शहरात घणदाट वस्त्या वाढत चालल्या आहेत त्यानुसार शहरातून शेकडो टन कचरा दररोज निर्माण होतो आणि एवढ्या भरमसाट कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे खूप जबाबदारीचे काम आहे, तेव्हा हे काम करण्यात सर्व नागरिकांची महत्वाची भूमिका आहे की त्यांनी शासकीय पालिकेचा कामात सहकार्य करावे. शहरात अपार्टमेंट सोसायटी खूप वाढत आहेत पण पुष्कळदा तर सोसायटीचा आजूबाजूला, खाली जागेवर व वस्तीचा कडेलाच खूप मोठी कचऱ्याचे ढीग आढळून येतात. काही ठिकाणीतर फ्लॅटमधून बालकनीतून लोक सरळ केरकचरा खाली फेकतात. कुणी कोणाचा विचार करीत नाही, एकामेकांचे बघून दूसरे लोकही त्या असभ्य वागणुकी चे अनुसरण करतात व नंतर सगळेच ऐकामेकाचे उदाहरण देवुन तसेच वागायला लागतात, अशी आहे आपल्या शिक्षीत समाजाची वास्तविकता. जर कोणी सभ्य माणसाने कचरा फेकण्यावर मनाई केली तर ती लोक आपली चूक सुधारणा न करता उलट भांडायला शीवीगारी व कधी-कधी तर मारामारी करायला सुद्धा तयार होतात, काही-काही लोक तर अशे सुद्धा म्हणतात की आम्ही घाण करू तुमच्याने जे शक्य होईल ते करा अर्थात स्वच्छता फक्त स्वतःपुरती व घरापुरती ठेवतात पण आपल्या खराब वागणुकी मुळे समाजाला जो त्रास होतो त्या बद्दल लोक विचारच करीत नाही यात त्यांचा अशुद्ध विचारांचा दोष आढळून येतो.
मानवाला
जगण्याकरीता स्वच्छ वातावरण, शुद्ध पाणी, हवा, पौष्टिक अन्न व स्वस्थ परीसराची गरज
असते नाहीतर आयुष्य आजाराचे घर बनते. जागतिक स्तरावर अन्य देशांचा तुलनेत
स्वच्छतेबद्दल भारतातील लोकांमधे जागृकता कमी दिसून येते. जेव्हा मनात स्वच्छतेचा
विचार येतो तेव्हा मानव फक्त स्वतःचाच विचार करतो, समाजाप्रती आपल्या
कर्तव्याबद्दल नाही. नेहमी लोक कुठेही कचरा, घाण करतांनी दिसतात. कचऱ्यामुळे डास, माश्या,
कीड़े, विषाणू निर्माण होतात आणि परिसर घाण करून आजार पसरवतात. ज्या परिसरात आपण
वावरतो त्या परिसराला आपणच नष्ट करतोय ही समाजासाठी खूप लाजीरवाणी गोष्ट आहे.
विदेशात स्वच्छतेवर खूप मोठ्या प्रमाणावर कामे केली जातात. स्वच्छतेत गुन्हा आढळल्यास
संबंधीत माणसाला कोठडी सक्तमजुरी व मोठी रकम सुद्धा दंड स्वरूपात आकारण्यात येते.
बाहेरच्या देशात स्वच्छतेचे कायदे खूप कडक आहेत तेव्हाच तर तिथले परिसर एवढे सुंदर
स्वच्छ आणि प्रगतीशिल दिसतात कारण शिस्तबद्धपणे कायद्याचे पालन केले जाते ह्या
करीता प्रत्येक नागरिकाला समाजाप्रती स्वतःचा जबाबदारीची जाण असणे गरजेचे आहे.
मागच्या काही वर्षात जागतिक स्तरावर प्रदूषण, घाण, भेसळ, ईंधन व रासायनिक
पदार्थांचा खूप जास्त वापर, वृक्षतोडी अशा कारणांनी पर्यावरणात असंतुलनपणा वाढला
आहे ज्यामुळे नैसर्गिक आपदा व नवनवीन आजारात खूप वाढ होत आहे. अशा दूषित वातावरणामुळे
मानवाची सरासरी वय कमी होत आहे सोबतच त्यांची कार्यक्षमता, रोगप्रतिकारक क्षमता देखील
कमी होत आहे.
आपला
देश सण व प्रेक्षणीय स्थळा करीता प्रसिद्ध आहे, वर्षभर लोक सणासुदीत फिरायला बाहेर
जातात, सहलीला जातात, सण साजरे करतात पण स्वच्छतेची जागृकता नसल्या कारणाने मोठ्या
प्रमाणात प्रेक्षणीय स्थळे, नदी, तलाव, समुद्र किनारपट्टी, ऐतिहासिक भवन, किल्ले, निसर्गरम्य
ठिकाण आणि इतर ठिकाणी घाण व कचरा दिसून येते, ज्यामुळे आपले परिसर खराब होते आणी
त्याचा दुष्परिणाम मानव, प्राणी, वन अर्थात पर्यावरणाचा प्रत्येक घटकावर होतो.
स्वच्छते करिता काही उपाय
- बाहेर कुठेही जाताना एक लहानशी पिशवी नेहमी सोबत
बाळगावी, आपल्याद्वारे कुठल्याही ठिकाणी कचरा व्हायला नको, जर झाल्यास तो कचरा
सोबत असलेल्या पिशवीत साठवायचा आणि जिथे कुठे ही कचरापेटी दिसेल तर आपल्या पिशवीतील
कचरा त्या कचरापेटीत टाकावा.
- कचऱ्या संदर्भात तक्रार आणी सुझाव
संबंधी प्रत्येक नगर व महानगर पालिकेत शासनातर्फे नागरिकांचा सुविधेकरिता हेल्पलाईन
नंबर व मोबाईल अँप असायला हवे, यात सोशल मीडियाचा फार उत्कृष्ट वापर होऊ
शकतो.
- कचऱ्याच्या समस्येचे गांभीर्य सगळ्यांना
समजले पाहिजे, त्याकरीता शासनाद्वारे सार्वजनिक ठिकाणी घाण करण्यावर मोठा दंड
आकारायला हवे सोबतच सक्तमजुरीची ही कायद्यात तरतुदी केल्या पाहिजेत, अशा
कायद्याचे शिस्तीने पालन व्हायला हवे.
- प्रत्येक झोन प्रमाणे कचऱ्या संबंधित
समस्येवर संबंधित अधिकारी व कर्मचारीवर्ग नागरिकांना प्रत्यक्ष भेटून कचऱ्याचा
समस्या, त्यामुळे होणारे आजार, आजाराचा रोकथामात नागरिकांची भूमिका, कचऱ्याचा
विल्हेवाट लावण्यात शासनाचे धोरण व नवीन उपाययोजना अशा सगळ्या महत्वाचा बाबींवर
दर महिन्याला मिटींग, कार्यक्रम, कार्यशाळा व्हायला हवी.
- पालिकेचा कामात देखील पारदर्शकता
यावी म्हणून सर्व कामाचा व्यवहार, खर्च, व्यवस्थापन विभागाबद्दल माहिती व
जनतेचा तक्रारीवर अद्यावत निवारण माहिती नागरिकांकरीता ऑनलाईन असायला हवी व रोजप्रमाणे
माहिती सुद्धा अपडेट असलीच पाहीजे.
- नदी हे नाल्याचे स्वरूपात बदलत आहे,
शेतीतील भूमीची उत्पन्न क्षमता कमी होत आहे, वृक्षतोडीमुळे जंगलाचे क्षेत्रफळ
देखील झपाट्याने कमी झाले आहे. पाणी, हवा, ध्वनी प्रदूषण खूप जास्त प्रमाणात वाढले
आहे, ही मानवी समाजाकरीता धोक्याचे वळण आहे म्हणून वेळीच जागृक होऊन
शिस्तबद्ध प्रमाणे सर्वांनी कायद्याचे पालन करायला हवे आणी स्वच्छतेचा मोहीम मध्ये
आवर्जून सहकार्य करायला पाहीजे.
- माणूस आजारावर खूप मोठ्याप्रमाणात
पैसा व वेळ खर्च करतो आणि त्याला मानसिक
त्रास होतो तो वेगळा. जर सर्वांनी स्वच्छता प्रदूषण नियंत्रण व समाजाचा
सुरक्षेवर लक्ष दिले तर आजारासंबंधी खुप मोठी समस्या दुर होईल व स्वस्थ
वातावरण निर्माण करण्यात सर्वोत्तम उपलब्धी मिळेल.
- प्रत्येक घटक एकमेकांशी संबंधित असतो
आणि एकाचा प्रभाव दुसऱ्यावर होतो म्हणून इंधनाचा वाढता वापर व नैसर्गिक असमतोलपणा
नियंत्रण करण्याकरीता वनीकरणाला जास्त महत्व दिले पाहिजे. रेन वॉटर हार्वेस्टिंग,
उर्जेची बचत, इंधनाचा सिमीत वापर, सौर उर्जेच्या वापरावर भर दिले पाहीजे.
- प्रत्येक वस्तु टाकावू नसते जर
कुणी गरजू असेल तर आपल्याकडे ती नको असलेली वस्तु आपण त्यांना देवू शकतो,
पुष्कळशा वस्तु रिसायकल सुद्धा होऊ शकतात, कचऱ्याचे घरीच वर्गीकरण करू शकतो, कचऱ्यात
जाणाऱ्या अन्न व भाजीपाल्यापासून खत तयार करू शकतो, टाकावू वस्तू पासून खेळणी
व सुंदर कलाकृती व आवश्यक वस्तु तयार करू शकतो अशा कित्येक गोष्टी कचऱ्यापासून
निर्माण होतात व ह्यामुळे कचरा कमी करण्यात मदत होईल.
- इलेक्ट्रानिक कचरा व वैद्यकीय
कचरा खूप घातक विषारी असतो तेव्हा त्या कचऱ्याची विल्हेवाट कळे शासनाने गंभीरतेने
विशेष लक्ष द्यायला हवे. दक्ष नागरिक म्हणून आपणही शासनाचा कामात सहकार्य
करायला हवे.
- ज्या वातावरणात आपण वावरतो तिथल्या
हवामानाचा, स्वच्छतेचा सरळ परिणाम मानवी आरोग्यावर होतो तेव्हा प्रत्येकाने
आपल्या परिसराला आपले घर अशी विचारधारा ठेवून कामे केली तर संपूर्ण वातावरण स्वच्छ
सुंदर व आनंददायक राहण्यास मदत होईल.
आठवड्यात किंवा पंधरवाड्याचा कालावधीत
जेव्हा शक्य होईल तेव्हा व सुट्टीचा दिवशी आपल्या वस्तीमधे, परिसरात, सार्वजनिक ठिकाणी
स्वच्छतेची मोहीम, वनीकरण, श्रमदान, असहाय्य यांना सहकार्याची मदत अशी सामाजिक जबाबदारी
म्हणून प्रत्येक नागरिकांनी शक्य होईल तेवढे तरी अशा कार्यक्रमात सहभाग द्यायला
पाहीजे. आपल्याला समाजातील कचरा योग्य रीतीने निस्तारायचे असेल तर लोकांचा सहभाग
खूप गरजेचा आहे. लोकांचा सहभाग तेव्हाच मिळू शकते जेव्हा लोक स्वमनाने तयार होऊन
आपली जबाबदारी समझतील, त्या करीता त्यांचा मानसिकते मधे सुद्धा बदल घडविणे गरजेचे
आहे, अर्थातच समाज शुद्ध करण्यासोबतच माणसाचे विचार देखील शुद्ध करायचे आहे हा ही
एक स्वच्छतेचाच भाग आहे. निस्वार्थपणे कुणाची मदत करून बघा, एखाद्याला दुःखात मदत करून
बघा, कुणी रडत्याचा चेहऱ्यावर हसू आणून बघा, यात मिळणारा आनंद व समाधान वेगळाच असतो
जो तुम्ही कधीही कुठून विकत घेवू शकत नाही. बाहेरचा कचरा मानवी आरोग्याला आजार
देतो पण मानवाचा आतील कचरा मानसिक विकृतीला जन्म देतो आणि याचे फार गंभीर
दुष्प्रभाव आहेत, एकाची चूक संपूर्ण मानवी समाजाला भोगावी लागते. अशुद्ध विचार हे शंकालु
स्वभाव, स्वार्थीप्रवृत्ती, गुन्हेगारीवृत्ती, निकृष्ट भावना, भेदभाव, घाण विचार, लोकात
दोष शोधणे, अहंकार, भांडखोरपणा अशी मानसिक विकृती तयार करते. तेव्हा आपण आपल्या
मनातील कचरा दूर केले तर समाजातील आपले कर्तव्य आपोआप आपल्याला कळून येईल व
समाजातून कचरा स्वच्छ करण्यास मोलाची कामगिरी पार पाडण्यास संपुर्ण पणे यश मिळेल आणि
सगळीकडे स्वच्छ परिसर, सुखद विकासाची वाटचाल घडेल.
"स्वच्छता असे जिथे, आरोग्य वसे तिथे"
डॉ. प्रितम भी. गेडाम
Nice Article
जवाब देंहटाएं