सोमवार, 19 अगस्त 2019

कुठे हरवत चालली माणूसकी (जागतिक मानवता दिवस विशेष - १९ ऑगस्ट २०१९) Where is humanity disappearing (World Humanitarian Day Special - 19 August 2019)


आज आपण आधुनिक काळात वावरतोय. जगात प्रत्येक क्षेत्रात भरभरून प्रगती झाली आहे. सगळीकडे यांत्रिक संसाधनांचा बाजार दिसतोय पण माणूस आपल्या मुळापासून दूर होतोय तर खरोखरच सुखी होत आहोत? दगदगीच्या वातावरणात मानव भरकटत चाललाय. मानव ऐवढा स्वार्थीवृत्तिचा झालाय की स्वताचा फायद्यापोटी कोणाचे अहीत होत असले तरी ही स्वतालाच महत्व देतात. आपल्यात माणूसकी नसेल तर माणूस म्हणून घ्यायची लाज वाटायला हवी. आपल्या डोळ्यासमोर वाईट घटना घडतांनी दिसून ही मनात दया करूणा उत्पन्न होत नाही तर आपण मानव नाही. माणसाची ओळख त्याचा कपड्यावरून होते कर्तृत्वावरून नाही. निष्पाप हसू आता लहान बाळाच्या चेहऱ्यावर दिसते. आदर व संस्कारांचे अंत होत आहे. आज आपण कोणत्याही माध्यमाद्वारे बातमी ऐकली किंवा बघीतली तर आपल्याला कळते की समाजात किती अमानवी घटना घडत आहेत. मानव ऐवढा स्वार्थी झाला की त्यांने पशु-पक्षांचे क्षेत्रही हिरावून घेतले सोबतच पुढच्या पिढीच्या हिस्साचे नैसर्गिक संसाधने, इंधन, शुद्ध जल, प्राणवायू, वने, हिरवेगार वातावरण संपवत चाललोय. प्रकृती मानवाशी कधीच भेदभाव करीत नाही पण मानव करतो. आजचा काळात पैसा धर्म झालाय. भ्रष्टाचार, महिला मुलं व वृध्दांवर अत्याचार, जातीभेद, फसवणूक सारखे गंभीर गुन्हे रोजच घडतात. आजचा मानव श्रेष्ठत्वाचा स्पर्धेत धावत आहे. आपण चंद्रावर पोहोचलो तरी देखील पण आपल्या शेजारी कुणाचे घर आहे हे देखील माहित नसते.

स्वार्थी मानवीवृत्ती

मानव आपल्या एक रुपयाचा फायद्याकरीता कोणाचा जिवासोबत ही खेळतात. खाण्यापिण्याचा वस्तुंमधे विषारी वस्तुंचे भेसळ यातीलच एक उदाहरण आहे. आतातर नात्यांमधे सुद्धा भेसळ दिसून येते, नात्यांना काळीमा फासणारे दृश्य समाजात घडतात म्हणजे तुमच्यासमोर तर खूप छान-छान बोलणारे पण मागे तेच नातलग शत्रुचा भूमिकेत असतात. अनैतिक मार्गाने पैसे कमवून व्यसन फैशनच्या नावाखाली पैसा उधळत आहेत. नोकरीत भ्रष्टाचार, प्रत्येक ठिकाणी राजकीय हस्तक्षेप, शिफारस, श्रीमंत व गरीबांमधील वाढते अंतर समाजात असंतोष वाढवतात. आपल्या डोळ्यादेखत कित्येकांचे आयुष्य फक्त संघर्षातच संपतानी दिसतात. एक भ्रष्ट व्यक्ती पुर्ण समाजाला कीड लावते. सामान्य व्यक्ती ही आपल्या अधिकाराचे जाणिव ठेवत नाही. दुर्लक्ष केल्यामुळे समाजात नेहमीच समस्या उद्भवतात म्हणजे एकीकडे हाॅटेल, लग्न व कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात वाचलेले अन्न बाहेर फेकल्या जाते, व दुसरीकडे आज ही खूप मोठी लोकसंख्या उपाशीपोटी राहते. विलासतेकरीता कोटी रूपये खर्च करतात, कुठे पाण्यासाठी दररोज कित्येक किलोमीटर फिरावे लागते तर कुठे पाण्याचे महत्वच कळत नाही. रस्त्याचा कडेला पडलेला व्यक्ती मदतीकरता लोंकाना हाक देतो पण कुणी मदत करीत नाही उलट त्याचे विडीयो व फोटो काढण्यात व्यस्त असतात. कुठे लहान मुले भूक-भूक करीत जीव गमावत आहेत पण माणुसकी दिसत नाही. अनाथआश्रम, वृद्धाश्रम वाढत आहेत आणी लोकांचे घर लहान होत चालले.

जगात माणूसकी सर्वात मोठा धर्म

मानवाचा कोणताही धर्म दूसऱ्यां धर्माचा द्वेष करायला शिकवत नाही अर्थात सर्वच धर्म न्याय शांती व समभावाची शिकवण देतात. पण मानवच धर्मात अंतर बघतो. सर्व मानव सारखेच मग हा भेदभाव कशाकरीता? जगात सगळीकडे गांवात शहरात जातीभेद करून गंभीर घटना घडतच चालल्या आहेत. मुले अनाथ, लोकं बेघर होत आहेत. आजचा मानव मानवते कडे न वळता दानवते कडे वळत आहे. जगात कुठेही चांगल्या कामाचे कौतुक व वाईट घटनेवर बंधन घालायलाच हवे. सर्व प्राण्यांमधे मानवातच जास्त विचारशक्ती ची क्षमता आहे तरी सुद्धा पुष्कळदा रानटी प्राण्यापेक्षा जास्त वाईट कृत्य मानवच करीतो. प्रेमाने मन जिंकने दया, करूणा व निस्वार्थ सेवा भाव हेच जगात माणूसकीचे आधार आहे. जगात माणूसकी पेक्षा मोठा कोणताच धर्म नाही.

श्रेष्ठत्व आणी ईर्षाभाव माणूसकीचे शत्रू

       आजचा मानवात मी, माझा असा विचार येतो पण आपला असे विचार करणारे काहीच, म्हणजे स्वतापुरता विचार करणारे लोकांमधे स्वताचा श्रेष्ठत्व आणी इतरांप्रती ईर्षाभाव वाढला आहे. दूसऱ्यांचा यशावर मनाने दुखी तिरस्कार व दूसऱ्यांचा दुखांवर स्वत आनंदी होतात व दूसऱ्यांनाच दोष देतात अशी प्रवृत्ती आहे. नात्यात, मैत्रीत, परिवारात, शेजारात, आफ़िस, कोणत्याही ठिकाणी अशेच घडत असते. मानव का असा वागतो? मानवात माणूसकीच नसेल तर तो मानव कसला? जास्ततर गुन्हे इर्षा व श्रेष्टत्वाचामुळेच घडतात ह्यामुळे सज्जन मानव फसला जातोय. बेईमान लोकं यशाकडे वाढत आहेत व ईमानदार संघर्षंच करत चाललाय. आई-वडील दहा मुलांचे पालन करू शकतात पण दहा मुले मिळून सुद्धा आपल्या आई-वडीलांचे पालन करू शकत नाही ह्यापेक्षा जगात काय दुर्भाग्य असणार. कित्येक ठिकाणी मानवाचे जीवन जनावरांपेक्षा ही वाईट परीश्थितीत आहे.

माणूसकी कमी असली तरी जीवंत आहे

       डाॅ. आंबेडकर, मदर टेरेसा, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद, अनेक संत समाजसेवकांनी आपले संपुर्ण जीवन जनतेच्या सेवेत खर्चले. आज ही गढचिरोली चे आमटे परीवार, मेळघाटातील डाॅ. कोल्हे परीवार, सींधुताई सपकाळ, मेधा पाटकर सारखे माणसे अनेक खर्या अर्थाने माणूसकी जीवंत ठेवून आहेत म्हणजे हे व्यक्तीगण जगात मोठ्या समृध्दी व विलासीतेचे जीवन जगू शकतात पण त्यांनी लोक सेवेसाठी जीवन जगायचे ठरविले. आता कोल्हापुरात आलेल्या महापुरात मदत करणारे कित्येक संस्था व लोकांनी, सेनेनी जी निस्वार्थ कामगीरी केली ती खरी माणूसकी.

कोणत्या रडत असलेल्या चेहऱ्यांवर हसू आणनेच खरे आनंद आहे, भूकेल्याला अन्न दिल्यावर मनाला जे आत्मीय सुख मिळते ते सुख पैशांनी सुद्धा घेता येत नाही. एकमेकांवर प्रेम, मदत करणे, सहानुभूती, आदर मनात बाळगणे, समोरच्याला कधीही तुच्छ न लेखणे तो गरीब असो की श्रीमंत असो, जाती-धर्माचा भेदभाव न करता मनुष्यावर किंवा  कुठल्यातरी  प्राणी मात्रावर असो आपल्या मनात त्या विषयी प्रेम हाच खरा मानवता धर्म. आपण किती ही धन कमविले असलो तरी पण उभ्या आयुष्यात जिंकलेली मने, मिळवलेलं प्रेम, केलेली मदत मरणा नंतर सुद्धा जिवंतच राहते आणि यालाच आपण माणूसकीचा धर्म म्हणतो. आपल्याला माणसाचे जीवन मिळाले आहे तेव्हा ह्या छोट्याशा जीवनात सगळ्या बरोबर मिळून रहायला पाहीजे. आपणही आपल्या आयुष्यात दुसऱ्यांच्या  जीवनासाठी, सुखासाठी, अधिकारासाठी मदत करू शकत असू तर आपण ही नक्कीच करायला हवे आणी हीच माणूस म्हणून आपली खरी माणूसकी आहे.

डॉ. प्रितम भि. गेडाम

सोमवार, 12 अगस्त 2019

पुस्तकालयो को विश्वस्तरीय बनाने हेतु पर्याप्त निधी व उच्चशिक्षीत तज्ञ कर्मचारीयो की आवश्यकता (राष्ट्रीय पुस्तकालयाध्यक्ष दिवस विशेष लेख - 12 अगस्त, 2019) Adequate funds and highly educated expert staff are required to make libraries world class (National Librarians Day Special Article - August 12, 2019)

-----------------------------------------------------------------

    पुस्तकें मानवी जीवन का अभिन्न अंग है वह जीवन के हर पल मे यह साथ निभाती है। पुस्तकालय आज के युग मे बहुत उन्नत हुए है घर बैठे इंटरनेट द्वारा एक क्लिक पर पुस्तकें, नियतकालिकाए व अन्य दस्तावेज़ उपलब्ध होते है इस सेवा मे सबसे महत्वपूर्ण रोल पुस्तकालयाध्यक्ष का है जिसके द्वारा यह जरूरी सेवाएं प्राप्त होती है। पुस्तकालयो का स्वरूप लगातर बदल रहा है उसी रूप मे पुस्तकालयाध्यक्ष की भूमिका भी बदल रही है, आज यांत्रीकी, डिजिटल व वर्चुअल पुस्तकालयो का दौर है इसीलिए पाठकों तक उन्नत सेवाएं प्रदान करने की ज़िम्मेदारी भी पुस्तकालयाध्यक्ष की बढ गयी है। भारत मे पुस्तकालय विज्ञान के जनक डाॅ. एस. आर. रंगनाथन का जन्मदिन 12 अगस्त को पुरे देश मे "राष्ट्रिय पुस्तकालयाध्यक्ष दिवस" के रूप मे मनाया जाता है उन्होने पुस्तकालय के प्रत्येक क्षेत्र मे बडी बारीकी से कार्य किया है।

पुस्तकालयो मे कर्मचारीयो की भारी कमीः-
समाज मे शैक्षणीक, व्यावसायिक, सार्वजनिक जैसे अनेक पुस्तकालय मौजूद है लेकिन इनमे से कुछ प्रतिशत ही पुस्तकालय अपने ध्येय व उद्देश को सही ढंग से पुरा कर पाते है आज के आधुनिक युग मे पुस्तकालयो का महत्व काफी बढ गया है पारंपारीक पुस्तकालयो से लेकर आज के व्हर्चुअल पुस्तकालयो तक का सफर तय हुआ है पर देश के 90 प्रतिशत से ज्यादा पुस्तकालय अभी भी अद्यावत तकनीकी विकास से कोसो दूर है पुस्तकालयो के विकास मे कर्मचारीयो की कमी सबसे बडा रोडा और उसमे भी कुशल कर्मचारी। बडी संख्या मे विश्वविद्यालय, महाविद्यालय, सार्वजनिक पुस्तकालयो मे पुस्तकालयाध्यक्ष व संबंधित कर्मचारीयो के पद रिक्त पडे है। हर साल पुस्तकालय विभाग से बडी संख्या मे कर्मचारी निवृत्त हो रहे है। सरकारी स्कूलों मे बडी तादाद मे पुस्तकालय विभाग के सालो से पद खाली पडे है। स्थानिक प्रशासन द्वारा संचालित पुस्तकालयो की भी ऐसी ही स्थिती है अधिकतर पुस्तकालय तो कंत्राटी पद्धति या चतुर्थ श्रेणी के कर्मचारीयो के भरोसे चल रही है तो फिर किस प्रकार यहा डाॅ. एस. आर. रंगनाथन द्वारा दर्शाये गये फाईव लाॅ का पालन किया जाता होगा? दुर्गम स्थानों की परिस्थिति तो और भी खराब है।

पुस्तकालय सुचना विज्ञान क्षेत्र मे बढती बेरोज़गारी चिंताजनक : -
देश मे पुस्तकालयो की खस्ता हालत के लिए कुशल कर्मचारीयो की कमी तो बडी समस्या तो है लेकिन पर्याप्त मात्रा मे इस क्षेत्र मे खाली पडे पदों पर नियुक्ती ना होने के कारण देश के युवाओं को बेरोज़गारी की मार झेलनी पड रही है। एक ओर हम आधुनिक व सुचना के युग मे विश्वस्तरीय शिक्षा प्रणाली की ओर अग्रसर होने के लिए प्रयत्नशिल है और दूसरी ओर शिक्षा का आधार अर्थात पुस्तकालयो मे ये गंभीर समस्या नजर आती है। ऐसा नही की देश मे पुस्तकालय विज्ञान मे उच्चशिक्षीत तज्ञ कुशल मनुष्यबल की कमी है बल्कि उल्टे उच्चशिक्षीत युवावर्ग मे बेरोज़गारी समय के साथ चिंताजनक रूप मे बढ रही है। कई-कई संस्थानों मे तो देहाडी मजदूर से भी कम वेतन पर पुस्तकालय कर्मचारी कार्य करने को मजबूर है यह देश की सुदृढ होती शिक्षाव्यवस्था की वास्तविक स्थिती को दर्शाती है। विदेशों मे पुस्तकालयो के क्षेत्र मे उल्लेखनीय प्रगती हुई है हर ओर व्हर्चुअल पुस्तकालयो का नेटवर्क फैला हुआ है एंवम पुस्तकालय सेवा मे प्रतीव्यक्ती पर अधिक मात्रा मे निधी खर्च किया जाता है उस मुकाबले हम अत्यधिक पिछडे हुए है उदाहरण के लिए देखा जाए तो अमरीका के मुकाबले हम पुस्तकालय मे प्रतीव्यक्ती सेवा के लिए 1 प्रतिशत निधी भी खर्च नही करते है। सरकार एंवम संस्थाओ ने इस गंभीरता को जल्दी समझना अत्यावश्यक है।

पुस्तकालयो का महत्व समझना अत्यावश्यकः-
पुस्तकालय ज्ञान का केंद्र होता है और गुणवत्तापुर्ण मनुष्यबल व शिक्षित समाज के निमार्ण मे पुस्तकालय की महत्वपूर्ण भूमिका होती है। निधी की कमी, जनजागृती की कमी, संस्थापको व प्रशासकीय अधिकारीयो द्वारा उपेक्षा, उचित प्रबंधन की कमी, उच्चशिक्षीत तज्ञ कर्मचारीयो की कमी व अन्य कारणो से आज भी हमारे देश मे पुस्तकालय की स्थिती संतोषजनक नही है। आज वास्तविक रूप से देखा जाए तो पुस्तकालय संपन्न तरीके से समाज के विकास मे भागीदार होने चाहिए। समाज मे सभी ओर यांत्रीक पुस्तकालय, डिजिटल व्र्हचुअल पुस्तकालय होने चाहीए अर्थात पुस्तकालय मे आॅनलाईन सेवा, नवनवीन यांत्रीकी संसाधन, उच्चशिक्षीत कर्मचारी, कौशल प्रशिक्षण, योग्य प्रबंधन, उचित बजट, सरकार की भागीदारी व अन्य बातो से पुस्तकालय का विकास विश्वस्तरीय रूप मे सफल होगा। विकास के नाम पर लीपापोती नही होनी चाहीए। सरकार ने पुस्तकालय भरती पर विशेष ध्यान केंद्रित करना चाहीए साथ ही पर्यांप्त निधी की भी आवश्यकता पुर्ती जरूरी है।

स्थानीक प्रशासन द्वारा संचालित अधिकतर सार्वजनिक पुस्तकालयो की वर्तमान स्थिती की समस्याएं निम्न प्रकार से है।
  • सार्वजनिक पुस्तकालयो मे कार्यरत कर्मचारीयो के शिक्षा संबंधी निती बहुत निम्नस्तर की है। यहा के कर्मचारी पुस्तकालय शिक्षा संबंधी निती से अवगत तक नही होते है।
  • पुस्तकालयो के भवन खंडहर होते जा रहे है, उसकी दिवारे, रंगरोगन बहुत खस्ताहाल मे है बरसात के समय इन दिवारो से पानी टपकता है।
  • पुस्तकालयो के फर्नीचर टूटे-फूटे व बदतर हालत मे है एंवम आवश्यक फर्निचरो की कमी भी है।
  • अधिकतर पुस्तकालयो मे तो बिजली भी उपलब्ध नही है इस कारण वहां उचित रोशनी और हवा की कमी होती है। ये पुस्तकालय सिर्फ दिन के समय ही खुले रहते है जबकी पुस्तकालय का समय सुबह और शाम दोनो वक्त का होता है।
  • पुस्तकालयो मे खुद का वाचन साहित्य संग्रह नही के बराबर है। वाचन साहित्य के नाम पर सिर्फ कुछ अखबार आते है।
  • नितीनीयम, सुव्यवस्था प्रणाली, पढने के लिए सही वातावरण इत्यादी बातो का पुस्तकालयो मे अभाव नजर आता है।
  • पुस्तकालयो के समस्याओ के प्रती उत्तरदायी अधीकारीयो की उदासीनता, लालफिताशाही, पार्षदो द्वारा उपेक्षा, पुस्तकालयो के विकास के लिए प्रशासन की उदासीनता, वित्त की कमी।
  • महानगरपालिका के सार्वजनिक पुस्तकालयो मे इलेक्ट्रानिक संसाधनों के उपयोग की नितांत आवश्यकता है परंतु सार्वजनिक पुस्तकालयो मे इनका उपयोग नही के बराबर है।
  • शहर की जनसंख्या की तुलना मे सार्वजनिक पुस्तकालयो की संख्या बेहद कम है। शहर के विकास के साथ सार्वजनिक पुस्तकालयो का भी विकास लगातार होना चाहिए।
  • पुस्तकालयो के मध्य संसाधन सहभागीता व समन्वय की कमी। नेटवर्कींग, चर्चासत्र, संगोष्टी, कार्यशाला, प्रदर्शनी, इत्यादि क्रियाकलापो मे कभी भी सार्वजनिक पुस्तकालयो का सहभाग नजर नही आता है।
        कई बडे-बडे शहरों का हजार करोड के आस-पास का महानगरपालिका का बजट होता है फिर भी वहा के सार्वजनिक पुस्तकालय की स्थिती बहुत खराब नजर आती है। सार्वजनिक पुस्तकालयो मे इन चिन्हीत समस्याओं को दुर कर देंगे तब ये ही सभी समस्याएं गुणो मे बदलकर सार्वजनिक पुस्तकालयो को प्रगतीपथ पर ले जायेंगे और समाज के विकास मे अहम रोल निभायेंगे।

पुस्तकालय सूचना विज्ञान व्यवसायीको के क्षेत्र मे सुअवसर के लिए निम्न सुझाव एंवम सिफारिशः
  • डिजिटल पर्यावरण मे कार्य करने के लिए तकनीकी कौशल, यांत्रीक तंत्रज्ञान कौशल, प्रबंधकीय कौशल एंवम संचारण कौशल को आत्मसात करना।
  • राष्ट्रिय एंवम अंतराष्ट्रीय संघों ने महत्वपूर्ण प्रशिक्षण पाठ्यक्रमो की व्यवस्था के लिए सिफारिश करना चाहिए।
  • पुस्तकालय सूचना विज्ञान पाठ्यक्रम  की पुनः रचना करना चाहिए ताकी इस तकनीकी डिजिटल युग के अनुसार नौकरी की ज्यादा से ज्यादा अवसर प्राप्त हो सके।
  • नये अधिनियम एंवम ऊचे दर्जे के प्रत्यंयन समीती का गठन करना चाहीए ताकी पुस्तकालय सूचना विज्ञान शिक्षण क्षेत्र मे गुणवत्तापुर्ण शिक्षा प्राप्त हो सके।
  • प्रत्येक पुस्तकालय सूचना विज्ञान महाविद्यालयो एंवम विभागो मे तकनीकी सुविधाएं अनिवार्य कर देना चाहिए।
  • पुस्तकालयध्यक्षो को पुस्तकालय मे इस डिजिटल पर्यावरण अनुसार तकनीकी कौशल, तंत्रज्ञान को बनाये रखने मे हमेशा निजी महाविद्यालयो के संस्थापको एंवम प्राचार्य ने विशेष रूप से तत्परता दिखानी चाहिए।
  • निजी महाविद्यालयो के संस्थापको ने पुस्तकालय मे आवश्यक कर्मचारीयो की व्यवस्था करनी चाहिए ताकी उपयोक्ता को उचित समय पर उचित सेवाएं प्रदान की जा सके, ना की उलटे पुस्तकालय के ही कर्मचारीयो को पुस्तकालय के बाहर के अन्य कार्यो मे लगाना चाहिए।
  • महाविद्यालयो के संस्थापको ने पुस्तकालय मे यांत्रीक तंत्रज्ञान एंवम विकास के लिए आवश्यक निधी की व्यवस्था करनी चाहिए।
  • महाविद्यालयो के संस्थापको ने महाविद्यालयो के गुणवत्तापुर्ण विकास के लिए यु.जी.सी. जैसे आयोग व नॅक द्वारा बनाये गये नियमों का कडाई से पालन करना चाहिए।
                                                                  -ः-ः-ः-ः-ः-ः-ः-ः-ः-ः-ः-ः-ः-ः-ः-ः-
डाॅ. प्रितम भी. गेडाम 
 

दर्जेदार मनुष्यबळ निर्मीती व सुशिक्षीत समाजाचा विकासात ग्रंथालयाची मोलाची भूमिका (राष्ट्रीय ग्रंथपाल दिन विशेष - १२ ऑगस्ट २०१९) The role of libraries in creating quality manpower and developing a well-educated society (National Librarian Day Special - 12th August 2019)

 

पुस्तक मानवाची एक चांगली मित्र असते आणी ते जिवनाचा शेवटपर्यंत साथ देतात. आजचा युगात तर ग्रंथालयाच महत्व फार वाढल आहे. सार्वजनीक ग्रंथालय, शैक्षणिक ग्रंथालय, व्यावसायीक ग्रंथालय अशाप्रकारे ग्रंथालय समाजात आढळतात. पारंपारीक ग्रंथालय पासुन आजच्या ऑटोमेशन, यांत्रीकी, डिजीटल व र्वह्चुअल ग्रंथालयापर्यंत विकास झालेला आहे. आजच्या वेळेला वाचकांची गरज ओळखून योग्य वेळेत ती सेवा पुर्ण करने हीच ग्रंथालयाचे मुख्य ध्येय आहे. डॉ. एस. आर. रंगनाथन यांना भारत देशातील ग्रंथालय शास्त्राचे जनक मानले जाते. यांचा वाढदिवस देशात “राष्ट्रिय ग्रंथपाल दिवस” म्हणून साजरा केला जातो. ग्रंथालयाच्या प्रत्येक विभागावर डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी खूप बारकाईने काम करून अतुलनीय योगदान दिले आहे आणि डॉ. एस. आर. रंगनाथननी सांगीतलेले ग्रंथालयशास्त्राचे पाच नियम (लॉ) ग्रंथालयात प्रत्यक्षात योग्यपणे उतरवणे हीच डॉ. एस. आर. रंगनाथन यांना सर्वोत्तम मानवंदना ही ठरेल. 

ग्रंथालयात कर्मचारी वर्गाची कमी :— आज आपल्याला समाजातील प्रत्येक क्षेत्रात ग्रंथालय आढळतात. गांव तिथे ग्रंथालय हे संदेश देण्यात आले आहे. सार्वजनीक, शैक्षणिक, शासकीय, विशेष असे ग्रंथालय आहेत. ग्रंथालयाचे स्वरूप हे काळा प्रमाणे आणखी समृद्ध व सोईस्कर होणे फार गरजेचे आहे. ग्रंथालय माहीतीचे प्रमुख केंद्र आहे आणि अशा केंद्राला सतत विकसीत व्हायलाच हवे तेव्हाच ग्रंथालयाचे उद्देश पुर्ण होईल पण वास्तविक स्थिती अशी वाटत नाही कारण ग्रंथालयात कुशल कर्मचारी वर्गाची उणीव दिसून येते. मोठ्‌या संख्येने विद्यापीठात व महाविद्यालयात ग्रंथपालाचा व संबंधित कर्मचारीवर्गांच्या जागा रिक्त आहेत. दरवर्षी पुष्कळसे ग्रंथपाल सेवानिव्वृत होत असल्याने यात आणखी वाढच होत आहे. तसेच अनुदानित शाळेतही हजारोंच्या संख्येत ग्रंथालयीन कर्मचारीवर्गांच्या जागा खाली पडल्या आहेत. स्थानीक प्रशासन, महानगर पालीका द्वारे संचालीत ग्रंथालयात ही अशीच वाईट परिस्थिती आहे. कित्येक ग्रंथालय तर कंत्राट पद्धती व चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी वर्गाच्या भरोस्यावर चालत आहेत मग अशा ठिकाणी डॉ. एस. आर. रंगनाथनचे पंच सुत्री नियमांचे पालन कोणत्याप्रकारे केल्या जात असावे? दुर्गम भागातील ग्रंथालयांची स्थितीतर फारच वाईट आहे. अशा समस्येमुळेच ग्रंथालयशास्त्र विषयाचे तज्ञ शिक्षीत तरूणां मधे मोठ्‌याप्रमाणात बेकारी वाढतच आहे व मजूरांपेक्षाही कमी पगारावर काम करायला लाचार आहेत.

    एकीकडे आपण आधुनीक व माहितीच्या काळात वावरण्याचा गोष्टि करतो सोबत जागतीक स्तराचा शिक्षण व्यवस्थे कडे वाटचाल करायला प्रयत्नशील आहोत व दुसरीकडे शिक्षणाचा प्रमुख आधार म्हणजे ग्रंथालय व ग्रंथालयाचीच अशी खराब स्थिती असेल तर आपण कोणत्या आधुनिक काळाकडे विकसीत होत आहोत?. एक सरळ गोष्ट आहे की कोणताही विभाग तेव्हाच यशस्वीरीत्या चालू शकतो जेव्हा तीथे त्या विषयाचा तज्ञ व्यक्ती कार्यशिल असेल, नाही तर सर्व व्यर्थ. विदेशात तर अत्याधुनिक ग्रंथालयांचे जाळे पसरले आहेत माफक दरात ग्रंथालयीन सेवा प्रत्येक घराघरात व मानवांपर्यंत पोहोचल्या आहेत व मोठ्‌याप्रमाणात निधी ग्रंथालयांवर खर्च केला जातो त्यामानाने आपण कुठे आहोत?

ग्रंथालयात निधीचा तोटाः— ग्रंथालयाच्या विकासाकरीता शासनाने नियम बनविले आहे व वेळे प्रमाणे त्यांचा विकास व्हायला हवा पण जास्ततर ग्रंथालयांची स्थिती संतोषकारक वाटत नाही. कित्येक मोठ—मोठी संस्था, महाविद्यालय, सार्वजनीक ग्रंथालय व इतर ग्रंथालयात अद्यावत साहीत्य, आधुनिक सेवा सुविधा व संसाधनांचा वापर आढळतं नाही आणी याचे मुख्य कारण आहे अपर्याप्त निधी. अनुदानीत सार्वजनीक ग्रंथालयाचे निधी वाढायला हवे तसेच तेथील कर्मचारीवर्गांचे देखील वेतन फारच कमी आहे त्यातही सुधारणा व्हावी. आजच्या महागड्या काळात कित्येक ग्रंथालय निधीच्या कमतरतेमुळे आपले अस्तीत्व टिकवण्यासाठी संघर्ष करीत आहेत. योग्य सुविधांचा अभावी लाखो दुर्मिळ ग्रंथ नष्ट होत आहेत. पूष्कळशा संस्था शाळा— महाविद्यालयीन ग्रंथालयावर खर्च करायला सकारात्मक दिसत नाही. ग्रंथालयाला जास्त महत्व देत नाहीत. कित्येक ठिकाणी तर मोठ—मोठी भव्य इमारती मधे शिक्षण विभाग चालतात पण त्या शिक्षणाचे घर म्हणजे ग्रंथालय एका कडेला छोट्‌याशा खोलीमधे साठवले असतात.

स्पर्धात्मक परिक्षांमुळे विद्यार्थ्यांचा सार्वजनिक ग्रंथालयांकडे कल खूप वाढलाय :— आजच्या आधुनिक युगात सगळीकडे म्हणजेच प्रत्येक क्षेत्रात प्रतिस्पर्धात्मकता दिसून येते. बेकारीच्या समस्येला लढा देण्याकरता व रोजगाराच्या संधी मिळविण्याकरीता लाखो विद्यार्थी दररोज दुर—दुरून अभ्यासाकरीता सार्वजनीक ग्रंथालयात येतात. हजारो गरीब विद्यार्थ्यांकडे पुस्तक घ्यायला सुद्धा पैसे नसतात तेव्हा ग्रंथालयाचाच त्यांना आधार असतो त्यांचा जिवनात ग्रंथालयाचे फार महत्व आहे. सार्वजनिक ग्रंथालय अशा विद्यार्थांना योग्य वातावरण निर्माण करून देते जेणेकरून विद्यार्थी आपल्या ध्येयाला चांगल्या प्रकारे मिळवू शकतील. विद्यार्थ्यांकरीता प्रतिस्पर्धांत्मक पुस्तके, संदर्भग्रंथ, मासिके, वर्तमानपत्रे, विषय क्षेत्रातील तज्ञाकळून वेळोवेळी मार्गदर्शन, इतर महत्वाचे संसाधन व साहित्य सामग्री सेवा वाचकवर्ग विद्यार्थांना दिली जाते अशा कारणामुळे सार्वजनिक ग्रंथालयात वाचक विद्यार्थांची आकडेवारी वाढत चालली आहे.  शहरात तर जास्ततर सार्वजनीक ग्रंथालयात विद्यार्थांना अभ्यासाकरीता बसायला जागा सुद्धा मिळत नाही आहे ऐवढी वाचकांची गर्दी वाढतच चालली आहे.

ग्रंथालयाचे महत्व समजणे नितांत गरजेचेः— ग्रंथालयांचे महत्व न कळणे, बजेटची कमी, लोकांमधे जनजागृतेची कमी व संस्थापक व प्रशासकीय अधिकारी द्वारे उपेक्षा, दुर्लक्ष, योग्य व्यवस्थापनाची कमी, कौशल्य पुर्ण कर्मचार्यांची कमी व इतर गोष्टींमुळे भारतात ग्रंथालयाची स्थिती आजही संतोषकारक नाही आहे. ग्रंथालयांना त्वरीत हायटेक बनविणे अत्यंत गरजेचे आहे. इलेक्ट्रॉनिक ग्रंथालय, नेटवर्कीग, ऑनलाईन सेवा, यांत्रिक संसाधन, उच्च शिक्षीत तज्ञ कर्मचारी, कौशल्य प्रशिक्षण, योग्य प्रबंधन, बजट, चांगले प्रशासन, योग्य वाचन साहीत्य इत्यादी गोष्टिंकळे विशेष लक्ष देवून ग्रंथालयाच्या विकासाकडे जलदगतीने धाव घ्यायला पाहीजे. सुशिक्षीत समाजाचे विकास होईल तरच देशाचे विकास होईल. सर्वच प्रकारच्या ग्रंथालयीन कर्मचारी वर्गाचा भरतीकडे शासनाने विशेष लक्ष देणे खूपच गरजेचे आहे सोबतच संस्थांनी सुद्धा शासकीय ध्येयधोरणांचे अवलंबन काटेकोरपणे करायलाच हवे.

ग्रंथपालाचा अंगी असणारे विशेष गुणः— ग्रंथालयात वाचकांना सर्वोत्तम सुविधा सेवा पुरविणे, वाचकांचा वेळ वाचवून योग्य मार्गदर्शन करणे ह्या मधे ग्रंथपालाची मोलाची कामगीरी असते कारण वाचक वर्ग ग्रंथालयात काही अडचणी, गरज, अपेक्षा, उद्देश घेवून येतो. ग्रंथपालाला मार्गदर्शक, कौशल्यपुर्ण शिक्षक, व्यवस्थापक, भविष्याचा वेध घेणारा दूरदर्शी, अनुसंधान कर्ता, विश्लेषक, तंत्रज्ञानाचा ज्ञाता, अनेक विषयांचे ज्ञान अशा पुष्कळशा गोष्टीमधे निपुण असणे गरजेचे आहे कारण ग्रंथपालाला अशाच भूमिका पार पाडाव्या लागतात. अशाप्रकारे तत्पर राहण्याकरीता ग्रंथपालाचा अंगी जिज्ञासू प्रवृत्ति असायला हवी म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील नवनविन माहितीचा भरमसाठ साठा निर्मीत होतो तो जाणून घेण्याकरता ग्रंथपाल नेहमी तयार असायला हवे व अद्यावत रहायला पाहीजे सोबतच ग्रंथपालामधे मृदूभाषी, सहकार्य, शिस्तप्रिय, वेळेच महत्व समजणारे, अनुशासन, कर्तव्यवान व नेहमी ग्रंथालयाच्या विकासासंबंधी प्रयत्नशील असणारे अशे गुण असायला हवे.

जास्ततर सार्वजनिक ग्रंथालयांची वर्तमान स्थिती संतोषकारक नाही त्यात सुधारणा संबंधी काही गोष्टींवर विचार करता येईल.

  • सार्वजनिक ग्रंथालयातील कार्यरत कर्मचारी वर्ग हे ग्रंथालय माहिती विज्ञान विषयातील विषयातील प्रशिक्षीत कौशल्यत़ज्ञ शिक्षीत असायला हवे. तेव्हाच इथले कर्मचारी ग्रंथालयात दिल्या जाणाऱ्या सेवा योग्य प्रकारे वाचक वर्गाला पुरवू शकतील.
  • पुष्कळशा ग्रंथालयाची इमारत जर्जर होत चालले आहे. भिंत, खिडक्या, दारं, रंग खूप खराब अवस्थेत दिसून येतात. पावसाळ्‌यात तर वाचनालयांची स्थिती आणखी वाईट होते. अशा इमारतींची त्वरीत दूरूस्ती करायला हवे.
  •  ग्रंथालयात वाचक वर्गांचा संख्येप्रमाणे फर्निचर — कुर्सी व साधन सामग्री असायलाच हवी.
  • प्रत्येक वाचनालयात योग्य प्रकाश, पाणी व पंख्या संबंधी साधन असायला हवे.
  • ग्रंथालयात वाचकांच्या अनुरुप व अद्यावत योग्य वाचन साहित्य संग्रह असायला हवे.
  • नितीनीयम, सुव्यवस्था प्रणाली, वाचण्याकरीता योग्य स्वच्छ वातावरण व इतर सेवा सुविधा ग्रंथालयात असायला हवे.
  • ग्रंथालयाच्या कोणत्याही कमतरतेकडे जबाबदार अधिकारीचे नेहमी लक्ष असायला हवे, चांगल्या बजेटची सुविधा, ग्रंथालयाच्या विकासाकरीता प्रशासनातर्फे नेहमी प्रयत्नशील वाटचाल व्हायला हवी.
  • आजच्या विकसीत स्मार्ट सिटीचा वातावरणात सार्वजनिक ग्रंथालयात यांत्रिक संसाधनांचा वापर खूप गरजेचे आहे.
  • स्थानीक प्रशासन जसे महानगर पालीका, नगर पालीका, जिला परीषदांनी सुद्धा ग्रंथालयांचा विकासाकरीता बजट मधे मोठ्‌या प्रमाणात वाढ करायला हवे.
  • शहरातील वाढती लोकसंख्येच्या प्रमाणात सार्वजनिक ग्रंथालय फार कमी आहेत. शहराचा विकासासोबतच सार्वजनिक ग्रंथालयांचे ही विकास सतत रूपाने व्हायलाच हवे.
  • ग्रंथालयांचा मधे संसाधन साहित्य सहभागीतेचा आणी समन्वय व्हायला हवे. नेटवर्किंग, चर्चासत्रे, कार्यशाळा, प्रदर्शन, व इतर कार्यक्रमांमधे ही सार्वजनिक ग्रंथालयांचा सहभाग दिसून आला पाहीजे.

डॉ. प्रितम भि. गेडाम