आज मानव ऐवढा स्वार्थीवृत्तिचा झालाय की स्वताचा फायद्यापोटी कोणाचेही अहीत होत असले तरीही स्वतालाच महत्व देतात. दगदगीचा वातावरणात मानव भरकटत चाललाय. आपल्यात माणूसकीच नसेल तर माणूस म्हणून घ्यायची लाज वाटायला हवी. आपल्या डोळ्यासमोर वाईट घटना घडतांनी दिसून ही मनात दया करूणा उत्पन्न होत नाही तर आपण मानव नाही. माणसाची ओळख त्याचा कपड्यावरून होते कर्तृत्वावरून नाही. निष्पाप हसू आता लहान बाळाच्या चेहऱ्यावरच दिसते. आदर व संस्काराचे अंत होत आहे. आज आपण कोणत्याही माध्यमांद्वारे बातमी ऐकली किंवा बघीतली तर आपल्याला कळते की समाजात किती अमानवीय घटना घडत आहेत. मानव ऐवढा स्वार्थी झाला की त्यांने पशु-पक्ष्यांचे क्षेत्रही हिरावून घेतले सोबतच पुढच्या पिढीच्या हिस्याचे नैसर्गिक संसाधने, ईंधन, शुद्ध जल, प्राणवायु, वने, हिरवेगार वातावरण संपवित चाललाय. प्रकृती मानवाशी कधीच भेदभाव करीत नाही पण मानव करतो. आजचा काळात पैसाच धर्म झालाय असे वाटते. भ्रष्टाचार, महिला मुलं व वृद्धांवर अत्याचार, जातीभेद, फसवणूक सारखे गंभीर गुन्हे रोजच घडतात. मानव श्रेष्ठत्वाचा स्पर्धेत धावत आहे. आपण चंद्रावर पोहोचलो तरी देखील पण आपल्या शेजारी कुणाचे घर आहे हे देखील माहीत नसते.
स्वार्थी मानवीवृत्तीः- मानव आपल्या एक रुपयाचा फायद्याकरीता कोणाचा जिवासोबत ही खेळतात. खाण्यापिण्याचा वस्तुंमधे विषारी वस्तुंचे भेसळ यातीलच एक उदाहरण आहे. आतातर नात्यांमधे सुद्धा भेसळ दिसून येते, नात्यांना काळीमा फासणारे दृश्य समाजात घडतात म्हणजे तुमच्यासमोर तर खूप छान-छान बोलणारे पण मागे तेच नातलग शत्रुचा भूमिकेत असतात. अनैतीक मार्गाने पैसे कमवून व्यसन, देखावा, फैशनच्या नावाखाली पैसा उधळत आहेत. नोकरीत भ्रष्टाचार, प्रत्येक ठिकाणी राजकीय हस्तक्षेप, शिफारस, श्रीमंत व गरीबांमधील वाढते अंतर समाजात असंतोष वाढवतात. आपल्या डोळ्यादेखत कित्येकांचे आयुष्य फक्त संघर्षातच संपतानी दिसतात. एक भ्रष्ट व्यक्ती पुर्ण समाजाला कीड लावते. सामान्य व्यक्ती ही आपल्या अधिकाराचे जाणिव ठेवत नाही. दुर्लक्ष केल्यामुळे समाजात नेहमीच समस्या उद्भवतात म्हणजे ऐकीकडे हॉटल, लग्न व कार्यक्रमात मोठ्याप्रमाणात वाचलेले अन्न बाहेर फेकल्या जाते, व दूसरीकडे आज ही खूप मोठी लोकसंख्या उपाशीपोटी राहते. विलासतेकरीता कोटी रूपये खर्च करतात, कुठे पाण्यासाठी दररोज कित्येक किलोमीटर फिरावे लागते तर कुठे पाण्याचे महत्वच कळत नाही. रस्त्याचा कडेला पडलेला आजारी व्यक्ती मदतीकरता लोकांना हाक देतो पण कुणी मदत करीत नाही उलट त्याचे विडीयो व फोटो काढण्यात व्यस्त असतात. कुठे लहान मुले भूख-भूख करीत जीव गमावत आहेत पण माणुसकी दिसत नाही. अनाथआश्रम, वृद्धाश्रम वाढत आहेत आणी लोकांचे घर संयुक्त कुटुंबापासून लहान होत चालले.
जगात माणूसकी सर्वात मोठा धर्मः- मानवाचा कोणताही धर्म दुसऱ्या धर्माचा द्वेष करायला शिकवत नाही अर्थात सर्वच धर्म न्याय, शांती व समभावाची शिकवण देतात. पण मानवच धर्मात अंतर बघतो. सर्व मानव सारखेच मग हा भेदभाव कशाकरीता? जगात सगळीकडे गांवात शहरात जातीभेद करून गंभीर घटना घडतच चालल्या आहेत. मुले अनाथ, लोकं बेघर होत आहेत. आजचा मानव मानवते कडे न वळता दानवते कडे वळत आहे. जगात कुठेही चांगल्या कामाचे कौतुक व वाईट घटनेवर बंधन घालायलाच हवे. सर्व प्राण्यांमधे मानवातच जास्त विचारशक्तीची क्षमता आहे तरी सुद्धा पुष्कळदा रानटी प्राण्यापेक्षा जास्त वाईट कृत्य मानवच करतो. प्रेमाने मन जिंकने, दया, करूणा व निस्वार्थ सेवाभाव हेच जगात माणूसकीचे आधार आहे. जगात माणूसकी पेक्षा मोठा कोणताच धर्म नाही.
श्रेष्ठत्व आणी ईर्षाभाव माणूसकीचे शत्रू :- आजचा मानवात मी, माझा असा विचार येतो पण आपला असे विचार करणारे काहीच, म्हणजे स्वतापुरता विचार करणारे लोकांमधे स्वताचा श्रेष्ठत्व आणी इतरांप्रती ईर्षाभाव वाढला आहे. दुसऱ्याचा यशावर मनाने दुखी तिरस्कारी व दुसऱ्याचा दुखांवर स्वत आनंदी होतात व दुसऱ्यानाच दोष देतात अशी प्रवृत्ती आहे. नात्यात, मैत्रीत, परीवारात, शेजारात, ऑफिस, कोणत्याही ठिकाणी अशेच घडत असते. मानव का असा वागतो? मानवात माणूसकीच नसेल तर तो मानव कसला? जास्ततर गुन्हे ईर्षा व श्रेष्टत्वाचामुळेच घडतात ह्यामुळे सज्जन मानव फसला जातोय. बेईमान लोकं यशाकडे वाढत आहेत व ईमानदार संघर्षंच करत चाललाय. आई-वडील दहा मुलांचे पालन करू शकतात पण दहा मुले मिळून सुद्धा आपल्या आई-वडीलांचे पालन करू शकत नाही ह्यापेक्षा जगात काय दुर्भाग्य असणार. कित्येक ठिकाणी मानवाचे जीवन जनावरांपेक्षा ही वाईट परीस्थितीत आहे.
माणूसकी कमी असली तरी जीवंत आहे :- डॉ. आंबेडकर, मदर टेरेसा, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, साने गुरूजी, स्वामी विवेकानंद, अनेको संत समाजसेवकांनी आपले संपुर्ण जीवन जनतेच्या सेवेत खर्चले. आज ही गढचिरोली चे आमटे परीवार, मेळघाटातील डॉ. कोल्हे परीवार, सींधुताई सपकाळ, मेधा पाटकर सारखे माणसं अनेक खर्रा अर्थाने माणूसकी जीवंत ठेवून आहेत म्हणजे हे व्यक्तीगण जगात मोठ्या समृध्दी व विलासीतेचे जीवन जगू शकतात पण त्यांनी लोक सेवेसाठी जीवन जगायचे ठरविले. आता कोरोनाच्या संकटकाळी जे कोरोना योद्धा स्वताचा जीव धोक्यात घालून समाजासाठी काम करीत आहेत ते व त्यांना मदत करणारे कित्येक संस्था व लोकांनी जी निस्वार्थ कामगीरी केली ती खरी माणूसकी.
मानव असण्याचे कर्तव्य पार पाळा :- कोणत्या रडत असलेल्या चेहऱ्यावर हसू आणनेच खरे आनंद आहे, भूकेल्याला अन्न दिल्यावर मनाला जे आत्मीय सुख मिळते ते सुख पैशांनी सुद्धा घेता येत नाही. आपण महान नाही तर किमान माणूस तर होऊ शकतो. आज डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम आपल्यात नाहीत, त्यांनी आयुष्यात कोणतीही मोठी संपत्ती मिळवली नाही परंतु त्यांनी देशासाठी, समाजासाठी, मानवतेसाठी जे केले ते आपण कधीही विसरू शकत नाही, ते आपल्या अंतःकरणामध्ये कायम राहतील. चला आज आपण सर्वांनी शपथ घेवुया की शक्य तितक्या दररोज आपण मानवतेसाठी नक्कीच काहीतरी करू. कधीही आपल्या पदाचा गैरवापर करू नाही, अन्यायला विरोध करा आणि न्यायाला पाठिंबा देणार, नेहमी नियमांचे अनुसरण करणार, सर्व धर्म समानता, ऐक्य अखंडता, एक देश एका समाजासाठी कार्य करेल, आपण कोणाचेही हक्क कधीही हिरावून घेणार नाही, भ्रष्ट वागणूक आणि भेसळ करण्यापासून दूर राहील आणि प्रत्येक आठवड्याशेवटी आपल्या वर्तणुकीच्या कामाचे मूल्यांकन करेल. आपली छोटीशी मदत देशात मोठे यश आणू शकते आणि बर्याच लोकांचे जीव वाचवून आयुष्य आनंदी बनवू शकते. कर्तव्यदक्ष रहा, जबाबदारी समजून घ्या, नेहमी स्वाभिमानाने रहा, अभिमानाने वागू नका, कोणाबद्दल कधीही द्वेषाची भावना बाळगू नका, एखाद्या व्यक्तीला त्याच्या वागणुकीद्वारे, कर्मांनी, गुणांनी ओळखा, संपत्तीने किंवा महाग देखाव्याने नव्हे. आजही तुम्हाला समाजातील हजारो लोक असे सापडतील ज्यांनी आपल्या यशाची किर्ती देशात व परदेशात बजावूनही देशाच्या एका ग्रामीण भागात अनामिक आणि अगदी साधे जीवन जगून पर्यावरण आणि असहाय लोकांना मदत करत आहेत. आयुष्यात नेहमीच उच्च आदर्श अनुसरण करा, मानवता समजून घ्या, आपल्याला मानवी जन्म मिळालाय तर माणूस म्हणून जगा.
डॉ. प्रितम भि. गेडाम


