मानवाला आवश्यक सर्व संसाधने व जीवनपयोगी वस्तु पर्यावरणामुळेच मिळते म्हणजे मानवाचे अस्तीत्व पुर्णपणे पर्यावरणावर अवलंबून आहे पण आताही मानव पर्यावरणाचे खरे अर्थ समजला नाही आहे. हे सुंदर निसर्ग टिकेल तरच मानवाचे जीवन ह्या धरणीवर वाचणार. पर्यावरणाला वाचविण्याकरता व त्याचे महत्व जगाला पटविण्याकरता दरवर्षी 5 जूनला ”जागतिक पर्यावरण दिवस“ म्हणून साजरा करण्यात येतो. दरवर्षी जागतिक स्तरावर नवीन थीम घेवून एक देश प्रतिनिधीत्व करीत असते. मागच्यावर्षी आपल्या भारत देशाने होस्ट केले होते आणी ”प्लास्टिक प्रदूषण“ ही थीम होती, ह्या वर्षी चीन देश ”वायु प्रदूषण“ ही थीम घेवून जागतिक स्तरावर मिळून कार्य करतेय.
अमेरीकेच्या हेल्थ इफेक्ट इंस्टीट्यूट आणि इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ मेट्रीक्स एंड इवेल्यूएशंस द्वारे प्रस्तुत स्टेट ऑफ ग्लोबल एयर 2019 च्या रिपोर्ट प्रमाणे आताची दूषित वायु तर धुम्रपानापेक्षा ही जास्त जीवांचे बळी घेत आहे. वायु प्रदूषणामुळे 2017 मधे 49 लाख लोकं मुत्यूमुखी पडले आणखी भारतात वायु प्रदूषणाने 2017 मधे 12 लाख लोकांचा जीव घेतला हे जीव वायु प्रदूषणाचा कंपनी ऑफिस घराच्या आतील वायु प्रदूषण, बाहेरील वायु प्रदूषण व ओजोन प्रदूषणाचा सोबतचा परीणामाने घडले.
वायु प्रदूषणामुळे भारत व्यतिरिक्त चीन, पाकिस्तान, इंडोनेशिया, बांग्लादेश, नाईजेरीया, अमेरीका, रूस, ब्राझील सारख्या कित्येक देशातही मोठ्या संख्येने लोकांनी जीव गमावला आहे. वायु प्रदूषण जगभरात गंभीर आजारांमधे सातत्याने भर पाडत आहे. मागच्या एका दशकात ओजोन प्रदूषण खूपच घातक झालाय. 2017 मधे जगभरात ओजोन प्रदूषणामुळे 5 लाख लोकांनी वेळे पुर्वीच आपला जीव गमावला आणी यात सतत वाढच होत आहे. रिपोर्ट प्रमाणे भारतात वेळेपुर्वी मृतकांची संख्या खूप वाढली आहे व इथल्या नागरिकांची सरासरी वय 2.6 वर्ष कमी झाली आहे. वायु प्रदूषणाने श्वसन संबंधी आजार, ह्दय, ह्दयाघात, फुफ्फुसाचा कैंसर आणि मधूमेह सारखे आजार मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. वायु प्रदूषणाचा प्रत्येक चौथा बळी भारतातून होत असतो. जागतिक स्वास्थ संगठनेप्रमाणे जगात 90 टक्के लोकसंख्या शुद्ध प्राणवायू पासून वंचीत आहे. 2016 साली वायु प्रदूषणामुळे श्वसनसंबंधी आजारानेे जगभरात पाच वर्षा खालील 5.4 लाख मुलांचा बळी घेतला. पाच वर्षा खालील प्रत्येक 10 पैकी एक मरण दूषित वायु मुळे होत असते आणी यात सर्वात जास्त गरीब व मध्यम वर्गच प्रभावित होतो. ही खूप चिंतेची बाब आहे की WHO व राष्ट्रिय वायु गुणवत्ता मानक द्वारे दर्शविलेल्या स्तरापेक्षाही जास्त दूषित हवेत श्वास घ्यायला आपण लाचार आहोत.
दरवर्षी जगभरात घरघूती कारणांद्वारे उत्पन्न होणाऱ्या वायु प्रदूषणामुळे 38 लाख लोकं अवेळी जीव गमावतात ज्यात सर्वाधिक मृतकांची संख्या भारत सारख्या विकासशील देशातून आहे. परिवहन द्वारे उत्सर्जीत दूषीतवायुने दरवर्षी साधारणत 4 लाख लोकांचा अवेळीच जीव जातो. एवढ्या समस्या समाजात लोकांचा नजरेत येवून सुद्धा आजही जगभरात 40 टक्के कचरा खुल्यांमधे जाळला जातो अशी समस्या शहरी आवारात व विकासशील देशात जास्त आहे. जगभरात साधारणत 166 देशात शेती मधे कचरा जाळला जातो. भारतात शेती झाल्यावर दरवेळेस 60 कोटी टनचा जवळपास पराळी निघते आणी त्याची विल्हेवाट लावण्या करीता शेतकरी त्याला शेतातच जाळतो ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर वायु प्रदूषण होते. पंजाब मधे पराळी जाळल्याने त्या वायु प्रदूषणाचा प्रभाव दिल्ली मधे सरळ दिसून येतो. जेव्हाकी ह्या पराळीचा वापर खताचा किंवा उद्योग क्षेत्रात ईंधनाचा रूपाने करू शकतो.
एका अध्ययनावरून असे लक्षात आले की जगात अन्नाचा तिसरा भाग हा फेकन्यात किंवा वेस्टेज होतो म्हणजे एकीकडे उपासमार आणी दुसरीकडे अन्नाची नासाडी. ह्याकारणांने सुद्धा वायु प्रदूषणात वाढ होेत आहे. नैसर्गीक रित्या ज्वालामुखी विस्फोट, धुळ वाळु मातीचे वादळ किंवा इतर दुर्घटनेद्वारे ही वायु प्रदूषणात वाढ होत आहे. धुम्रपान हे फुफ्फुसाचा कैंसरचे प्रमुख कारण आहे पण वायु प्रदूषणामुळे सुद्धा हे रोग भयंकर वाढले आहे म्हणजे जे लोकं धुम्रपान करीत नाही त्यांना ही मोठ्या संख्येने हा आजार लागलाय आणी यात सातत्याने वाढ होतच आहे. जगात दरवर्षी 6 लाख लहान मुलांसोबत 70 लोकसंख्येचा वायु प्रदूषणामुळे बळी जातो व दर तासाला 800 लोकांचा मृत्यू होतो. तरीसुद्धा ह्या जीवघेण्या समस्येकडे फक्त अशा एक-दोन दिवसाला जागृकता दाखवून लोकं नंतर विसरून जातात.
माणूस माणूसकी विसरून होत आहे लोभी दानव
आजचा युगात मानव ऐवढा स्वार्थी झाला आहे की स्वताचा एक रुपयाचा फायद्यासाठी सुद्धा लोकांचा अमुल्य जीवाशी खेळतात. आपल्या स्वार्थापुढे कोणाचेही महत्व समजत नाही. म्हणजे आपल्या भेसळीमुळे कोणाचातरी जीव जावू शकतो हे लक्षात येवून सुद्धा लोकं आपलेच स्वार्थ पाहतात. वृक्षतोड, ईंधनाचा अती वापर, यांत्रीक संसाधनांचा अती वापर, रासायनीक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर, अन्न-धान्यात भेसळ, फळे भाजीपाला मिठाई खाण्या-पीण्याचा वस्तु मधे जीवघेण्या रसायनाचा वापर, प्लास्टिकचा अती वापर, अवैध खनन, संपत चालले वनक्षेत्र, वनपशु व मानवामधे वाढते संघर्ष, कांक्रीटचे वाढते जंगल, आटत चालले पाण्याचे स्त्रोत, वाढते कचऱ्याचे डोंगर अशा सर्व समस्या मानवाचा लोभामुळे वाढत चालले आहे. मानवाला वाटते की माझा एकट्याचा समस्या केल्याने काय होणार? जगात सगळेच तर असे करतात, वागतात आणी अशाप्रकारे पर्यावरणाचा नाश होतच आहे. वने, औषधीयुक्त वनस्पती, पशु-पक्षी, शुद्ध प्राणवायू, शुद्ध पाणी, भेसळमुक्त अन्न-धान्य ची कमतरता आहे. गंभीर आजार, नैसर्गीक आपदा, हे सर्व पर्यावरणामधे वाढत्या असंतुलनामुळे घडत आहे ज्याकरीता फक्त मानवच जबाबदार आहे
प्रदूषण निमार्ण करणारे काही मुख्य उद्योग
विजघर व उद्योग करीता कोळसा आणी परिवहन ह्या मुख्य दोन कारणांनी वायु प्रदूषण भयंकर वाढलेय या व्यतिरीक्त ऍल्युमिनियम स्मेल्टर, कास्टीक सोडा, सीमेंट, काॅपर स्मेल्टर, दारू कारखाने, रंग कारखाने, खत उद्योग, इस्पात, चर्म उद्योग, कीटनाशी, पेट्रोरसायन, औषध, कागज, तेल रीफाइनरी, साखर कारखाने, झिंक स्मेल्टर, ताप विद्युत सयंत्र द्वारे वायुप्र्रदूषणात खूप भर पडतोय.
देशात काही महत्वाचे पर्यावरण कायदे
जल (प्रदूषण निवारण आणी नियंत्रण) अधिनियम 1974,
वायु (प्रदूषण निवारण आणी नियंत्रण) अधिनियम 1981,
जल उपकर अधिनियम 1977, पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986
सार्वजनिक देयता विमा अधिनियम 1981
राष्ट्रिय पर्यावरण अधिकरण अधिनियम 1995
राष्ट्रिय पर्यावरण अपीलीय प्राधिकारी अधिनियम 1997
राष्ट्रिय हरित अधिकरण अधिनियम 2010
पर्यावरणाचा सांभाळ करणे प्रत्येक नागरीकांचे कर्तव्य आहे
पृथ्वीवर पिण्याचे पाणी, खनीजतत्व, इंधन अशा गोष्टि सिमीत आहेत आणी वेळेनुसार लोकसंख्या भरमसाठ वाढतच चालली आहे प्राणवायू कमी होत आहे मग भविष्यात जीवनाच्या अस्तित्वाचे काय? येणाऱ्या काही दशकातच पेट्रोल-डिजल पृथ्वी वरून संपुर्णपणे संपणार मग पुढच्या पिढी करीता आपण काय करतोय? प्रदूषणामुळे मानवाचे जीवन खूप कमी होत चालले आहे शरीराची रोगप्रतीकारक शक्ती कमी होत आहे. नवीन गंभीर आजारांचे प्रसार झपाट्याने होत आहे. जगात अशा सर्व समस्यावर एकच उपाय आहे ते म्हणजे वनसमृद्धी, जागृकता आणी नियमांचे काटेकोरपणे पालन.
- आता वेळ आली आहे की शासनाने सक्तीचे कायदे करायलाच हवे. खाजगी वापरासाठी ईधन प्रती व्यक्ती प्रमाणे निर्धारित करायला हवे.
- सार्वजनीक परिवहन वाहनांचा वापर करावा आणी एकाच ठिकाणी जायचे असल्यास वाहन शेयरींग करावे.
- शक्यतो 4-5 कीलोमिटर पर्यंत जाण्या येण्या करीता सायकल वापरावी याकरता शासनाने विदेशनिती प्रमाणे ठिक-ठिकाणी सायकल स्टैंड त्याकरीता स्मार्ट कार्ड, सायकल करीता मार्गावर आरक्षित रस्ते तयार करायला हवे आणी सायकल चालवायला प्रोत्साहन द्यायला हवे.
- वनें समृद्ध व्हायला हवी त्याकरीता वनीकरण करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचा संपुर्ण भार झाडावरती आहे तेव्हा झाडे लावणे झाडे जगविणे हेच लक्ष्य असायला हवे.
- भेटवस्तुचा रूपात आवडीचे रोपं द्यावी, कचरा जाळायला टाळणे, रासायनिक खतांचा वापर टाळणे.
- पाण्याचा जपून वापर करायला हवे. आजही कित्येक भूभाग हे पाण्याविना वंचीत आहे आणी दुष्काळ ग्रस्त घोषीत झाले आहे. मानव आणी पशु-पक्षी पाण्यासाठी वनवन भटकत आहेत.
- प्लॅस्टिक प्रदूषण शेकडो वर्षांपर्यंत नष्ट होत नाही तेव्हा प्लॅस्टिक बंदीला संपुर्णपणे सहकार्य करावे.
- वापरा आणी फेका अशा वस्तूंना नाही म्हणा म्हणजे पुनचक्रण (रिसायकल) होणारी वस्तुंचा वापर करावा जेणेकरून वाढत्या कचऱ्यात कमतरता येईल.
- इलेक्ट्रॉनिक आणी मेडीकल मधील कचरा खूप विषारी असतो तेव्हा त्याची योग्य विल्हेवाट सक्तीने व्हायलाच हवे.
- विजेचा, कागदाचा, ईंधनाचा सांभाळून वापर व्हायला हवे. रेन वाटर हार्वेस्टिंग निती वापरावी.
- जनजागृतीत सोशल मिडीयाचा वापर पर्यावरण संर्वधनाकरीता खूप छान होऊ शकतो.
- आपल्या देशात सुर्यप्रकाश मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे तेव्हा याचा खूप फायदा सौरउर्जेचा रूपात होऊ शकतो.
डाॅ. प्रितम भि. गेडाम
