जगात प्रदूषणामुळे होणाऱ्या मृतकांचा आकड्यात भयंकर वाढ होत आहे व भारत, चिन देशात सर्वात जास्त मृत्युमुखी होणाऱ्याची टक्केवारी आहे म्हणजे 52 टक्के. आशिया खंडात खूप प्रदूषण वाढले आहे. ग्रीनपीस चा रिपोर्ट प्रमाणे भारतात दरवर्षी 12 लाख हून जास्त लोकांची मृत्यू वायु प्रदूषण मुळे होते दरमिनटाला दोन मृत्यू होतात व यात लहान मुलांची संख्या जास्त आहे. जगात ओझोनमुळे होणाऱ्या मृत्यूत 60 टक्के वाढ झाली आहे पण भारतात ही आकडेवारी 67 टक्यावर गेली आहे. प्रदूषणामुळे देशात मृत्युमुखी पडणारे व्यक्तींची संख्या इतर कारणाहून मृत्यूपेक्षा जास्त आहे. विश्व बैंक प्रमाणे वायु प्रदूषणामुळे वैश्विक अर्थव्यवस्थेला दरवर्षी 225 अरब डाॅलरचा तोटा होतो. कार्बनडाय आक्साईड, सल्फर डाइआक्साइड, मिथेन,नाईट्रस आक्साईड, सीसा, रेडीयोधर्मी पदार्थ, आर्सेनिक, बेरिलियम, आमली पाऊस वातावरणात त्रास वाढवित आहेत. प्रदूषणामुळे गंभीर आजार जसे फेफडया संबंधी आजार, हृदय विकार, श्वसन विकार, कैंसर, दमा, त्वचा विकार, डोळ्यांचे आजार व शरीराचा प्रत्येक अवयवावर गंभीर परिणाम करणारे विकार उत्पन्न होतात.
एकीकडे आपण विज्ञान तंत्रज्ञानामुळे विकसीत होत आहोत तर दूसरीकडे आपण आपल्याच पर्यावरणाचे नुकसान करत आहोत. शहरातील वाढती लोकसंख्या,वस्त्यांची गर्दी, कारखान्याचा प्रदूषण, वाढती वाहनांची संख्या, कर्कश हार्न, जोरजोराचे डिजे बैंड, फटाके, दूषित पाणी, मातीचे प्रदूषण या प्रदूषीत घटकांमुळे पर्यावरणाचा बिघाड होतो. प्रदूषण असा विषय आहे जो जगभरात खूप त्रासदायक परिस्थीतीत वाढतोय ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे व त्याचा सरळ परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. उद्योगधंदे, बाजारीकरण, मशिनीयंत्राचा जास्त प्रमाणात वापर, शहरीकरण, वृक्षतोड, सिमेंटची जंगल वाढत आहेत, पाऊस कमी प्रमाणात पडतोय. वातावरणात बदल घडत आहे जागतीक तापमान वाढ, हिमनग वितळू लागले, समुद्राची पातळी वाढत आहे तर दुसरीकडे पुर व वादढ उठतो, ग्लोबल वार्मिंगची समस्या निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी जमिनीत जिरत नाही त्यामुळे कालवे, विहीर, बोरवेलला लवकर पाणी लागत नाही व तळे, नदीला पाणी साठत नाही म्हणजेच की पिण्याचा पाण्याची पातळी गंभीर स्थितीत घसरत आली आहे. हाॅस्पिटलचा बायोमेडिकल कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा खूप विषारी असतो हा वेस्टेज खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. प्रदूषणात वायु, पाणी, ध्वनी व माती प्रमुख आहेत. ओजोनचा स्तरणातही छिद्र वाढत चालले आहे. मोठ्या प्रमाणावर शेतात पराळी जाळली जाते.
देशातील मोठ्या शहरांमधे प्रदूषण खूपच वाढले आहे. दिल्ली, गाजीयाबाद, पटना, इलाहाबाद, बरेली, कानपूर, हटीया, रांची, फरीदाबाद, पुणे बंगलोर ही शहरे जास्त प्रदूषीत आढळून येतात. दिल्लीची स्थिती तर खूपच खालावली आहे. पुष्कळशा शहरात तर वायु प्रदूषणाचा नियंत्रणावर काहीच कारगर उपाययोजना आखल्या नाही आहेत. कित्येक शहरात श्वास घेणे हे अवघड झाले आहे.
प्रदूषणात वाहनांचा धुर, कारखाने, शहरीकरण, मानवी हालचालीचा सहभाग आहे. पाॅवर जनरेशन, थर्मल पाॅवर प्लांट, लोह व स्टिल कंपन्या, सिमेंट फैटरी, पेट्रोकेमीकल, रासायनीक, विजनिर्मीती अशा अनेक प्रकारच्या कंपन्या वायु प्रदूषणाला वाढवतात. नैसर्गीक रित्या वनात लागलेली आग, ज्वालामुखी, वादढ ही वायु प्रदूषणाची कारणे आहेत. काॅंक्रीटचे जंगल तैयार होत आहेत लोकसंख्येत वाढ, झाडांची कटाई, जंगली जनावरे ही कमी होत चालले, लोक तर घरासमोरच कचरा जाळताना दिसतात. अशा अनेक कारणांनी वायु प्रदूषण वाढत आहे. वातावरणात आक्सिजनची कमी होत आहे. सगळीकडे दूषित हवा आहे ज्यात जिवघेणे विषारी गैस मिळलेली आहे जी सरळ मानवी आरोग्याला प्रभावित करते. आतातर पिण्याचे पाणी केमीकलयुक्त यायला लागले आहे. जमीनीत पाण्याची पातळी खूप घसरली आहे. काॅक्रींटचा जंगलामुळे पाऊसाच पाणी माती अवशोषीत करतच नाही आणी हे शुध्द ˜पाणी नदी-नाल्यात वाहुन जाते. उद्योगीक कंपन्यातून निघणारे विषारी पाणी जसे औषधी कंपनी, कापड कारखाणा, रासायनीक खत कंपन्या, पेपर मील, साखर कारखाने,आईल पेंट फैक्टरी, इलेक्ट्रानीक सामाने उत्पन करणारी कंपनी, स्टील प्लांट व इतर अशा अनेको कारखान्यातून वेस्टेज पाणी बाहेर सोडले जाते ते पाणी सरळ नदी-कालव्यात मिळते त्यामुळे पाण्याचे प्रदूषण खूप वाढले आहे सोबतच मातीच्या गुणवत्तेत खूप कमी आली आहे. बेकारचे कर्कश हार्न, जोरांनी ओरडने कींवा फोनवर बोबलणे, अनावश्यक ओरडणे, प्रत्येक छोट्या-मोठ्या कार्यक्रमात व लग्नात डीजे बैंड वाजवणे, फटाके फोडणे, ढगांच गर्जन, वादळ, कारखान्यातील आवाज, भोंग्याचा, वाहनांचा, विमानांचा आवाज असे पुष्कळसे आवाज ध्वनी प्रदूषण निर्माण करतात.
शहरांचे बदलत असलेले पर्यावरणीय स्वरूप
मागील काही वर्षात शहर खूप बदललेल आहे. शहरांची लोकसंख्या खूप वाढली आहे त्यामुळे शहराचा गरजाही वाढल्या आहेत. बाहेरून लोकं चांगल्या रोजगार व राहणीमाना साठी शहरामधे राहू लागले आहेत शहराचा जवळपासचे लोक शेती विकूण शहरात आले आहेत अशा शेत जमीनीच्या ठिकाणी नवीन वस्त्या तैयार होतात. शेतजमीन कमी होत आहे याचा सरळ प्रभाव धान्य उत्त्पन्नावर पडतो. नवीन कंपन्या शुरू होत आहेत. जंगलाचे क्षेत्रफळ खूप कमी होत आहे म्हणून जंगली जनावरे मानवी आवारात दाखल होत आहेत असेही म्हटले तरी चालेल की मानव जंगली जनावरांचा हदीत प्रवेश करतोय. शहरांतून वाहणाऱ्या नदया ही खूप दूषित आहेत. यातील पाणी रासायनीक व दूर्गंधजन्य विषारी आहे, ही नदी शहराबाहेर जाऊन दूसऱ्या नदींना मिळते व त्या नदींनाही दूषित करते. हेच नदीचे पाणी लोक वापरतात. शहरातील तलावाचे पाणी खूूपच प्रदूषीत आहे आणी पाण्याची पातळीही कमी झाली आहे. शहरात डंपींगयार्डची, कचरा, पाणी, हवा ही समस्या आहे कारण नेहमी शहरात कित्येक किलोमीटर पर्यंत विषारी गैस, दुर्गंध, धूंध, नाले, आढळून येत असते यांचा तर स्थानीक रहिवास्याचा आरोग्यवर गंभीर दूष्परीणाम झाले आहे. शहरांचे तापमान मागच्या काही वर्षांत वाढल आहे.
ग्रीन फटाके आणी प्रदूषण
देशात वाढत्या प्रदूषणाला लक्षात घेता सुप्रीम कोर्टने दिवाळीला फक्त दोन तास रात्री 8ते 10 वाजेपर्यंत फटाके फोडण्यास सुट दिली आहे. कोर्टाने सांगीतले की फटाके कमी प्रमाणात व कमी प्रदूषण करणारे ग्रीन फटाके फोडावे. ग्रीन फटाके सीएसआईआर आणी निरी अर्थात राष्ट्रिय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान, नागपुर द्वारे तयार करण्यात आले आहेत. ग्रीन फटाके सामान्य फटाके प्रमाणेच असतात पण हे 40 ते 50टक्के कमी प्रदूषण करतात. ह्या फटाक्यात प्रामुख्याने श्वास, सफल, स्टार असे तीन-चारप्रकार आहेत म्हणजे पाणी निर्माण करणारे फटाके, सल्फर व नाईट्रोजनचे कमी प्रमाणात निर्माण करणारे फटाके, कमी प्रमाणात एल्यूमीनियम चा वापर, अरोमा अर्थात सुगंध पसरवणारे फटाके. या व्यवसायात लागत सुद्वा 30 टक्याने कमी लागेल. आता ऐवढया कमी वेळेत दिवाळी असतांना मोठया प्रमाणात फटाके देशाचा मार्केट मधे उतरवणे शक्य नाही आहे. आता पर्यंत जगात कोणत्याच देशात ग्रीन फटाक्याचे वापर केले जात नाही पण भारत देश जगापुढे ही पर्यावरणाला समतोल असणारी आदर्शात्मक भूमिका मांडू शकतो. प्रदूषण मुक्त ई-फटाके सुद्धा आता ट्रेंड मधे आले आहेत.
देशातील सर्वात जास्त ई-कचरा हा आपल्या महाराष्ट्र राज्यातून म्हणजे 19.8 टक्के येतो. आपल्या राज्यात दररोज 19000 टन कचरा जमा होतो. कचऱ्याचे डोंगर वाढतच चालले आहेत. प्रदूषणामुळे मानवाची सरासरी वय कमी होत चालली आहे. रोग प्रतीकारक शक्ती कमी झाली आहे आणी आता नवनवीन गंभीर आजार प्रदूषणामुळे निर्माण झाले आहेत आणी प्रदूषणामुळे आजारात निरंतर वाढच होत आहे. सहजपणे आतातर कोणतेही आजार कुणालाही कोणत्याही वयात आढळून येतात. आजकाल तर भाजी-पाला, फळे रासायनीक प˜द्धतीने पिकवली जातात ज्यामुळे आजारात खूप भर पळू लागली आहे. मोबाईल रेडीयेशन ही पर्यावरणला धोका निर्माण करते. अंधाधुंध प्लॅस्टिक पिशवी, वस्तु, प्लास्टिकचा वापर, ईलेक्ट्रानिक संसाधनांचा वापर, घरी वापरण्यात येणारी वस्तु जसे तेल, शैम्पू, कंडीशनर, डासांची अगरबत्ती मुळे ही प्रदूषण वाढतेय. लोक जिथे-तिथे कचरा टाकतात, कचरा जाळतात ही सर्वे कारणे प्रदूषणासाठी चिंतेची बाब आहे.
परीसरची काळजी घेणे ही प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे. भारत सरकार द्वारे स्वच्छता अभीयान शुरू करण्यात आला आहे. वनीकरण, हिरवे शहर, पाणी थांबवा - पाणी जिरवा, नदी वाचवा, झाडे लावा- झाडे जगवा, श्रमदान, सेव टायगर, पानलोट, जंगल वाचवा, पानी, गंगा वाचवा असे कित्येक मोहीम राबवूण पर्यावरण वाचवण्याकरता कामे केली जातात. राज्य, राष्ट्रिय व अंतराष्ट्रिय पातळीवर प्रदूषण समस्या, त्यांचे निदान, नवीन कार्यप्रणाली आराखड्यावर काम केली जातात व ग्लोबल वार्मींगचा नियंत्रणासाठीही सर्व देश एकजूट होऊन काम करण्यास कार्यशील आहेत. पर्यावरणीय वातावरण जेव्हा शुद्ध राहील तेव्हाच मानवी आरोग्य स्वस्थ होईल.
डाॅ.प्रितम भि. गेडाम
