सोमवार, 15 अक्टूबर 2018

डाॅ. कलाम - एक प्रेरणादायी जीवन ( डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती विशेष - १५ ऑक्टोबर २०१८) Dr. A P J Abdul Kalam - An Inspiring Life (Dr. Kalam Birth Anniversary Special - 15 October 2018)

        डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 ला तमिलनाडूचा लहानश्या खेडेगावात झाला. त्यांच पुर्ण नाव अवुल पकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम अस होत. ते घरचे खूप गरीब होते परंतु त्यांना शिक्षणाची फार आवड होती म्हणुन ते शिक्षणा सोबतच वर्तमानपत्रे वाटण्याचे काम करीत असायचे. त्यांना चार भाऊ - बहिण होते. त्यांच लहानपणापासून जिवन खूप संघर्षमय राहील. त्यांना गणित विषयात विशेष आवड होती. त्यांनी स्नातक नंतर मद्रास मधून अभीयांत्रीकी मधे शिक्षण पुर्ण केलं. एरोनॉटिक्सचे शिक्षण घेतले नंतर ते अमेरीकेचा नासा मधे एरोनॉटिक्सचे प्रशिक्षण पुर्ण करून आले. त्यांना भारतीय वायु सेनेत लडाकू विमानाचे पायलट व्हायचे होते पण त्यांत त्यांची निवड होऊ शकली नाही.

        डाॅ. कलामनी सरंक्षण संशोधन व विकास संस्था अर्थात डिआरडीओ मधे कामाला लागले आणी याचा नंतर ते ईसरो मधे काम करू लागले. विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे ते प्रमुख नियुक्त झाले. क्षेपणास्त्र विकासकार्यामधे अग्नी क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणी मुळे डाॅ. कलाम यांचे जगभरात कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक म्हणुन काम करीत असतांना देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिने देखिल अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी सरंक्षण मंत्रालयाचेे वैज्ञानिक सल्लागार व डिआरडीओचे प्रमुख म्हणुन त्यांनी एमबिटी व एलसीए चा निर्मीतीत महत्वाची भूमिका पार पाडली. ते देशाचे अकरावे राष्ट्रपति म्हणुन निवडले गेले. डाॅ. कलाम एक मोठे वैज्ञानिक होते परंतु मनाने एकदम संवेदनशील व साधे होते. त्यांना विणा वाजवायला व मुलांशी संवाद साधायला आवडायचे. कलामांचा महान योगदानाबद्दल भारत सरकार द्वारे त्यांना 1981 मधे पद्मभूषण, 1990 मधे पद्मविभूषण, 1997 मधे भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. याचा व्यतीरीक्त त्यांना देश-विदेशातून पुष्कळ डाॅक्टरेट पदव्या, पुरस्कार, अवार्ड, मानसन्मान मिळाले आहे. ते नेहमी शिक्षण संस्थेत महाविद्यालय विद्यापीठात विद्यार्थ्यांना व्याख्यान देऊन मार्गदर्शन करायचे.

        संपत्तीचा नावाखाली त्यांचा कडे फक्त पुस्तका व थोडेसे वस्तु होत्या. ते नेहमी लोकांची मदत करायचे कुराण व गीता दोघांमधे ते विश्वास ठेवायचे. त्यांनी जिवनात खूप महत्वाचा विषयावर पुस्तकांचे लेखन केले. ते नेहमी युवांचे प्रेरणादायी राहिले आहेत. राष्ट्रपति असतांना देखील ते लोकांचे राष्ट्रपति म्हणुन गाजले. डाॅ. कलाम महान वैज्ञानिक, अभियंता, प्रोफेसर, लेखक, राष्ट्रपति सारखे मोठी प्रसिद्धीत राहुन सुद्धा नेहमी साधे राहीले. ते आयुष्यभर अविवाहित व शाकाहारी होते. आज डाॅ. कलामांचा वाढदिवसाला "विश्व विद्यार्थी दिवस" म्हणुन साजरा केला जातो आणि महाराष्ट्र शासना द्वारे 15 ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिवस म्हणुन साजरा केला जातो, जेणे करून विद्यार्थ्यांमध्ये वाचणाकरीता आवड निर्माण व्हावी. जे आपले देश सरंक्षण व विज्ञान स्वरूपात विकसीत झाले आहे त्यात डाॅ. कलामांची खूप मोठी भूमिका आहे. त्यांनी खूप कष्ट करून जिवनात यशाचे शिखर गाठले. त्यांची कारकीर्द नेहमीच लोकांसाठी प्रेरणादायी राहील. ते लोकांना नेहमी सांगायचे की जिवनात उंच व्हायचे असेल तर स्वप्ने बघा आणी त्या स्व्प्नांना पुर्ण करण्याकरता लक्ष्याचा मागे मेहनत करा कारण लक्ष्या विना जिवन हे व्यर्थ. 
                                                 डाॅ. प्रितम भि. गेडाम