व्यसन कोणत्याही आमलीपदार्थाचे असो शेवटी ते जिवनाला संपवण्याकरताच असते. तंबाखू ही यातील एक आहे. तंबाखू एक हळूवार परीणाम करणारा जीवघेणा विष आहे. जे प्राशन करणाऱ्या माणसाला हळू-हळू मृत्यूच्या घशात ओढत नेते. लोकं कळत नकळत तंबाखुच्या उत्पादांचे सेवन करतात व नंतर हीच सवय रोजची लतमधे बदलते तेव्हा नशा आनंदापोटी नसून इच्छा नसतांना सुद्धा केला जातो. समाजात तंबाखू सहजपणे उपलब्ध होणारे व्यसन आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळेच वयोगटाचे लोकं तंबाखुचा आहारी गेलेले आढळतात. नेहमीच पानटपरीच्या दुकानात लहान मुले-विद्यार्थी दिसून येतात. आपल्या राज्यात तर तंबाखूचा खर्रा मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो. या व्यसनात अशिक्षितांबरोबर शिक्षित लोकांचा ही मोठा सहभाग आहे. शासनाने तर सर्व प्रकारच्या आम्लीपदार्थांवर संपुर्णपणे बंदी घालायला हवी.
तंबाखुचा पुष्कळशा स्वरूपात वापर होतो, जसे की बीडी, सिगरेट, गुटखा, खर्रा, हुक्का, चिलम व इतर. धुंआरहीत तंबाखू- तंबाखाच पान, पान मसाला, तंबाखू सुपारी चुन्याच मिश्रण, मैनपुरी तंबाखू, मावा, खैनी, सनस, मिश्री, गुल, बज्जर, गुढाकू, क्रीम तंबाखू पावडर, तंबाखुयुक्त पाणी व इतर. आजच्या आधुनिक काळात हुक्कापार्लर खूप प्रचलित झाले आहेत. रेव पार्टीचा व इतर पार्टीचा नावावर खूप मोठ्या प्रमाणात युवकांद्वारे नशा केला जातो.
आजच्या दिवसाच महत्व
विश्व स्वास्थ संगठनातील सदस्यांच्या सर्व सम्मती निर्णया नंतर 31 मे 1988 पासुन या दिवसाला विश्व तंबाखू निषेध दिवसाच्या रूपाने साजरा करण्याचे ठरवण्यात आले. याचा उद्देश म्हणजे तंबाखुचे दुष्परिणाम लोकांचा समोर आणणे, जनजागृती करणे, लोकांच्या स्वास्थ समस्येवर वैश्विक लक्ष्य वेधणे असा आहे. डब्ल्यूएचओ द्वारे 31 मई 2008 ला सर्व प्रकारचा तंबाखू उत्पादनांचा वस्तूंच्या जाहिरातींवर प्रतिबंध घालण्यात आलेले आहे. दरवर्षी या तंबाखू निषेध दिवसाला एका नविन विषयासोबत साजरा करण्यात येतो. तसेच अंतराष्ट्रिय धुम्रपान निषेध आठवडा 25 मे ते 31 मे पर्यंत साजरा केला जातो.
तंबाखुमुळे निर्मीत स्थिती
तंबाखुच्या उपभोक्त्यांमधे संपुर्ण विश्वातून भारत देशाचा दुसरा क्रमांक (27.5 कोटी कींवा 35टक्के लोकसंख्या) येतो, जगभरात 60 लाखाहून ज्यास्त लोकसंख्या दरवर्षी तंबाखुमुळे जिवन संपवतात यातुन कमीतकमी 10 लाख पेक्षा जास्त लोकं भारतातुन दरवर्षी तंबाखू संबंधीत आजारामुळे मृत्युमुखी पडतात. ज्यात 72 टक्के लोक फक्त राजस्थान राज्याचे आहेत, 48 टक्के पुरूष व 20 टक्के महिला तंबाखुचे सेवन करतात. तंबाखुच्या बाजारात 48 टक्केवारी बिडी, 38 टक्केवारी तंबाखू, 14 टक्के सीगरेट आहे. यात मृत्यूचे प्रमाण बिडी मुळे ज्यास्त वाढलेल दिसून येते. अशा कारणांमुळे शासनाला स्वास्थसेवेवर ज्यास्त निधी खर्च करावा लागतो. राजस्थान मधे सर्वे प्रकारचा तंबाखू उत्पादनांवर 65टक्के कर आकारण्यात आलेला आहे. 2 ऑक्टोबर 2008 ला सार्वजनिक जागेवर धुम्रपान निषेध कायदा लागू करण्यात आला. शासनाने जर तंबाखुवर संपुर्ण बंदी घातली तर कॅन्सर सारख्या कित्येक गंभीर आजारांवर 80-90 टक्के कमतरता येईल.
तंबाखू मूळे होणारे गंभीर वाईट परीणाम
- तंबाखुमधे उत्तेजना व मादकता वाढवणारा मुख्य घटक निकोटिन असतो, हाच सर्वात जास्त घातक आहे. आणि नाइट्रोसामाइन्स, बेन्जोपाइरीन्स, आर्सेनिक, क्रोमीयम इतर विषारी तत्वे असते.
- कैंसर उत्पन्न करणारी तत्वे या तंबाखू मधे असते, जसे की फेफडे, तोंडाचे, गळा, पोट, गुर्दे, मुत्राशय, अग्नाशय, यकृतचे कैंसर व इतर.
- हार्ट डिसीज- हार्टअटैक, ह्रदय आजार, छातीत जडजड, दुखंन, स्ट्रोक एंजाइना.
- इतर आजार- गैगरीन, ब्रेन अटैक, क्रोनीक ब्रोकाईटिल, निमोनीया, दातांचे मसूड्यांचे आजार, उच्च रक्तचाप, अवसाद, तोंडाचा वास, लकवा, अल्सर, दमा, महिलांना गर्भपात व असामान्य मुलांचा जन्म होणे.
- गंभीर आजारामुळे तंबाखुला ”ए श्रेणीचा” दर्जा प्राप्त झालाय.
- धुम्रपानामुळे वातावरणात जे दुषीत वायु बनते त्यात 4000 रसायन असतात.
- शासनाला तंबाखू सिगरेट इतर वस्तुंचा विक्री मुळे जे राजस्व प्राप्त होते त्यापेक्षा अधिक राशी तंबाखुमुळे निर्मीत होणाऱ्या आजाराचा उपचारावर खर्च होतो.
- धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येउन चांगल्या व्यक्तीचे स्वास्थ सुद्धा खराब होते.
तंबाखू सोडविण्याकरीता काही उपाय
शासनातर्फे जिल्हा राज्य राष्ट्रिय स्तरांवर तंबाखू नियंत्रण प्रकोष्ट कार्यक्रम चालवली जातात. राष्ट्रिय स्वास्थ मिशन द्वारे तंबाखुमुळे होणाऱ्या आजारांवर उपचार व तंबाखू नियंत्रण कार्यक्रम केली जातात. शासनाने ”सिगरेट व इतर तंबाखू उत्पाद अधिनियम 2003“ व ”खाद्य सुरक्षा व मानक अधिनियम 2006“ लावले आहे.
- शैक्षणिक पाठ्यक्रमात तंबाखुच्या दुष्प्रभावाबद्दल प्रचार केले पाहीजे.
- कैंसर पिडीत पेशंटनी जेवणात एंटीऑक्सीडेंट युक्त फळे, भाज्या, फाइबरयुक्त रेशेदार आहार, मौसमी फळांचे सेवन करणे गरजेचे आहे.
- तंबाखाचे व्यसन सोडण्याकरीता सर्वात महत्वाचे म्हणजे मजबुत इच्छाशक्तीची गरज असते, निकोटीन च्यूंगम, निकोटीन टैबलेटचे वापर तंबाखुची लत सोडवण्याकरता डाॅक्टराच्या सल्ला द्वारे घेता येते.व्यसनाधीन मित्रमंडळी पासून दुर राहावे, नेहमी निर्व्यसनी लोकांचा सहवासात रहावे. परीवार व मित्रांचा साथ खुप गरजेचा असतो.
- नेहमी सकारात्मक विचार करावा व आपला वेळ योग्य ठिकाणी वापरावा.
- रोज योगा प्राणायाम व्यायाम करावा, तणावमुक्त जिवन जगण्याचा प्रयत्न करावा.
शासनाने कितीही कर आकारले तरी व्यसनी व्यक्ती आपली लत सोडत नाही जो पर्यंत माणसाला स्वताःचा जिवाची व आपल्या परीवाराची काळजी समजणार नाही, म्हणुन नशेचा आहारी न जाता नेहमी त्यापासून दुरच राहावे व दुसऱ्याना सुद्धा नशेचा मुक्ततेसाठी परावृत्त करावे. तंबाखू च्या व्यसनापसून मुक्तते व रोकथाम करिता प्रशासकीय व खाजगी हाॅस्पिटल, पुनर्वास केंद्र द्वारे व्यसनाधीन व्यक्तीवर शारिरीक आणी मानसिक उपचार केले जातात. सरकार आणी पूश्कळष्या एनजीओ द्वारे राज्यीय राष्ट्रिय अंतराष्ट्रिय स्तरावर नशमुक्ती सप्ताह, नशामुक्ती दिवस, निषेध दिवस, कार्यक्रमे, संगोष्टि, चर्चासत्रे, नुक्कड नाटके, पथनाट्ये, चडवडीणेे समाजात तंबाखू च्या व इतर नशेसंबंधीत वस्तुंचा विरोधात जन-जागृती आणली जाते. आजच्या आधुनिक युगात तर सोशल मिडीयाचा छान वापर समाजात जनजागृती करीता करता येतो.
तंबाखू व धुम्रपान सोडवण्याकरता पर्याय
तंबाखूचा पर्यायाच्या रूपात शरीराला हेल्दी अशी वस्तु घेता येते जसे सौफ, ड्राई फ्रुटचे चुर्ण तैयार करूण ठेवावे. जेव्हा केव्हा तंबाखूची तलब आली की हे थोडेसे चूर्ण तंबाखूचा ऐवजी तोंडात ठेवावे. या मुळे तलब हळूहळू कमी व्हायला लागते आणी तंबाखूचा व्यसनापसून सुटका होते.
तंबाखू निषेध दिवसाच्या निमीत्ताने आपण सगळे एक संकल्प घेऊया की कधीच आपण नशा करणार नाही आणि दूसऱ्या लोकांना सुद्धा नशेपासुन दूर राहण्यास प्रेरीत करूया.
डाॅ. प्रितम भि. गेडाम