जेव्हा कोणी माणूस आळवाटेने आपलं काम करण्याकरता लाचलुचपत मार्ग पत्करतो तेव्हा तो कुणाचातरी हक्काचे, कष्टाचे, कर्तृत्वाचे यश आपल्या पदरात खेचत असतो आपल्या पदाचा दुरुपयोग करीतो अर्थातच ह्या गंभीर गुन्हेचा वाटेकरी होतो आणि अशा गुन्हेचे परीणाम कित्येकदा सामान्य जनतेला स्वताचा जिव सुद्धा गमवावून भोगावे लागते. लाचलुचपत सारख्या गंभीर समस्ये मुळे शासनाला दरवर्षी अब्ज डाॅलरचा तोटा होतो. भ्रष्टाचार समाजातील मुख्य समस्या आहे जी इतर समस्येची जन्मदाती आहे.
माणसातील स्वार्थीपणा इतकी जास्त वाढली आहे की तो स्वताचा व्यतीरीक्त कधी दुसऱ्याची परवाच करीत नाही आणी हे सुद्धा समजत नाही की आपल्या छोट्याशा फायद्यासाठी समाजाला किती मोठा धोखा पत्करावा लागतो. भ्रष्टाचारामुळे समाजातील श्रीमंत-दारिद्र यांचा तील अंतर हे वाढतच चालले आहे. गरीब आणखी गरीब व श्रीमंत आणखी श्रीमंत होत चालले आहेत. क्वचीतच कोणी व्यक्ती असा असेल ज्यानी आपल्या आयुष्यात भ्रष्टाचाराला बढी पडला नसेल. भ्रष्टाचार म्हणजे लाचलुचपतपणा अर्थात की जेव्हा कधी कोणी व्यक्ती कायद्याचा विरूद्ध जावून आपल्या स्वार्थापोटी वाईट मार्गाचे आचरण करतो तेव्हा त्याला भ्रष्टाचार म्हणतात. भ्रष्टाचार समाजातील खुपच गंभीर समस्या आहे. ही समस्या पुर्ण समाजाला पोकळ करीत आहे. प्रत्येक क्षेत्र कमी-जास्त प्रमाणात भ्रष्टाचार मधे गुंतून आहे. समाजात प्रत्येकजण कोणत्यानीं कोणत्या रूपात या समस्ये मुळे ग्रस्त आहे. आजकाल आपण वर्तमानपत्रे, न्यूजचैनल, सोशल मिडीया व इतर मार्गाने भ्रष्टाचार बद्दल नवनवीन घोटाळे ऐकतो, वाचतो. भ्रष्टाचार हे शिक्षण, संस्कार, कायदा, प्रामाणिकपणा, निती नियम, कर्तव्य, निस्वार्थ सेवाभाव, अशा गोष्टिंना संपवत आहे.
जगातील सर्वात मोठ्या लोकतांत्रीक देशातील युवा पीढी भ्रष्टाचाराला बढी पडत आहे. देशात पुर्वी पासुनच बैंकींग घोटाळे, सुशिक्षीत बेरोजगारी, गरीबी, अशिक्षा, जातीवाद, आतंकवाद, नक्षलवाद, शेतकरी आत्महत्या, प्रदूषण, भेसळखोरी, जमाखोरी, नोकरी व्यवसायाचा नावाखाली आर्थिक व्यवहार, खाण्यापीण्याचा वस्तुत जिवघेणे केमिकलचा वापर अशा सारख्या गंभीर समस्या आहेत आणी भ्रष्टाचार अशाच समस्यांना वाढवण्यास मदत करते. जेव्हा पर्यंत अशा समस्यांना संपवणार नाही तो पर्यंत समाजातील सर्वांगीण विकास शक्यच नाही. संपुर्ण जगात ही समस्या पसरली आहे. या भ्रष्टाचाराच्या समस्यात पुर्ण समाज भागीदार आहे कारण लाच घेणे व लाच देणे यात दोघे ही बरोबरीचे आरोपी आहेत. सोबतच अन्यायाला शांतपणे सहन करणारा व्यक्तीही तेवढाच दोषी असतो. प्रत्येक कामात पारदर्शता आणने खूप गरजेचे आहे.
फोब्र्सनीं आपल्या 18 महिन्याचा सर्वे मधे दर्शविले की आशिया खंडातील टाॅप 5 भ्रष्ट देशांमधे भारताचे क्रमांक प्रथम आहे जेव्हा की पाकीस्तान चौथ्या नंबरवर आहे. फोब्र्सचा हा सर्वे मार्च 2017 ला प्रकाशित झाला होता. भारतात 69 टक्के भ्रष्टाचाराचं प्रमाण दर्शविते असे सांगीतले आहे.
भ्रष्टाचारामधे देशाची स्थिती अतीगंभीर
आंतरराष्ट्रिय गैर-सरकारी संगठन ”ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल“ ज्याचे मुख्यालय बर्लिन मधे आहे हे दरवर्षी ”भ्रष्टाचार बोध सुचकांक“ प्रस्तुत करतो. या वर्षी 22 फेब्रुवारी 2018 ला 23वीं वार्षीक रिपोर्ट आली आहे यात एकुण 180 देशांची रैंकींग दिली आहे या रिपोर्ट प्रमाणे भारताची स्थिती खालावली आहे. 2017 वर्षी भारत 81 नंबरवर आला आहे. जेव्हा की 2016 वर्षात 176 देशापैंकी आपला देश 79 नंबरावर होता. सोमालिया जगातील सर्वांत भ्रष्ट देश आहे. प्रेस च्या स्वतंत्रतेत आंतरराष्ट्रिय संस्था रिपोर्टर विदाऊट बाॅर्डर्स च्या एका अध्ययनात 180 देशापैंकी भारताला 136 वा क्रमांक मिळाला आहे. मागील काही वर्षात 15 पत्रकारांना मारण्यात आले जे भ्रष्ट्राचारा विरूद्ध काम करीत होते. दुसऱ्या
देशांपेक्षा भारतात पत्रकारांना वर जास्त हल्ले करण्यात येतात.
काही वेळांपुर्वी निती आयोग च्या सेंटर फाॅर मिडीया स्टडिजच्या एका रिपोर्टनीं असा खुलासा केला की उत्तर भारताच्या मानाने दक्षिण भारतात जास्त भ्रष्टाचार आढळतो. या रिपोर्ट प्रमाणे देशातील सर्वांत जास्त भ्रष्ट राज्य कर्नाटक आहे इथे 77 टक्के लोक आपली कामे करून घेण्याकरता लाच देतात. तर दुसरीकडे हिमाचल प्रदेश सर्वांत कमी भ्रष्ट राज्य आहे कारण या राज्यात भ्रष्टाचाराचं प्रमाण 3 टक्के इतके आहे.
आता एका भ्रष्टाचार विरोधी वेबसाईट ”आईपेडब्राईब“ नीं आपली रिपोर्ट दिली आहे या रिपोर्ट मधे देशातील अशा शहरांची माहिती दिली आहे जी भ्रष्टाचारात सर्वांत जास्त प्रमाणात लिप्त आहेत. या वेबसाईटचे संचालन बंगलोर मधील जनाग्रह नावाच्या एनजीओ द्वारे केले जाते. 737 शहरात केल्या गेलेल्या सर्वे नुसार बंगलोर सर्वात जास्त भ्रष्ट शहर आहे त्या नंतर मुंबई, चेन्नई, नवी दिल्ली व पाचव्या क्रमांकावर हैदराबाद शहर येतो.
महाराष्ट्र राज्यात मागील काही वर्षात पुष्कळ आरटीआई कार्यकत्यांची हत्या करण्यात आली आहे. काही सामाजीक कार्यकत्यांना अन्याय विरूद्ध बंड पुकारल्यामुळे स्वताचा जिव सुद्धा गमवावा लागला. आंतरराष्ट्रिय एनजीओ ”काॅमनवेल्थ हृयूमन राईट्स इनिशिएटिव“ ची नुकतीच रिपोर्ट प्रमाणे मागच्या काही वर्षात महाराष्ट्रातील 60 पेक्षा जास्त आरटीआई कार्यकत्यांवर जीवघेणे हल्ले झाले आहेत. इतर राज्यापेक्षा ही आकडेवारी जास्त आहे ह्या आकडेवारी वरून असे समजून येते की महाराष्ट्रात भ्रष्टाचार विरूद्ध काम करणाऱ्या
व्यक्तीवर जास्त घटना घडून आले आहेत.
डाॅ. प्रितम भि. गेडाम
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें
Do Leave Your Comments