक स्थितीबद्दल अनभिज्ञ आहेत. 200 देशांमध्ये उच्च रक्तदाब निदान दरामध्ये भारत महिलांसाठी 193 वा आणि पुरुषांसाठी 170 व्या क्रमांकावर आहे. अशा कमी निदानामुळे उच्च रक्तदाबाचा रोग जीवघेणा ठरतो, ज्यामुळे लोकांना हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसारख्या जीवघेण्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार भारतात, उच्च रक्तदाब असलेल्या प्रौढांची (30-79 वर्षे) टक्केवारी 1990 मध्ये 25.52% वरून पुरुषांमध्ये 30.59% आणि 26.53% महिलांमध्ये 29.54% पर्यंत वाढली आहे.

भारतात उच्चरक्तदाबाचे लवकर निदान आणि चांगले उपचार केल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचे ओझे कमी होईल. असा अंदाज आहे की भारतातील सिस्टोलिक ब्लड प्रेशरमध्ये 2 मिमी-व्यापी घट झाल्यामुळे कोरोनरी धमनी रोगामुळे होणारे 151,000 मृत्यू आणि स्ट्रोकमुळे 153,000 मृत्यू टाळता येतील. उच्च रक्तदाब कमी केल्याने हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि किडनीचे नुकसान तसेच इतर आरोग्य समस्यांपासून संरक्षण होते. यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे जसे की: उच्च रक्तदाबावर डॉक्टरांनी सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करणे, मिठाचे सेवन कमी करणे (दररोज 5 ग्रॅमपेक्षा कमी), फळे आणि ताज्या हिरव्या, अंकुरलेल्या भाज्या खाणे, तळलेले, पापड, लोणचे, चाट-मसाला सारख्या पदार्थ टाळणे. नियमित व्यायाम, चालणे-फिरणे, सायकल चालवणे, साधे-सोपे शारीरिक व्यायाम करणे जसे एरोबिक, पोहणे, संतुलित वजन राखणे, सर्व प्रकारच्या मादक पदार्थांपासून दूर राहणे, पौष्टिक आहार घेणे आणि संपृक्त चरबीयुक्त पदार्थांचे सेवन मर्यादित करणे, आता तर आधुनिक जीवनशैली पासून ही अंतर राखणे गरजेचे झाले आहे. तणाव कमी करणे, आनंदी वातावरण राखणे, सकारात्मक विचार करणे, रागाचा भार आपल्यावर न येऊ देणे, विचारशक्ती वाढवणे, शारीरिक आणि मानसिक बळकटीसाठी योगासने करणे महत्वाचे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाण्या-पिण्यावर योग्य नियंत्रण ठेवणं, कारण जिभेचा थोडाश्या चवीकरीता संपूर्ण शरीर बिघडवणं आणि महागड्या आजारांना बळी पडणं हे कुठलं शहाणपणाचं आहे. या विषयाचा सखोल विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.

आज प्रत्येकजण दगदगीच्या वातावरणात स्वतःला व्यस्त ठेवण्यात मग्न आहे. अन्नातील भेसळ, प्रदूषण, गोंगाट, असंस्कृत वर्तन, निसर्गाचे अतिशोषण, यांत्रिक संसाधनांचा अतिवापर, यामुळे जीवन गुंतागुंतीचे झाले आहे. अशा परिस्थितीत आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तणावमुक्त जीवनाद्वारे आपण उच्च रक्तदाब तसेच अनेक घातक आजारांपासून दूर राहू शकतो. तणाव नियंत्रणात ठेवणे आपण आपल्या देशातील नेत्यांकडून शिकले पाहिजे. नेत्यांचे वय कितीही असो, सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष, त्याच्यावर कितीही गंभीर आरोप झाले असेल, किंवा कोणी त्याच्याबद्दल अपशब्द वापरले, कडवट भाषा वापरली असेल, नेते नेहमी पुढे जाण्याचा प्रयंत्न करतात, प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहून संयम दाखवतात, प्रत्येक परिस्थितीत सक्षम राहतात, आशा सोडत नाही, सर्व पक्षांशी संपर्क ठेवतात, दिनक्रम कितीही व्यस्त असले तरी ते नेहमी उत्साही दिसतात, सामान्य माणसाप्रमाणे ते लहानसहान गोष्टींवर आपला संयम गमावत नाहीत, ही जिंदादिली प्रत्येक माणसाने शिकली पाहिजे. परोपकाराची भावना बाळगा आणि सद्गुण घ्या, समाधानी व्हायला शिका, निसर्ग नुरूप जगायला शिका, आनंदी रहा, तणावमुक्त जीवन जगा.

डॉ. प्रितम भि. गेडाम