गुरुवार, 31 जनवरी 2019

स्वच्छ सुंदर, निरोगी परिसर असो आपले May our surroundings be clean, beautiful, and healthy

शहरात घणदाट वस्त्या वाढत चालल्या आहेत त्यानुसार शहरातून शेकडो टन कचरा दररोज निर्माण होतो आणि एवढ्या भरमसाट कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे खूप जबाबदारीचे काम आहे, तेव्हा हे काम करण्यात सर्व नागरिकांची महत्वाची भूमिका आहे की त्यांनी शासकीय पालिकेचा कामात सहकार्य करावे. शहरात अपार्टमेंट सोसायटी खूप वाढत आहेत पण पुष्कळदा तर सोसायटीचा आजूबाजूला, खाली जागेवर व वस्तीचा कडेलाच खूप मोठी कचऱ्याचे ढीग आढळून येतात. काही ठिकाणीतर फ्लॅटमधून बालकनीतून लोक सरळ केरकचरा खाली फेकतात. कुणी कोणाचा विचार करीत नाही, एकामेकांचे बघून दूसरे लोकही त्या असभ्य वागणुकी चे अनुसरण करतात व नंतर सगळेच ऐकामेकाचे उदाहरण देवुन तसेच वागायला लागतात, अशी आहे आपल्या शिक्षीत समाजाची वास्तविकता. जर कोणी सभ्य माणसाने कचरा फेकण्यावर मनाई केली तर ती लोक आपली चूक सुधारणा न करता उलट भांडायला शीवीगारी व कधी-कधी तर मारामारी करायला सुद्धा तयार होतात, काही-काही लोक तर अशे सुद्धा म्हणतात की आम्ही घाण करू तुमच्याने जे शक्य होईल ते करा अर्थात स्वच्छता फक्त स्वतःपुरती व घरापुरती ठेवतात पण आपल्या खराब वागणुकी मुळे समाजाला जो त्रास होतो त्या बद्दल लोक विचारच करीत नाही यात त्यांचा अशुद्ध विचारांचा दोष आढळून येतो.

     मानवाला जगण्याकरीता स्वच्छ वातावरण, शुद्ध पाणी, हवा, पौष्टिक अन्न व स्वस्थ परीसराची गरज असते नाहीतर आयुष्य आजाराचे घर बनते. जागतिक स्तरावर अन्य देशांचा तुलनेत स्वच्छतेबद्दल भारतातील लोकांमधे जागृकता कमी दिसून येते. जेव्हा मनात स्वच्छतेचा विचार येतो तेव्हा मानव फक्त स्वतःचाच विचार करतो, समाजाप्रती आपल्या कर्तव्याबद्दल नाही. नेहमी लोक कुठेही कचरा, घाण करतांनी दिसतात. कचऱ्यामुळे डास, माश्या, कीड़े, विषाणू निर्माण होतात आणि परिसर घाण करून आजार पसरवतात. ज्या परिसरात आपण वावरतो त्या परिसराला आपणच नष्ट करतोय ही समाजासाठी खूप लाजीरवाणी गोष्ट आहे. विदेशात स्वच्छतेवर खूप मोठ्या प्रमाणावर कामे केली जातात. स्वच्छतेत गुन्हा आढळल्यास संबंधीत माणसाला कोठडी सक्तमजुरी व मोठी रकम सुद्धा दंड स्वरूपात आकारण्यात येते. बाहेरच्या देशात स्वच्छतेचे कायदे खूप कडक आहेत तेव्हाच तर तिथले परिसर एवढे सुंदर स्वच्छ आणि प्रगतीशिल दिसतात कारण शिस्तबद्धपणे कायद्याचे पालन केले जाते ह्या करीता प्रत्येक नागरिकाला समाजाप्रती स्वतःचा जबाबदारीची जाण असणे गरजेचे आहे. मागच्या काही वर्षात जागतिक स्तरावर प्रदूषण, घाण, भेसळ, ईंधन व रासायनिक पदार्थांचा खूप जास्त वापर, वृक्षतोडी अशा कारणांनी पर्यावरणात असंतुलनपणा वाढला आहे ज्यामुळे नैसर्गिक आपदा व नवनवीन आजारात खूप वाढ होत आहे. अशा दूषित वातावरणामुळे मानवाची सरासरी वय कमी होत आहे सोबतच त्यांची कार्यक्षमता, रोगप्रतिकारक क्षमता देखील कमी होत आहे.

आपला देश सण व प्रेक्षणीय स्थळा करीता प्रसिद्ध आहे, वर्षभर लोक सणासुदीत फिरायला बाहेर जातात, सहलीला जातात, सण साजरे करतात पण स्वच्छतेची जागृकता नसल्या कारणाने मोठ्या प्रमाणात प्रेक्षणीय स्थळे, नदी, तलाव, समुद्र किनारपट्टी, ऐतिहासिक भवन, किल्ले, निसर्गरम्य ठिकाण आणि इतर ठिकाणी घाण व कचरा दिसून येते, ज्यामुळे आपले परिसर खराब होते आणी त्याचा दुष्परिणाम मानव, प्राणी, वन अर्थात पर्यावरणाचा प्रत्येक घटकावर होतो.

स्वच्छते करिता काही उपाय

  • बाहेर कुठेही जाताना एक लहानशी पिशवी नेहमी सोबत बाळगावी, आपल्याद्वारे कुठल्याही ठिकाणी कचरा व्हायला नको, जर झाल्यास तो कचरा सोबत असलेल्या पिशवीत साठवायचा आणि जिथे कुठे ही कचरापेटी दिसेल तर आपल्या पिशवीतील कचरा त्या कचरापेटीत टाकावा.
  • कचऱ्या संदर्भात तक्रार आणी सुझाव संबंधी प्रत्येक नगर व महानगर पालिकेत शासनातर्फे नागरिकांचा सुविधेकरिता हेल्पलाईन नंबर व मोबाईल अँप असायला हवे, यात सोशल मीडियाचा फार उत्कृष्ट वापर होऊ शकतो.
  • कचऱ्याच्या समस्येचे गांभीर्य सगळ्यांना समजले पाहिजे, त्याकरीता शासनाद्वारे सार्वजनिक ठिकाणी घाण करण्यावर मोठा दंड आकारायला हवे सोबतच सक्तमजुरीची ही कायद्यात तरतुदी केल्या पाहिजेत, अशा कायद्याचे शिस्तीने पालन व्हायला हवे.
  • प्रत्येक झोन प्रमाणे कचऱ्या संबंधित समस्येवर संबंधित अधिकारी व कर्मचारीवर्ग नागरिकांना प्रत्यक्ष भेटून कचऱ्याचा समस्या, त्यामुळे होणारे आजार, आजाराचा रोकथामात नागरिकांची भूमिका, कचऱ्याचा विल्हेवाट लावण्यात शासनाचे धोरण व नवीन उपाययोजना अशा सगळ्या महत्वाचा बाबींवर दर महिन्याला मिटींग, कार्यक्रम, कार्यशाळा व्हायला हवी.
  • पालिकेचा कामात देखील पारदर्शकता यावी म्हणून सर्व कामाचा व्यवहार, खर्च, व्यवस्थापन विभागाबद्दल माहिती व जनतेचा तक्रारीवर अद्यावत निवारण माहिती नागरिकांकरीता ऑनलाईन असायला हवी व रोजप्रमाणे माहिती सुद्धा अपडेट असलीच पाहीजे.
  • नदी हे नाल्याचे स्वरूपात बदलत आहे, शेतीतील भूमीची उत्पन्न क्षमता कमी होत आहे, वृक्षतोडीमुळे जंगलाचे क्षेत्रफळ देखील झपाट्याने कमी झाले आहे. पाणी, हवा, ध्वनी प्रदूषण खूप जास्त प्रमाणात वाढले आहे, ही मानवी समाजाकरीता धोक्याचे वळण आहे म्हणून वेळीच जागृक होऊन शिस्तबद्ध प्रमाणे सर्वांनी कायद्याचे पालन करायला हवे आणी स्वच्छतेचा मोहीम मध्ये आवर्जून सहकार्य करायला पाहीजे.
  • माणूस आजारावर खूप मोठ्याप्रमाणात पैसा व वेळ खर्च  करतो आणि त्याला मानसिक त्रास होतो तो वेगळा. जर सर्वांनी स्वच्छता प्रदूषण नियंत्रण व समाजाचा सुरक्षेवर लक्ष दिले तर आजारासंबंधी खुप मोठी समस्या दुर होईल व स्वस्थ वातावरण निर्माण करण्यात सर्वोत्तम उपलब्धी मिळेल.
  • प्रत्येक घटक एकमेकांशी संबंधित असतो आणि एकाचा प्रभाव दुसऱ्यावर होतो म्हणून इंधनाचा वाढता वापर व नैसर्गिक असमतोलपणा नियंत्रण करण्याकरीता वनीकरणाला जास्त महत्व दिले पाहिजे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, उर्जेची बचत, इंधनाचा सिमीत वापर, सौर उर्जेच्या वापरावर भर दिले पाहीजे.
  • प्रत्येक वस्तु टाकावू नसते जर कुणी गरजू असेल तर आपल्याकडे ती नको असलेली वस्तु आपण त्यांना देवू शकतो, पुष्कळशा वस्तु रिसायकल सुद्धा होऊ शकतात, कचऱ्याचे घरीच वर्गीकरण करू शकतो, कचऱ्यात जाणाऱ्या अन्न व भाजीपाल्यापासून खत तयार करू शकतो, टाकावू वस्तू पासून खेळणी व सुंदर कलाकृती व आवश्यक वस्तु तयार करू शकतो अशा कित्येक गोष्टी कचऱ्यापासून निर्माण होतात व ह्यामुळे कचरा कमी करण्यात मदत होईल.
  • इलेक्ट्रानिक कचरा व वैद्यकीय कचरा खूप घातक विषारी असतो तेव्हा त्या कचऱ्याची विल्हेवाट कळे शासनाने गंभीरतेने विशेष लक्ष द्यायला हवे. दक्ष नागरिक म्हणून आपणही शासनाचा कामात सहकार्य करायला हवे.
  • ज्या वातावरणात आपण वावरतो तिथल्या हवामानाचा, स्वच्छतेचा सरळ परिणाम मानवी आरोग्यावर होतो तेव्हा प्रत्येकाने आपल्या परिसराला आपले घर अशी विचारधारा ठेवून कामे केली तर संपूर्ण वातावरण स्वच्छ सुंदर व आनंददायक राहण्यास मदत होईल.

            आठवड्यात किंवा पंधरवाड्याचा कालावधीत जेव्हा शक्य होईल तेव्हा व सुट्टीचा दिवशी आपल्या वस्तीमधे, परिसरात, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेची मोहीम, वनीकरण, श्रमदान, असहाय्य यांना सहकार्याची मदत अशी सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येक नागरिकांनी शक्य होईल तेवढे तरी अशा कार्यक्रमात सहभाग द्यायला पाहीजे. आपल्याला समाजातील कचरा योग्य रीतीने निस्तारायचे असेल तर लोकांचा सहभाग खूप गरजेचा आहे. लोकांचा सहभाग तेव्हाच मिळू शकते जेव्हा लोक स्वमनाने तयार होऊन आपली जबाबदारी समझतील, त्या करीता त्यांचा मानसिकते मधे सुद्धा बदल घडविणे गरजेचे आहे, अर्थातच समाज शुद्ध करण्यासोबतच माणसाचे विचार देखील शुद्ध करायचे आहे हा ही एक स्वच्छतेचाच भाग आहे. निस्वार्थपणे कुणाची मदत करून बघा, एखाद्याला दुःखात मदत करून बघा, कुणी रडत्याचा चेहऱ्यावर हसू आणून बघा, यात मिळणारा आनंद व समाधान वेगळाच असतो जो तुम्ही कधीही कुठून विकत घेवू शकत नाही. बाहेरचा कचरा मानवी आरोग्याला आजार देतो पण मानवाचा आतील कचरा मानसिक विकृतीला जन्म देतो आणि याचे फार गंभीर दुष्प्रभाव आहेत, एकाची चूक संपूर्ण मानवी समाजाला भोगावी लागते. अशुद्ध विचार हे शंकालु स्वभाव, स्वार्थीप्रवृत्ती, गुन्हेगारीवृत्ती, निकृष्ट भावना, भेदभाव, घाण विचार, लोकात दोष शोधणे, अहंकार, भांडखोरपणा अशी मानसिक विकृती तयार करते. तेव्हा आपण आपल्या मनातील कचरा दूर केले तर समाजातील आपले कर्तव्य आपोआप आपल्याला कळून येईल व समाजातून कचरा स्वच्छ करण्यास मोलाची कामगिरी पार पाडण्यास संपुर्ण पणे यश मिळेल आणि सगळीकडे स्वच्छ परिसर, सुखद विकासाची वाटचाल घडेल.

           "स्वच्छता असे जिथे, आरोग्य वसे तिथे"  

डॉ. प्रितम भी. गेडाम


शुक्रवार, 25 जनवरी 2019

गुणवत्तापुर्ण ज्ञान, कौशल, जीवनाश्यक मुल्ये, रोजगार उन्मुख शिक्षण व्यवस्था काळाची गरज (आंतरराष्ट्रिय शिक्षण दिवस विशेष - 24 जानेवारी 2019) Quality knowledge, skills, essential values, employment-oriented education system is the need of the time (International Education Day Special - 24 January 2019)


3 ते 5 डिसेंबर 2018 ला ब्रुसेल्स मधे संयुक्त राष्ट्रसंघ च्या आमसभेने शिक्षण क्षेत्रात वाढीव साजरा करण्याकरीता दरवर्षी 24 जानेवारी (वर्ष 2019 पासून सुरू)  शिक्षणाचा आंतरराष्ट्रिय दिवस म्हणून एक संकल्प स्विकारला हे निर्णय ग्लोबल एजूकेशन मिटींग अंतर्गत घेण्यात आले. शिक्षणाचा दर्जा सुधारणे व अशिक्षीतता निर्मुलनासाठी त्याचे ठराव सुधारण्यासाठी जगातील राजकीय शक्तीची इच्छा आहे. शिक्षणाची गुणवत्ता सुधार आणि विद्याथ्र्यांचा शिक्षणाचे रक्षण करण्यासाठी या उत्सवाची अपेक्षा आहे. 2030 पर्यंत शिक्षणाचे महत्व व टिकाऊ शिक्षा विकासाचे उद्देश्य आहे. ह्याकरीता ज्ञान कौशल, मुल्ये व दृष्टिकोण सरावावर उपाययोजना तयार करणे गरजेचे आहे. गरीबी निर्मुलन, निरक्षरता, रोजगारा द्वारे उपजीविका, गुणात्मक कौशल विकसीत करणे, आरोग्य, स्वच्छता सुधार, आर्थीक, सामाजिक विकास, उच्च जिवन मानके, गुन्हेगारी कमी करणे या सर्व विषयात शिक्षण अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. कित्येक समस्यांवर हेच एक उपाय आहे.
       जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असली तरीही भारत देशात अजूनही निरक्षर लोकसंख्या 287 दसलक्ष आहे. जगातील तिसरे सर्वात मोठे शिक्षणक्षेत्र असलेले आपल्या भारत देशाला गुणवत्ता सुधारण्यासाठी शासनाला आंतरराष्ट्रिय समुदाया बरोबर समन्वय साधणे खूप महत्वाचे आहे.


प्रथम संस्थेची असर रिपोर्टप्रमाणे:- 15 जानेवारी 2019 रोजी देशाचा शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठी संस्था ”प्रथम“ ह्याने 13 वीं वार्षीक रिपोर्ट "एनुअल स्टेटस ऑफ एजूकेशन रिपोर्ट - असर 2018" द्वारे देशाचा शिक्षण व्यवस्थेची सद्यास्थिती दर्शविली आहे. हे सर्वे 596 जिल्ह्यात, 354944 कुटूंब व 3 ते 16 वयोगटाचे 546527 विद्याथ्र्यांवर केले गेले आहे. यात काही विशेष गोष्टिंवर लक्ष केद्रिंत करण्यात आले शाळेत दाखला, उपस्थिती, पुस्तकांचे वाचन, गणितीय कौशल, शाळेचा आधारीत ढांचा यावर सर्वे केले. ह्या रिपोर्टने असे सांगीतले की ज्या देशात आर्यभट्ट चाणक्य सारखे महागुरू होऊन गेले त्या देशात आता विद्यार्थी सुद्धा शिक्षण घेण्यालायकीचे राहिले नाही. देशाचा आठव्या वर्गातील 57 टक्के विद्याथ्र्यांना तर साधे गणित सुद्धा येत नाही आणि 28 टक्के मुलांना पुस्तक ही वाचता येत नाही. पाचव्या वर्गातील 50 टक्के मुले दुसरीतील साधे पाठ सुद्धा वाचु शकत नाही. 10 वर्षा अगोदरचा मानाने 2018 मधील शालेय विद्याथ्र्यांचा  प्रर्दशनात खूप घसरण झाली आहे म्हणजे पुर्वी पाचवीतील मुले आजच्या प्रमाणात ज्यास्त हुशार होती. हुशारीचा हा क्रम 37 टक्यावरून घसरून 28 टक्यावर आलाय. रिपोर्ट प्रमाणे सर्वात सुधारीत गोष्ट म्हणजे शाळेत दाखल्यांची संख्या वाढली, शौचालय सुविधा वाढल्या, मिड डे मिल ची सुविधा जास्त विद्याथ्र्यांपर्यंत पोहोचली आहे.

शिक्षण क्षेत्रात वाढते भ्रष्टाचारः- नेहमी आपण वर्तमानपत्रे किंवा अन्य स्त्रोताद्वारे बघतो की कशाप्रकारे या क्षेत्रात भ्रष्टाचाराचा बोलबाला आहे, नौकरी लावूण देण्याचा नावाखाली आर्थिक व्यवहार होतो. भुतपूर्व केंद्रिय वित्तमंत्री पी.चिदम्बरमनी आपल्या एका भाषणामधे म्हटले की आपल्या देशात विश्वस्तराचे विद्यापीठ तैयार करण्याची गरजेवर भर देऊन एक खंत व्यक्त केली की देशात पुश्कळशा विद्यापीठ व शिक्षणसंस्थान दुकानाचा स्वरुपात काम करत आहे. महाराष्ट्र राज्याचे उच्च तकनिकी शिक्षामंत्री विनोद तावडेंनी ही पुश्कळदा मुलाखती मधे त्यांनी स्वंत मानले की शैक्षणिक  क्षेत्रात नौकरी लावूण देण्याचा नावाखाली आर्थिक व्यवहार होतो आणी हृया अनैतीक व्यवहारावर नियंत्रण करण्याकरीता नविन नितीनियम व भविष्यात केंद्रीय पद्धती द्वारे भरतीप्रक्रीया करण्याचा गोष्टिवरती ही अमल करण्यात येईल असे सांगीतले.

श्रेष्ठ शिक्षण व्यवस्था असलेले देशच होणार विश्वगुरूः- ज्या देशाची शिक्षण व्यवस्था बळकट असेल तेच देश जगात विश्वशक्तीचा स्वरूपात उन्नत राहणार कारण शिक्षणच एक अशी पायरी आहे जी सशक्त नागरीक घडविते, विकसीत युवाशक्ती बुद्धीज्ञाता सारखे मनुष्यबळ निर्मीत करतात. शिक्षण व्यवस्थेवरच देशाचे भविष्य अवलंबून असते. समाजाचे सर्व क्षेत्राचे मुळ शिक्षणातून निघतात म्हणजे उत्कृष्ट शिक्षण व्यवस्था देशातील साधारणत सर्वच क्षेत्रात विकास घडविते म्हणूनच तर जगातील कित्येक देश तर आपल्या संपुर्ण बजटचा 25 ते 40 टक्के बजट हा फक्त तिथल्या शिक्षण विभागावर खर्च करतात. शिक्षण मानवाचा जिवनात प्रत्येक वाटेवर कामात पडते शिक्षणाशिवाय हे जिवन पशूप्रमाणे आहे. शिक्षण म्हणजे फक्त वाचन-लेखन करून पदवी घेवून शिक्षीत होणे नव्हे तर या व्यतिरिक्त लोकांमधे हक्क, अधिकार, कर्तव्यांची जाणिव, कौशल्य विकास, समाजात विकासा करीता सहभागी होण्याची भावना निर्माण करणे म्हणजेच एक जागृक नागरीक तैयार करने सुद्धा आहे. दारीद्ररेषेतून बाहेर येण्यास व स्त्री पुरूष समानता आणण्यास शिक्षणाचे महत्वाचे योगदान आहे.

शैक्षणिक मुल्यांचा ह्रासः- शिक्षणप्रणाली मधे वाढती अनियमीतते मुळे निरंतर स्वरुपाने गुणवत्ता घसरत आहे व शैक्षणिक मुल्यांचा ह्रास होत आहे या मागे पुश्कळसे कारणं आहेत जसे की चांगल्या अर्थव्यवस्थेची कमी, कडक नियम व दूरदर्शतेची कमी, उच्च शिक्षीत तज्ञ कर्मचारींची कमी, नविन तंत्रज्ञानांचा शिक्षण क्षेत्रात वापरण्याची कमी, खाजगी शिक्षणसंस्था द्वारे शासकीय नियमांकडे दुर्लक्ष,  शिक्षणक्षेत्रात वाढते भ्रष्टाचार, विद्याथ्र्यांकडून मनमापक फिस वसूली, शिक्षणसंस्थेचे बाजारीकरण, खाजगी कोचींग क्लासेसचा पूर अशा अनेक गोष्टि आधारभूत आहेत. आपल्याकळे चांगल्या गुणवत्तापुर्ण शिक्षण व्यवस्थेची कमतरता आहे ज्यामुळे आपल्याकडचे विद्यार्थी उच्च शिक्षणाकरीता विदेशात जातात. भूतपुर्व राष्ट्रपती प्रणब मुखर्जींनी आपल्या एका भाषणात सांगीतले की दरवर्षी लाखो विद्यार्थी भारतातून अमेरीका व ब्रिटेन सोबत दूसरे देशात अध्ययन करायला जातात आणी यात दरवर्षी वाढ होत आहे. आपल्याला इथल्या विद्यार्थांन करीता देशातच विश्वस्तराचा गुणवत्तापुर्ण दर्जेदार उच्च शिक्षण मिळवूण देण्याकरीता सक्षम व्हायला पाहीजे.

सरकारी खात्यांमध्ये प्रतीस्पर्धा परिक्षेद्वारे नौकरीवर लागल्या जाते तर मग सहायक प्राध्यापक पदाकरीता नेट-स्लेट/सेट सारखी प्रतीस्पर्धात्मक परीक्षा पास केल्यानंतर सरळ पदभरती का होत नाही?  नौकरी साठी का भटकांव लागत? शिक्षण क्षेत्रातील अशा समस्या पुढे चालून दूसरी समस्यांना जन्म देतात आणी समाजात अराजकता वाढवतात. ह्या समस्यांना वेळेतच आळा घालणे गरजेचे आहे तेव्हाच समाजाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.
जागतिक स्तरावार सर्वात जास्त शिक्षण संस्था व विद्यापीठे असलेल्या देशात आपला देश आहे. अमेरीका, चीन नंतर यात तिसरे क्रमांकाचे आपले देश येते. दरवर्षी आपल्या भारत देशातून 50 लाखाहून ज्यास्त पदवीधर होतात ही जगातील सर्वात मोठी आकडेवारी आहे. मोठ-मोठ्या पदव्या घेतात पण सर्वात मोठी विडंबना आहे की ऐवढे शिक्षण घेतल्यानंतर ही त्याचे महत्व काय? कारण मोठ्या प्रमाणात ते बेरोजगारच असतात. अशा देशात फक्त शिक्षण देवूनच भागत नाही तर लोकांना योग्य कौशलपुर्ण बनवायची जिम्मेवारी ही शासनाचीच आहे. यात शासनाने रोजगारांच्या व स्वरोजगारांचा नवीन संधी व कौशल्य विकासावर भर द्यायला हवा ज्या करीता चांगल्या प्रशिक्षण केंद्र व संशोधन केंद्रांची गरज आहे.

डाॅ. प्रितम भि. गेडाम